स्तोत्र
७४ हे देवा, तू आमच्याकडे कायमची पाठ का फिरवलीस?+
तुझ्या कुरणातल्या कळपावर तू का क्रोधित झाला आहेस?+
२ ज्या लोकांना* तू फार पूर्वी निवडलं होतंस त्यांची आठवण कर,+
ज्या लोकांना तू आपला वारसा होण्यासाठी सोडवलंस त्यांना आठव.+
ज्या सीयोन पर्वतावर तू राहिलास त्याची आठवण कर.+
३ कायमच्या नाश झालेल्या ठिकाणाकडे तुझी पावलं वळव.+
शत्रूने पवित्र ठिकाणातल्या सर्व गोष्टी उद्ध्वस्त केल्या आहेत.+
४ तुझ्या शत्रूंनी तुझ्या उपासनेच्या ठिकाणी* जयघोष केला.+
त्यांनी तिथे खुणा म्हणून स्वतःचे झेंडे उभारले आहेत.
५ कुऱ्हाडींनी दाट जंगल तोडून टाकणाऱ्या माणसांसारखे ते होते.
६ त्यांनी कुऱ्हाडींनी आणि लोखंडी दांड्यांनी सगळ्या नक्षीकामाची+ नासधूस केली.
७ त्यांनी तुझ्या मंदिराला आग लावली.+
त्यांनी तुझ्या नावाच्या निवासस्थानाचा अनादर केला, त्याला जमीनदोस्त केलं.
८ ते आणि त्यांची मुलं मनात म्हणाली:
“देशात देवाच्या उपासनेची जितकी ठिकाणं आहेत, ती सर्व जाळून टाकली पाहिजेत.”
९ आम्हाला कोणतीही चिन्हं दिसत नाहीत;
आमच्यात आता कोणीही संदेष्टा नाही,
आणि हे अजून किती काळ चालेल, हे आमच्यापैकी कोणालाही माहीत नाही.
१० हे देवा, वैरी अजून कुठवर टोमणे मारत राहील?+
शत्रू कायम तुझ्या नावाचा अनादर करत राहील का?+
११ तू तुझा हात, तुझा उजवा हात का आवरतोस?+
तो तुझ्या छातीवरून* काढ आणि त्यांचा नाश कर.
१२ देव तर फार पूर्वीपासून माझा राजा आहे,
तो पृथ्वीवर तारणाची कार्यं करतो.+
१४ तू लिव्याथानाची* डोकी चिरडून टाकलीस;
तू ती लोकांना, वाळवंटात राहणाऱ्या लोकांना अन्न म्हणून दिलीस.
१६ दिवस तुझा आणि रात्रही तुझीच आहे.
तू प्रकाशाला* आणि सूर्याला निर्माण केलंस.+
१८ हे यहोवा, शत्रूंचे टोमणे आठव;
एक मूर्ख राष्ट्र तुझ्या नावाचा कसा अनादर करतं, ते आठव.+
१९ तुझ्या पारव्याचा* जीव हिंस्र पशूंच्या हाती देऊ नकोस.
तुझ्या पीडित लोकांना कायमचं विसरू नकोस.
२० तू आमच्याशी केलेला करार आठव,
कारण पृथ्वीवरच्या प्रत्येक अंधाऱ्या ठिकाणी, हिंसाचार करणारे टपून बसले आहेत.
२२ हे देवा, ऊठ आणि तुझा वाद मांड.
मूर्ख कसे दिवसभर तुला टोमणे मारतात, ते आठव.+
२३ तुझे शत्रू काय म्हणत आहेत हे विसरू नकोस.
तुझा विरोध करणाऱ्यांचा आरडाओरडा आकाशापर्यंत जात आहे.