वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • एस्तेर ७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

एस्तेर रूपरेषा

      • एस्तेर हामानचं खरं रूप राजापुढे आणते (१-६क)

      • हामानने बनवलेल्या वधस्तंभावर त्यालाच लटकवण्यात येतं (६ख-१०)

एस्तेर ७:१

समासातील संदर्भ

  • +एस्ते ३:१

एस्तेर ७:२

समासातील संदर्भ

  • +एस्ते ५:३, ६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अनुकरण, पृ. १६२

एस्तेर ७:३

समासातील संदर्भ

  • +एस्ते २:५, ७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अनुकरण, पृ. १६२

एस्तेर ७:४

समासातील संदर्भ

  • +एस्ते ३:८, ९, १३; ४:७, ८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अनुकरण, पृ. १६२-१६३

    टेहळणी बुरूज,

    ३/१/२००६, पृ. ६

    ४/१/१९८६, पृ. २६-२७

एस्तेर ७:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अनुकरण, पृ. १६३

एस्तेर ७:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अनुकरण, पृ. १६३-१६४

एस्तेर ७:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अनुकरण, पृ. १६३-१६४

    टेहळणी बुरूज,

    ३/१/२००६, पृ. ६

    ४/१/१९८६, पृ. २७

एस्तेर ७:९

तळटीपा

  • *

    जवळजवळ २२.३ मी. (७३ फूट). अति. ख१४ पाहा.

समासातील संदर्भ

  • +एस्ते १:१०
  • +एस्ते ६:२
  • +एस्ते ५:१४

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

एस्ते. ७:१एस्ते ३:१
एस्ते. ७:२एस्ते ५:३, ६
एस्ते. ७:३एस्ते २:५, ७
एस्ते. ७:४एस्ते ३:८, ९, १३; ४:७, ८
एस्ते. ७:९एस्ते १:१०
एस्ते. ७:९एस्ते ६:२
एस्ते. ७:९एस्ते ५:१४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
एस्तेर ७:१-१०

एस्तेर

७ मग राजा आणि हामान+ हे दोघं एस्तेर राणीने ठेवलेल्या मेजवानीला आले. २ मेजवानीच्या या दुसऱ्‍या दिवशी जेव्हा द्राक्षारस दिला जात होता तेव्हा राजाने पुन्हा एकदा एस्तेरला विचारलं: “सांग तुला काय हवंय? तू जे मागशील ते तुला मिळेल. अगदी अर्धं राज्य जरी मागितलंस तरी ते मी तुला देईन. सांग काय हवंय?”+ ३ त्यावर एस्तेर राणी म्हणाली: “राजा जर माझ्यावर प्रसन्‍न असेल आणि राजाची जर इच्छा असेल, तर राजाने माझा आणि माझ्या लोकांचा+ जीव वाचवावा, इतकीच माझी विनंती आहे. ४ कारण मला आणि माझ्या लोकांना मारून टाकण्यासाठी आणि आमचा समूळ नाश करण्यासाठी आम्हाला विकण्यात आलंय.+ फक्‍त गुलाम म्हणून आम्हाला विकलं असतं, तर मी शांत बसले असते. पण आमच्यावर आलेल्या या संकटामुळे राजाचंही मोठं नुकसान होणार आहे. म्हणून राजाने कसंही करून हे संकट थांबवावं.”

५ त्यावर अहश्‍वेरोश राजा एस्तेर राणीला म्हणाला: “कोण आहे तो? कोणाची एवढी हिंमत झाली असं करायची?” ६ तेव्हा एस्तेर म्हणाली: “तो विरोधी आणि शत्रू दुसरा कोणी नाही; हा दुष्ट हामानच आहे!”

हे ऐकून राजा आणि राणी यांच्यासमोर हामानचा भीतीने थरकाप उडाला. ७ राजा अतिशय संतापला आणि मेजवानीतून उठून राजमहालाच्या बागेत गेला. हामान मात्र आपला जीव वाचवण्यासाठी उठून एस्तेर राणीपुढे गयावया करू लागला. कारण राजा आता आपल्याला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही हे हामानला कळून चुकलं होतं. ८ राजमहालाच्या बागेतून राजा परत मेजवानी-गृहात आला, तेव्हा हामान एस्तेरच्या दिवाणावर टेकलेला त्याला दिसला. तेव्हा राजा ओरडून म्हणाला: “आता हा माझ्याच घरात राणीवर जबरदस्तीही करणार काय?” राजाच्या तोंडून हे शब्द बाहेर पडले न पडले तोच हामानचं तोंड कपड्याने झाकण्यात आलं. ९ राजाच्या दरबाऱ्‍यांपैकी एक असलेला हरबोना+ हा राजाला म्हणाला: “ज्या मर्दखयमुळे राजाचा जीव वाचला,+ त्याच्यासाठी हामानने एक वधस्तंभही बनवलाय.+ तो ५० हात* उंचीचा वधस्तंभ हामानच्या घराजवळ उभा केलेला आहे.” तेव्हा राजा म्हणाला: “त्यावर यालाच लटकवून टाका.” १० म्हणून हामानने मर्दखयसाठी जो वधस्तंभ बनवला होता, त्यावर त्यांनी हामानला लटकवलं. मग राजाचा राग शांत झाला.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा