स्तोत्र
कोरहच्या मुलांचं गीत.+ स्तुतिगीत.
४८ आमच्या देवाच्या शहरात, त्याच्या पवित्र पर्वतावर,
यहोवा महान आणि सगळ्यात स्तुतिपात्र आहे.
२ उत्तरेच्या टोकावर सीयोन पर्वत,
महान राजाची नगरी आहे.+
उंचावर वसलेली ती सुंदर नगरी, सबंध पृथ्वीचा आनंद आहे.+
४ कारण पाहा! राजे एकत्र जमले;*
ते सोबत मिळून पुढे सरसावले.
५ त्यांनी तिला पाहिलं, तेव्हा ते चकित झाले.
ते भयभीत झाले आणि घाबरून पळून गेले.
६ ते तिथे भीतीने थरथर कापू लागले,
प्रसूतिवेदना होणाऱ्या स्त्रीसारखी त्यांची स्थिती झाली.
७ पूर्वेकडच्या वाऱ्याने तू तार्शीशची जहाजं तोडतोस.
८ पूर्वी ज्याबद्दल ऐकलं होतं, ते आता आम्ही,
सैन्यांचा देव यहोवा याच्या नगरीत, आमच्या देवाच्या नगरीत
आपल्या डोळ्यांनी पाहिलंय;
देव सर्वकाळ या नगरीचं रक्षण करतो.+ (सेला )
१० हे देवा, तुझ्या नावाप्रमाणेच तुझा महिमा
पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांपर्यंत पोहोचलाय.+
तुझा उजवा हात नीतीने परिपूर्ण आहे.+
११ सीयोन पर्वत+ आनंद करो!
यहूदाची शहरं* तुझ्या न्याय-निर्णयांमुळे हर्ष करोत!+
१३ तिच्याभोवती असलेल्या भिंतींकडे* लक्ष द्या.+
तिच्या मजबूत बुरुजांची पाहणी करा.
म्हणजे पुढच्या पिढ्यांना तुम्हाला या गोष्टी सांगता येतील.
१४ कारण हा देव, आमचा सदासर्वकाळाचा देव आहे.+