वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उपदेशक १
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

उपदेशक रूपरेषा

      • “सगळंच व्यर्थ आहे!” (१-११)

        • पृथ्वी सर्वकाळ राहते (४)

        • निसर्गाची चक्रं चालत राहतात (५-७)

        • सूर्याखाली नवीन काहीच नाही (९)

      • माणसाची बुद्धी मर्यादित (१२-१८)

        • वाऱ्‍यामागे धावण्यासारखं (१४)

उपदेशक १:१

तळटीपा

  • *

    शब्दशः “सभा भरवणारा.”

समासातील संदर्भ

  • +१रा २:१२; २इत ९:३०
  • +१रा ८:१, २२

उपदेशक १:२

तळटीपा

  • *

    किंवा “निरर्थक.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ३९:५; रोम ८:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/२००६, पृ. ८

    ६/१/१९९९, पृ. २४

उपदेशक १:३

तळटीपा

  • *

    बायबलच्या या पुस्तकात, “सूर्याखाली” या शब्दाचा अर्थ “या पृथ्वीवर” किंवा “या जगात” असा होतो.

समासातील संदर्भ

  • +उप २:११; मत्त १६:२६; योह ६:२७

उपदेशक १:४

तळटीपा

  • *

    शब्दशः “उभी आहे.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ७८:६९; १०४:५; ११९:९०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (सार्वजनिक आवृत्ती),

    क्र. २ २०२१ पृ. ४

उपदेशक १:५

तळटीपा

  • *

    किंवा “धापा टाकत.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ८:२२; स्तो १९:६

उपदेशक १:७

तळटीपा

  • *

    किंवा “हिवाळ्यात वाहणाऱ्‍या नद्या; मोसमी नद्या.”

समासातील संदर्भ

  • +ईयो ३८:८, १०
  • +ईयो ३६:२७, २८; यश ५५:१०; आम ५:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२००९, पृ. २५-२७

    २/१५/१९९८, पृ. ६

उपदेशक १:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/२००६, पृ. ८

उपदेशक १:९

समासातील संदर्भ

  • +उत्प ८:२२; उप १:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९८७, पृ. २८

उपदेशक १:११

समासातील संदर्भ

  • +उप २:१६; ९:५; यश ४०:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/१९९७, पृ. ९

उपदेशक १:१२

समासातील संदर्भ

  • +१रा ११:४२; उप १:१

उपदेशक १:१३

समासातील संदर्भ

  • +१रा ४:२९, ३०
  • +उप ८:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/१९९७, पृ. १३-१४

उपदेशक १:१४

समासातील संदर्भ

  • +स्तो ३९:५, ६; उप २:११, १८, २६; लूक १२:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२००८, पृ. २१

    २/१५/१९९७, पृ. १८

उपदेशक १:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/२००६, पृ. ९

    ५/१/१९९९, पृ. २८-२९

    २/१५/१९९७, पृ. ९

उपदेशक १:१६

समासातील संदर्भ

  • +उप २:९
  • +१रा ३:२८; ४:२९-३१; २इत १:१०-१२

उपदेशक १:१७

तळटीपा

  • *

    किंवा “कमालीचा मूर्खपणा.”

समासातील संदर्भ

  • +उप २:२, ३, १२; ७:२५

उपदेशक १:१८

समासातील संदर्भ

  • +उप २:१५; १२:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/१९९७, पृ. ९

    ८/१/१९९३, पृ. २०

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

उप. १:११रा २:१२; २इत ९:३०
उप. १:११रा ८:१, २२
उप. १:२स्तो ३९:५; रोम ८:२०
उप. १:३उप २:११; मत्त १६:२६; योह ६:२७
उप. १:४स्तो ७८:६९; १०४:५; ११९:९०
उप. १:५उत्प ८:२२; स्तो १९:६
उप. १:७ईयो ३८:८, १०
उप. १:७ईयो ३६:२७, २८; यश ५५:१०; आम ५:८
उप. १:९उत्प ८:२२; उप १:४
उप. १:११उप २:१६; ९:५; यश ४०:६
उप. १:१२१रा ११:४२; उप १:१
उप. १:१३१रा ४:२९, ३०
उप. १:१३उप ८:१६
उप. १:१४स्तो ३९:५, ६; उप २:११, १८, २६; लूक १२:१५
उप. १:१६उप २:९
उप. १:१६१रा ३:२८; ४:२९-३१; २इत १:१०-१२
उप. १:१७उप २:२, ३, १२; ७:२५
उप. १:१८उप २:१५; १२:१२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
उपदेशक १:१-१८

उपदेशक

१ यरुशलेममध्ये असलेला राजा, दावीदचा मुलगा,+ उपदेशक*+ याचे हे शब्द आहेत.

 २ उपदेशक म्हणतो, “व्यर्थ* आहे! व्यर्थ आहे!

सगळंच व्यर्थ आहे!”+

 ३ माणूस इतके कष्ट करतो,

सूर्याखाली* राब राब राबतो, तरी त्याला काय मिळतं?+

 ४ एक पिढी जाते आणि दुसरी येते,

पृथ्वी मात्र सर्वकाळ राहते.*+

 ५ सूर्य उगवतो आणि मावळतो;

मग परत तिथेच धावत जाऊन,* पुन्हा उगवतो.+

 ६ वारा दक्षिणेला जातो आणि परत फिरून उत्तरेकडे येतो;

तो असा गोल गोल फिरतच राहतो; वाऱ्‍याच्या या फेऱ्‍या सतत सुरू राहतात.

 ७ सगळ्या नद्या* सागराला जाऊन मिळतात, तरी सागर भरून जात नाही;+

त्या जिथून वाहत आल्या, तिथेच परत जातात आणि पुन्हा वाहू लागतात.+

 ८ सगळ्याच गोष्टी थकवणाऱ्‍या आहेत;

कोणीच त्यांचं वर्णन करू शकत नाही.

कितीही पाहिलं, तरी डोळ्यांचं समाधान होत नाही;

कितीही ऐकलं, तरी कानांचं समाधान होत नाही.

 ९ जे घडून गेलंय, तेच परत घडणार

आणि जे करून झालंय, तेच पुन्हा केलं जाणार;

सूर्याखाली नवीन असं काहीच नाही.+

१० अशी एकतरी गोष्ट आहे का, जिला पाहून म्हणावं, “पाहा, ही नवीन आहे”?

ती तर फार पूर्वीपासूनच होती;

आपल्या काळाच्या आधीपासूनच ती होती.

११ पूर्वीच्या लोकांची कोणालाही आठवण राहत नाही;

जे पुढे येतील त्यांचीही राहणार नाही.

आणि जे त्यांच्यानंतर येतील, त्यांचीही कोणाला आठवण राहणार नाही.+

१२ मी, उपदेशक, यरुशलेममध्ये इस्राएलवर राजा म्हणून राज्य करत आलोय.+ १३ मी आपल्या बुद्धीचा+ वापर करून, आकाशाखाली चाललेल्या सर्व कामांचा अभ्यास आणि परीक्षण करायचं ठरवलं.+ देवाने माणसांना दिलेल्या या त्रासदायक उद्योगात, ते आयुष्यभर गुंतून राहतात.

१४ सूर्याखाली केली जाणारी सर्व कामं मी पाहिली,

पण सगळंच व्यर्थ आणि वाऱ्‍यामागे धावण्यासारखं होतं.+

१५ जे वाकडं आहे, ते सरळ केलं जाऊ शकत नाही,

आणि जे नाही, ते मोजणं अशक्य आहे.

१६ तेव्हा मी मनात म्हणालो: “मी भरपूर बुद्धी मिळवली आहे. यरुशलेममध्ये आजपर्यंत होऊन गेलेल्या कोणत्याही माणसापेक्षा जास्त बुद्धी मी मिळवली आहे.+ मी आपल्या हृदयात पुष्कळ बुद्धीच्या गोष्टी आणि ज्ञान साठवलं.”+ १७ बुद्धी, वेडेपणा* आणि मूर्खपणा काय असतो, हे जाणून घेण्याकडे मी आपलं मन लावलं.+ पण हेही वाऱ्‍यामागे धावण्यासारखंच आहे.

१८ कारण जितकी बुद्धी वाढते, तितकीच निराशाही वाढते.

त्यामुळे जो जास्त ज्ञान मिळवतो, तो आपल्या दुःखात भर घालतो.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा