स्तोत्र
दावीदचं गीत. संचालकासाठी.
२० संकटाच्या दिवशी यहोवा तुझ्या प्रार्थनेचं उत्तर देवो.
याकोबच्या देवाचं नाव तुझं रक्षण करो.+
४ तुझ्या मनातल्या सर्व इच्छा तो पूर्ण करो,+
आणि तुझ्या सर्व योजना सफल करो.
५ आम्ही तुझ्या तारणाच्या कार्यांमुळे आनंदाने जल्लोष करू!+
आम्ही आमच्या देवाच्या नावाने ध्वज उंचावू!+
यहोवा तुझ्या सर्व विनंत्या मान्य करो.
६ यहोवा आपल्या अभिषिक्ताला वाचवतो,+ हे आता मला कळलंय.
तो त्याच्या पवित्र स्वर्गातून त्याला उत्तर देतो;
८ ते अडखळून खाली पडले आहेत.
पण आम्ही उठून ताठ उभे आहोत.+
९ हे यहोवा, राजाचं तारण कर!+
आम्ही मदतीची याचना करू, त्या दिवशी देव* आम्हाला उत्तर देईल.+