स्तोत्र
दावीदचं गीत.
२८ हे यहोवा, तू माझा खडक आहेस;+ मी तुला हाक मारत राहतो;
माझ्या हाकेकडे दुर्लक्ष करू नकोस.
२ तुझ्या घराच्या परमपवित्र स्थानाकडे मी हात उंचावतो;+
माझ्या मदतीच्या याचना ऐक.
३ मला दुष्टांसोबत, सतत वाईट कृत्यं करणाऱ्यांसोबत ओढून नेऊ नकोस.+
ते मनात कपट ठेवून आपल्या शेजाऱ्याशी शांतीच्या गोष्टी करतात.+
४ त्यांच्या वाईट कृत्यांप्रमाणे
आणि त्यांच्या कामांप्रमाणे त्यांची परतफेड कर.+
त्यांच्या वागणुकीप्रमाणे
आणि त्यांनी केलेल्या कार्यांप्रमाणे त्यांना मोबदला दे.+
५ कारण ते यहोवाच्या कार्यांकडे;
त्याच्या हाताच्या कार्यांकडे जराही लक्ष देत नाहीत.+
तो त्यांना उभारणार नाही, तर त्यांना पाडून टाकेल.
६ यहोवाची स्तुती असो!
कारण त्याने माझ्या मदतीच्या याचना ऐकल्या आहेत.
त्याचं साहाय्य मिळाल्यामुळे माझ्या मनाला आनंद झाला आहे.
म्हणून मी गीत गाऊन त्याची स्तुती करीन.
८ यहोवा त्याच्या लोकांचं सामर्थ्य आहे;
तो त्यांचा गड आहे; त्याच्या अभिषिक्ताचं तो अद्भुत रितीने तारण करतो.+
९ आपल्या लोकांचं तारण कर; तुझ्या वारशाच्या लोकांना आशीर्वाद दे.+
मेंढपाळाप्रमाणे त्यांची काळजी घे आणि त्यांना सर्वकाळ आपल्या छातीशी धरून ठेव.+