वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ इतिहास ४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ इतिहास रूपरेषा

      • वेदी, गंगाळ-सागर आणि छोटी गंगाळं (१-६)

      • दीपवृक्ष, मेज आणि अंगणं (७-११क)

      • मंदिरातल्या वस्तू बनवण्याचं काम पूर्ण (११ख-२२)

२ इतिहास ४:१

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३८:१, २; १रा ८:२२

२ इतिहास ४:२

तळटीपा

  • *

    किंवा “पाण्याचा मोठा हौद.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३०:२०; ३८:८
  • +१रा ७:२३-२६

२ इतिहास ४:३

समासातील संदर्भ

  • +१रा ६:१८

२ इतिहास ४:४

समासातील संदर्भ

  • +यिर्म ५२:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००५, पृ. १९

२ इतिहास ४:५

तळटीपा

  • *

    सुमारे ७.४ सें.मी. (२.९ इंच). अति. ख१४ पाहा.

  • *

    किंवा “लिलीच्या फुलासारखा.”

  • *

    एक बथ म्हणजे २२ ली. अति. ख१४ पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००५, पृ. १९

२ इतिहास ४:६

समासातील संदर्भ

  • +१रा ७:३८, ३९
  • +लेवी १:९; ९:१४
  • +निर्ग २९:४

२ इतिहास ४:७

तळटीपा

  • *

    एक प्रकारची समई.

समासातील संदर्भ

  • +१इत २८:१२, १५
  • +निर्ग ३७:१७
  • +निर्ग ४०:२४

२ इतिहास ४:८

समासातील संदर्भ

  • +२इत ४:१९

२ इतिहास ४:९

समासातील संदर्भ

  • +१रा ६:३६
  • +निर्ग २७:९; लेवी ६:१६
  • +१रा ७:१२

२ इतिहास ४:१०

समासातील संदर्भ

  • +१रा ७:३९

२ इतिहास ४:११

समासातील संदर्भ

  • +निर्ग २७:३
  • +१रा ७:४०-४६

२ इतिहास ४:१२

समासातील संदर्भ

  • +२इत ३:१७
  • +१रा ७:१७

२ इतिहास ४:१३

समासातील संदर्भ

  • +१रा ७:२०; यिर्म ५२:२२

२ इतिहास ४:१४

तळटीपा

  • *

    किंवा “पाण्याच्या हातगाड्या.”

समासातील संदर्भ

  • +१रा ७:२७, ३८

२ इतिहास ४:१५

समासातील संदर्भ

  • +१रा ७:२३, २५

२ इतिहास ४:१६

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३८:३
  • +२इत २:१३, १४

२ इतिहास ४:१७

समासातील संदर्भ

  • +यहो १३:२७, २८

२ इतिहास ४:१८

समासातील संदर्भ

  • +१रा ७:४७; १इत २२:३, १४; यिर्म ५२:२०

२ इतिहास ४:१९

समासातील संदर्भ

  • +२रा २४:१३
  • +निर्ग ३७:२५, २६; प्रक ८:३
  • +१रा ७:४८-५०
  • +निर्ग २५:२३, २४; २इत ४:८

२ इतिहास ४:२०

समासातील संदर्भ

  • +निर्ग २५:३१, ३७

२ इतिहास ४:२२

समासातील संदर्भ

  • +१रा ६:३१, ३२
  • +१रा ६:३३-३५

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

२ इति. ४:१निर्ग ३८:१, २; १रा ८:२२
२ इति. ४:२निर्ग ३०:२०; ३८:८
२ इति. ४:२१रा ७:२३-२६
२ इति. ४:३१रा ६:१८
२ इति. ४:४यिर्म ५२:२०
२ इति. ४:६१रा ७:३८, ३९
२ इति. ४:६लेवी १:९; ९:१४
२ इति. ४:६निर्ग २९:४
२ इति. ४:७१इत २८:१२, १५
२ इति. ४:७निर्ग ३७:१७
२ इति. ४:७निर्ग ४०:२४
२ इति. ४:८२इत ४:१९
२ इति. ४:९१रा ६:३६
२ इति. ४:९निर्ग २७:९; लेवी ६:१६
२ इति. ४:९१रा ७:१२
२ इति. ४:१०१रा ७:३९
२ इति. ४:११निर्ग २७:३
२ इति. ४:१११रा ७:४०-४६
२ इति. ४:१२२इत ३:१७
२ इति. ४:१२१रा ७:१७
२ इति. ४:१३१रा ७:२०; यिर्म ५२:२२
२ इति. ४:१४१रा ७:२७, ३८
२ इति. ४:१५१रा ७:२३, २५
२ इति. ४:१६निर्ग ३८:३
२ इति. ४:१६२इत २:१३, १४
२ इति. ४:१७यहो १३:२७, २८
२ इति. ४:१८१रा ७:४७; १इत २२:३, १४; यिर्म ५२:२०
२ इति. ४:१९२रा २४:१३
२ इति. ४:१९निर्ग ३७:२५, २६; प्रक ८:३
२ इति. ४:१९१रा ७:४८-५०
२ इति. ४:१९निर्ग २५:२३, २४; २इत ४:८
२ इति. ४:२०निर्ग २५:३१, ३७
२ इति. ४:२२१रा ६:३१, ३२
२ इति. ४:२२१रा ६:३३-३५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ इतिहास ४:१-२२

२ इतिहास

४ मग त्याने तांब्याची वेदी+ बनवली. तिची लांबी २० हात, रुंदी २० हात आणि उंची १० हात होती.

२ मग त्याने धातूचा एक मोठा ओतीव गंगाळ-सागर*+ तयार केला. तो गोलाकार असून त्याचा व्यास १० हात आणि त्याची उंची ५ हात होती. त्याचा घेर मोजायला ३० हात लांब दोरी लागायची.+ ३ गंगाळाच्या काठाच्या खाली असलेल्या घेरावर सर्व बाजूंनी खरबुजाच्या आकृत्यांच्या+ दोन रांगा होत्या. एकेका हाताच्या अंतरात दहा-दहा खरबुजांची सजावट केलेली होती. गंगाळाचं ओतीव काम करतानाच त्या रांगा गंगाळासोबत अखंड तयार करण्यात आल्या होत्या. ४ तो गंगाळ-सागर १२ बैलांवर+ ठेवण्यात आला होता. त्यांपैकी तीन बैलांची तोंडं उत्तरेकडे, तीन बैलांची पश्‍चिमेकडे, तीन बैलांची दक्षिणेकडे आणि तीन बैलांची तोंडं पूर्वेकडे होती. त्या बैलांचे मागचे भाग आतल्या बाजूला होते, आणि त्यांच्या पाठींवर गंगाळ-सागर आधारलेला होता. ५ त्या गंगाळाची जाडी चार बोटं* होती. त्याचा काठ एखाद्या प्याल्याच्या काठासारखा, उमललेल्या भुईकमळासारखा* होता. आणि त्यात ३,००० बथ* पाणी मावायचं.

६ मग त्याने दहा छोटी गंगाळं बनवली. त्यांतली पाच त्याने मंदिराच्या उजवीकडे आणि पाच डावीकडे ठेवली.+ त्यांत याजक होमार्पणासाठी वापरल्या जाणाऱ्‍या वस्तू धुवायचे.+ पण मोठा गंगाळ-सागर मात्र याजकांसाठी हातपाय धुवायला होता.+

७ पुढे त्याने, दिलेल्या तपशिलांप्रमाणे+ सोन्याचे दहा दीपवृक्ष* बनवले,+ आणि ते मंदिरात उजवीकडे पाच, तर डावीकडे पाच असे ठेवले.+

८ त्याने दहा मेजंही बनवली आणि ती मंदिरात उजवीकडे पाच व डावीकडे पाच अशी ठेवली.+ तसंच, त्याने सोन्याच्या १०० वाट्याही बनवल्या.

९ मग त्याने याजकांचं+ अंगण,+ मोठं अंगण+ आणि अंगणांचे दरवाजे बनवले, आणि ते दरवाजे तांब्याने मढवले. १० आणि मोठा गंगाळ-सागर मंदिराच्या उजवीकडे, म्हणजे दक्षिणपूर्वेकडे ठेवला.+

११ हीरामने राख काढायच्या बादल्या, फावडी आणि कटोरेसुद्धा बनवले.+

अशा प्रकारे, हीरामने शलमोन राजासाठी खऱ्‍या देवाच्या मंदिराचं सगळं काम पूर्ण केलं. त्याने बनवलेल्या सर्व वस्तू या होत्या:+ १२ दोन स्तंभ+ आणि त्यांच्या वर असलेले कटोऱ्‍याच्या आकाराचे दोन कळस; स्तंभांच्या टोकांवर असलेल्या या कळसांना सजवण्यासाठी दोन नक्षीदार जाळ्या;+ १३ स्तंभांवरचे कळस सजवण्याकरता असलेल्या या दोन जाळ्यांसाठी ४०० डाळिंबं+ (प्रत्येक जाळीवर डाळिंबांच्या दोन रांगा होत्या); १४ हाताने ढकलता येतील अशा दहा गाड्या* आणि त्यांवरची दहा गंगाळं;+ १५ मोठा गंगाळ-सागर आणि त्याच्या खाली असलेले १२ बैल;+ १६ आणि राख काढायच्या बादल्या, फावडी, काटे+ आणि सर्व भांडी. हूराम-अबीव+ याने शलमोन राजाच्या सांगण्यानुसार, यहोवाच्या मंदिरासाठी बनवलेल्या या सर्व वस्तू चकाकी दिलेल्या तांब्याच्या होत्या. १७ राजाने या सर्व वस्तू यार्देन प्रांतात, सुक्कोथच्या+ आणि सरेदाच्या मधल्या प्रदेशात मातीच्या साच्यात ओतून तयार केल्या होत्या. १८ शलमोनने खूप मोठ्या प्रमाणात ही सर्व भांडी बनवली. म्हणून त्यांसाठी नेमकं किती तांबं वापरण्यात आलं ते समजू शकलं नाही.+

१९ शलमोनने खऱ्‍या देवाच्या मंदिरासाठी लागणाऱ्‍या या सर्व वस्तू तयार केल्या:+ सोन्याची वेदी;+ अर्पणाची भाकर+ ठेवण्यासाठी मेजं;+ २० नियमाप्रमाणे आतल्या खोलीसमोर जळत ठेवण्यासाठी शुद्ध सोन्याचे दीपवृक्ष आणि त्यांचे दिवे;+ २१ शुद्ध सोन्याच्या पाकळ्या, दीप आणि चिमटे. २२ शुद्ध सोन्याचे कटोरे, प्याले, धूप जाळण्याची पात्रं आणि आग विझवण्याच्या कातरी; परमपवित्र स्थानाची सोन्याची दोन्ही दारं+ आणि मंदिराची सोन्याची प्रवेशद्वारं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा