स्तोत्र
दावीदचं गीत. संचालकासाठी.
२१ हे यहोवा, तुझ्या सामर्थ्यामुळे राजा आनंदी होतो.+
तुझ्या तारणाच्या कार्यांमुळे तो किती हर्ष करतो!+
४ त्याने तुझ्याकडे आयुष्य मागितलं आणि तू ते त्याला दिलंस,+
पुष्कळ वर्षांचं,* सदासर्वकाळाचं जीवन तू त्याला दिलंस.
५ तुझ्या तारणाच्या कार्यांमुळे त्याचा मोठा गौरव होतो.+
तू त्याला सन्मान आणि वैभव बहाल करतोस.
६ त्याला तुझ्याकडून कायम आशीर्वाद मिळत राहतील;+
८ तुझे सर्व शत्रू तुझ्या हाती लागतील;
तुझा द्वेष करणारे तुझ्या उजव्या हातात सापडतील.
९ ठरवलेल्या वेळी तू त्यांच्याकडे लक्ष वळवशील आणि त्यांना जळत्या भट्टीसारखं करशील.
यहोवा आपल्या क्रोधात त्यांना गिळून टाकेल, आग त्यांना भस्म करेल.+
१० त्यांच्या वंशजांना तू पृथ्वीवरून नष्ट करशील;
त्यांच्या संततीला मानवांमधून नाहीसं करशील.
१२ कारण तू तुझं धनुष्य* त्यांच्यावर* रोखशील
आणि त्यांना माघार घ्यायला लावशील.+
१३ हे यहोवा, ऊठ आणि आपली ताकद दाखव.
आम्ही तुझ्या सामर्थ्याचा महिमा गाऊ.*