स्तोत्र
संचालकासाठी सूचना. आठवणीसाठी असलेलं दावीदचं गीत.
२ माझ्या जिवावर उठलेल्या सर्वांना
लज्जित आणि अपमानित होऊ दे.
माझ्यावर आलेलं संकट पाहून आनंद करणाऱ्यांना
शरमेने माघार घ्यायला लाव.
३ “बरं झालं! बरं झालं!” असं म्हणून जे माझी थट्टा करतात,
त्यांना लज्जित होऊन परत जायला लाव.
तुझी तारणाची कार्यं ज्यांना प्रिय वाटतात, ते नेहमी असं म्हणोत:
“देवाचा महिमा होवो!”