वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ८०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • आपल्या लोकांना पुन्हा स्वीकारण्याची इस्राएलच्या मेंढपाळाला विनंती

        • “हे देवा, आमचा पुन्हा स्वीकार कर” (३)

        • इस्राएल हा देवाचा द्राक्षवेल (८-१५)

स्तोत्र ८०:उपरीलेखन

समासातील संदर्भ

  • +१इत २५:१

स्तोत्र ८०:१

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “मधोमध.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ७७:२०; यश ४०:११; यिर्म ३१:१०; यहे ३४:१२; १पेत्र २:२५
  • +निर्ग २५:२०, २२; १शमु ४:४

स्तोत्र ८०:२

समासातील संदर्भ

  • +यश ४२:१३
  • +यश २५:९

स्तोत्र ८०:३

समासातील संदर्भ

  • +स्तो ८५:४; विल ५:२१
  • +गण ६:२५; स्तो ६७:१, २

स्तोत्र ८०:४

तळटीपा

  • *

    शब्दशः “प्रार्थनांविरुद्ध जळफळशील.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ७४:१; ८५:५; विल ३:४४

स्तोत्र ८०:६

समासातील संदर्भ

  • +स्तो ४४:१३; ७९:४

स्तोत्र ८०:७

समासातील संदर्भ

  • +स्तो ८०:३, १९

स्तोत्र ८०:८

समासातील संदर्भ

  • +यश ५:७
  • +स्तो ४४:२; ७८:५५; यिर्म २:२१

स्तोत्र ८०:९

समासातील संदर्भ

  • +निर्ग २३:२८, ३०; यहो २४:१२, १३; १रा ४:२५

स्तोत्र ८०:१०

तळटीपा

  • *

    किंवा “देवाने लावलेल्या देवदार वृक्षांना.”

स्तोत्र ८०:११

तळटीपा

  • *

    म्हणजे, फरात नदी.

समासातील संदर्भ

  • +उत्प १५:१८; निर्ग २३:३१; १रा ४:२१; स्तो ७२:८

स्तोत्र ८०:१२

समासातील संदर्भ

  • +यश ५:५
  • +नहू २:२

स्तोत्र ८०:१३

समासातील संदर्भ

  • +२रा १८:९; २४:१; २५:१; २इत ३२:१; यिर्म ३९:१

स्तोत्र ८०:१४

समासातील संदर्भ

  • +यश ६३:१५

स्तोत्र ८०:१५

तळटीपा

  • *

    किंवा “द्राक्षवेलाची मुख्य फांदी.”

  • *

    किंवा “मुलाला.”

समासातील संदर्भ

  • +यश ५:७; यिर्म २:२१
  • +निर्ग ४:२२; यश ४९:५

स्तोत्र ८०:१६

समासातील संदर्भ

  • +स्तो ७९:५; यिर्म ५२:१२, १३

स्तोत्र ८०:१७

समासातील संदर्भ

  • +स्तो ८९:२०, २१

स्तोत्र ८०:१९

समासातील संदर्भ

  • +स्तो ८०:७

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. ८०:उपरीलेखन१इत २५:१
स्तो. ८०:१स्तो ७७:२०; यश ४०:११; यिर्म ३१:१०; यहे ३४:१२; १पेत्र २:२५
स्तो. ८०:१निर्ग २५:२०, २२; १शमु ४:४
स्तो. ८०:२यश ४२:१३
स्तो. ८०:२यश २५:९
स्तो. ८०:३स्तो ८५:४; विल ५:२१
स्तो. ८०:३गण ६:२५; स्तो ६७:१, २
स्तो. ८०:४स्तो ७४:१; ८५:५; विल ३:४४
स्तो. ८०:६स्तो ४४:१३; ७९:४
स्तो. ८०:७स्तो ८०:३, १९
स्तो. ८०:८यश ५:७
स्तो. ८०:८स्तो ४४:२; ७८:५५; यिर्म २:२१
स्तो. ८०:९निर्ग २३:२८, ३०; यहो २४:१२, १३; १रा ४:२५
स्तो. ८०:११उत्प १५:१८; निर्ग २३:३१; १रा ४:२१; स्तो ७२:८
स्तो. ८०:१२यश ५:५
स्तो. ८०:१२नहू २:२
स्तो. ८०:१३२रा १८:९; २४:१; २५:१; २इत ३२:१; यिर्म ३९:१
स्तो. ८०:१४यश ६३:१५
स्तो. ८०:१५यश ५:७; यिर्म २:२१
स्तो. ८०:१५निर्ग ४:२२; यश ४९:५
स्तो. ८०:१६स्तो ७९:५; यिर्म ५२:१२, १३
स्तो. ८०:१७स्तो ८९:२०, २१
स्तो. ८०:१९स्तो ८०:७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र ८०:१-१९

स्तोत्र

संचालकासाठी सूचना. आठवणीसाठी असलेलं आसाफचं+ गीत. “भुईकमळं” याच्या चालीवर गायलं जावं.

८० हे इस्राएलच्या मेंढपाळा, ऐक,

तू योसेफला कळपाप्रमाणे मार्ग दाखवतोस.+

तू करुबांवर* विराजमान आहेस.+

तुझं तेज चमकू दे.

 २ एफ्राईम, बन्यामीन आणि मनश्‍शे यांच्यापुढे

आपलं सामर्थ्य प्रकट कर.+

ये आणि आम्हाला वाचव.+

 ३ हे देवा, आमचा पुन्हा स्वीकार कर;+

तुझ्या चेहऱ्‍याचं तेज आमच्यावर चमकू दे, म्हणजे आमचा बचाव होईल.+

 ४ हे यहोवा, सैन्यांच्या देवा, तू कधीपर्यंत आपल्या लोकांच्या प्रार्थना रागाने झिडकारशील?*+

 ५ त्यांचे अश्रू तू त्यांना अन्‍न म्हणून खायला घालतोस,

तू त्यांना प्रमाणाबाहेर अश्रू प्यायला लावतोस.

 ६ तू आमच्या शेजारच्या राष्ट्रांना आमच्यावरून आपसात भांडू देतोस;

आमचे शत्रू आमची वाटेल तशी थट्टा करतात.+

 ७ हे सैन्यांच्या देवा, आमचा पुन्हा स्वीकार कर;

तुझ्या चेहऱ्‍याचं तेज आमच्यावर चमकू दे, म्हणजे आमचा बचाव होईल.+

 ८ तू इजिप्तमधून एक द्राक्षवेल+ काढून आणलास.

तू राष्ट्रांना हाकलून लावलंस आणि तो द्राक्षवेल जमिनीत लावलास.+

 ९ तू त्याच्यासाठी जागा मोकळी केली;

तेव्हा त्याने मूळ धरलं आणि तो देशभर पसरला.+

१० त्याच्या सावलीने डोंगरांना

आणि त्याच्या फांद्यांनी देवदार वृक्षांना* झाकून टाकलं.

११ त्याच्या फांद्या समुद्रापर्यंत

आणि त्याचे फाटे महानदीपर्यंत* पोहोचले.+

१२ तू त्या द्राक्षमळ्याच्या भोवती असलेल्या भिंती का पाडून टाकल्यास?+

त्यामुळे ये-जा करणारे सगळे त्याची फळं तोडतात.+

१३ रानडुकरं त्याची नासधूस करतात

आणि रानातले जंगली प्राणी त्याला खाऊन टाकतात.+

१४ हे सैन्यांच्या देवा, कृपा करून परत ये.

स्वर्गातून खाली पाहा!

या द्राक्षवेलाची काळजी घे.+

१५ याचा बुंधा* तूच आपल्या उजव्या हाताने लावला होतास.+

ज्या फांदीला* तू आपल्यासाठी मजबूत केलंस, तिच्याकडे लक्ष दे.+

१६ तो द्राक्षवेल जाळून,+ तोडून टाकण्यात आलाय.

तुझ्या खडसावण्याने लोकांचा नाश होतो.

१७ तुझ्या उजवीकडे असलेल्या माणसाला;

तू ज्याला आपल्यासाठी मजबूत केलंस, त्या मनुष्याच्या मुलाला साहाय्य कर.+

१८ मग आम्ही तुझ्याकडे पाठ फिरवणार नाही.

आम्हाला मृत्यूपासून वाचव, म्हणजे आम्ही तुझ्या नावाने तुला हाक मारू.

१९ हे यहोवा, सैन्यांच्या देवा, आमचा पुन्हा स्वीकार कर.

तुझ्या चेहऱ्‍याचं तेज आमच्यावर चमकू दे, म्हणजे आमचा बचाव होईल.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा