वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ३०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • शोकाचं आनंदात रूपांतर

        • देवाची कृपा आयुष्यभरासाठी असते (५)

स्तोत्र ३०:१

तळटीपा

  • *

    किंवा “ओढून काढलं.”

समासातील संदर्भ

  • +स्तो २५:२; ४१:११

स्तोत्र ३०:२

समासातील संदर्भ

  • +२रा २०:५; स्तो ६:२; १०३:३

स्तोत्र ३०:३

तळटीपा

  • *

    हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

  • *

    किंवा “कबरेत.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ८६:१३
  • +स्तो १६:१०; २८:१; यश ३८:१७; योन २:६

स्तोत्र ३०:४

तळटीपा

  • *

    किंवा “त्याच्यासाठी संगीत रचा.”

  • *

    शब्दशः “स्मारकाची.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ३२:११
  • +निर्ग ३:१५

स्तोत्र ३०:५

तळटीपा

  • *

    किंवा “अनुग्रह.”

समासातील संदर्भ

  • +यश १२:१
  • +यश ५४:८
  • +स्तो १२६:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००६, पृ. ५

स्तोत्र ३०:६

तळटीपा

  • *

    किंवा “मी कधीच डगमगणार नाही.”

स्तोत्र ३०:७

तळटीपा

  • *

    किंवा “तुझा अनुग्रह.”

  • *

    शब्दशः “चेहरा लपवताच.”

समासातील संदर्भ

  • +२शमु ५:१२; स्तो ८९:१७
  • +स्तो १०:१; १४३:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ६/२०१७, पृ. २

स्तोत्र ३०:८

समासातील संदर्भ

  • +स्तो ३४:६; ७७:१

स्तोत्र ३०:९

तळटीपा

  • *

    किंवा “खड्ड्यात; खळग्यात.”

समासातील संदर्भ

  • +स्तो २८:१
  • +स्तो ६:५; ११५:१७; उप ९:१०
  • +स्तो ८८:११; यश ३८:१८

स्तोत्र ३०:१०

समासातील संदर्भ

  • +स्तो १४३:१
  • +स्तो २८:७

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. ३०:१स्तो २५:२; ४१:११
स्तो. ३०:२२रा २०:५; स्तो ६:२; १०३:३
स्तो. ३०:३स्तो ८६:१३
स्तो. ३०:३स्तो १६:१०; २८:१; यश ३८:१७; योन २:६
स्तो. ३०:४स्तो ३२:११
स्तो. ३०:४निर्ग ३:१५
स्तो. ३०:५यश १२:१
स्तो. ३०:५यश ५४:८
स्तो. ३०:५स्तो १२६:५
स्तो. ३०:७२शमु ५:१२; स्तो ८९:१७
स्तो. ३०:७स्तो १०:१; १४३:७
स्तो. ३०:८स्तो ३४:६; ७७:१
स्तो. ३०:९स्तो २८:१
स्तो. ३०:९स्तो ६:५; ११५:१७; उप ९:१०
स्तो. ३०:९स्तो ८८:११; यश ३८:१८
स्तो. ३०:१०स्तो १४३:१
स्तो. ३०:१०स्तो २८:७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र ३०:१-१२

स्तोत्र

दावीदचं स्तुतिगीत. घराच्या उद्‌घाटनाचं गीत.

३० हे यहोवा, मी तुझा महिमा करीन, कारण तू मला वर आणलं* आहेस;

माझ्या दुःखाबद्दल तू माझ्या शत्रूंना आनंद करू दिला नाहीस.+

 २ हे यहोवा, माझ्या देवा, मी तुला मदतीसाठी हाक मारली आणि तू मला बरं केलंस.+

 ३ हे यहोवा, तू मला कबरेतून* वर आणलंस.+

तू मला जिवंत ठेवलंस; तू मला खळग्यात* जाण्यापासून वाचवलंस.+

 ४ यहोवाच्या एकनिष्ठ सेवकांनो, त्याची स्तुती करा!*+

त्याच्या पवित्र नावाची* उपकारस्तुती करा!+

 ५ कारण त्याचा क्रोध क्षणभरासाठी असतो,+

पण त्याची कृपा* आयुष्यभरासाठी असते.+

संध्याकाळी दुःखाचे अश्रू आले, तरी सकाळी आनंदाचा जल्लोष होईल.+

 ६ जेव्हा मी सुखात होतो, तेव्हा मी म्हणायचो:

“माझं कधीच काही वाईट होणार नाही.”*

 ७ हे यहोवा, माझ्यावर तुझी कृपा* होती, तेव्हा तू मला पर्वतासारखं खंबीर केलंस.+

पण तू माझ्यापासून तोंड फिरवताच,* मी भयभीत झालो.+

 ८ हे यहोवा, मी तुला हाक मारत राहिलो;+

मी यहोवाला कृपेची याचना करत राहिलो.

 ९ माझा मृत्यू झाला आणि मी कबरेत* गेलो, तर काय उपयोग?+

माती तुझी स्तुती करेल का?+ ती तुझ्या विश्‍वासूपणाचं वर्णन करेल का?+

१० हे यहोवा, माझी प्रार्थना ऐक आणि माझ्यावर कृपा कर.+

हे यहोवा, माझा सहायक हो.+

११ मी शोक करत होतो, पण तू मला आनंदाने नाचायला लावलंस;

मी पांघरलेलं गोणपाट काढून, तू मला आनंदाचं वस्त्र घातलंस.

१२ मी शांत राहू नये, तर तुझी स्तुती करावी म्हणून तू असं केलंस.

हे यहोवा, माझ्या देवा, मी सर्वकाळ तुझी स्तुती करीन!

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा