२ इतिहास
३ मग शलमोनने यरुशलेममध्ये मोरिया डोंगरावर+ यहोवाच्या मंदिराचं बांधकाम सुरू केलं;+ त्याचे वडील दावीद यांनी अर्णान यबूसीच्या खळ्यात* जी जागा तयार केली होती,+ तिथे त्याने मंदिराचं बांधकाम सुरू केलं. याच डोंगरावर यहोवाने दावीदला दर्शन दिलं होतं.+ २ शलमोनने मंदिराचं बांधकाम आपल्या शासनकाळाच्या, चौथ्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्यातल्या दुसऱ्या दिवशी सुरू केलं. ३ त्याने खऱ्या देवाच्या मंदिराचा जो पाया घातला, तो जुन्या मापाप्रमाणे* ६० हात लांब आणि २० हात रुंद होता.+ ४ मंदिरासमोरच्या द्वारमंडपाची लांबी २० हात, म्हणजे मंदिराच्या रुंदीइतकीच होती आणि त्याची उंची २०* हात होती. शलमोनने त्याची आतली बाजू शुद्ध सोन्याने मढवली.+ ५ त्याने मोठ्या खोलीला* गंधसरूच्या लाकडांचे तक्ते बसवले* आणि ते शुद्ध सोन्याने मढवले.+ त्यानंतर त्याने ते खजुराच्या झाडांच्या आकृत्यांनी+ व साखळ्यांनी सजवले.+ ६ मग त्याने सुंदर अशी मौल्यवान रत्नं बसवून मंदिर सुशोभित केलं.+ आणि त्याने जे सोनं+ वापरलं होतं, ते पर्वाइम इथलं होतं. ७ त्याने संपूर्ण मंदिर, म्हणजे त्याच्या तुळया, उंबरठे, भिंती आणि दारं हे सगळं सोन्याने मढवलं;+ आणि भिंतींवर करुबांच्या आकृत्या कोरल्या.+
८ त्यानंतर त्याने परमपवित्र स्थान बनवलं.+ त्याची रुंदी २० हात होती, आणि त्याची लांबी मंदिराच्या रुंदीइतकीच, म्हणजे २० हात होती. त्याने ते ६०० तालान्त* शुद्ध सोन्याने मढवलं.+ ९ सोन्याच्या खिळ्यांचं वजन ५० शेकेल* होतं; त्याने छतावरच्या खोल्याही सोन्याने मढवल्या.
१० मग त्याने परमपवित्र स्थानासाठी दोन करूब बनवले आणि ते सोन्याने मढवले.+ ११ करुबांच्या पंखांची+ एकूण लांबी २० हात होती. पहिल्या करुबाच्या एका पंखाची लांबी पाच हात असून तो पंख मंदिराच्या एका भिंतीला लागायचा; आणि त्याच्या दुसऱ्या पंखाची लांबी पाच हात असून तो पंख दुसऱ्या करुबाच्या एका पंखाला लागायचा. १२ आणि दुसऱ्या करुबाच्या एका पंखाची लांबी पाच हात असून तो पंख मंदिराच्या दुसऱ्या भिंतीला लागायचा; आणि त्याच्या दुसऱ्या पंखाची लांबी पाच हात असून तो पंख पहिल्या करुबाच्या एका पंखाला लागायचा. १३ या करुबांचे पंख पसरलेले होते आणि त्या पंखांची एकूण लांबी २० हात होती. ते करूब उभे असून त्यांची तोंडं आतल्या बाजूला होती.*
१४ यासोबतच, त्याने निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं सूत आणि चांगल्या प्रतीचं कापड वापरून मंदिराचा पडदाही+ बनवला आणि त्यावर भरतकाम करून करूब बनवले.+
१५ मग त्याने मंदिरासमोर उभे करायला ३५ हात उंचीचे दोन स्तंभ+ बनवले. स्तंभांवरचा प्रत्येक कळस पाच हात उंचीचा होता.+ १६ तसंच, त्याने साखळ्या तयार करून त्या कळसांभोवती लटकवल्या. आणि डाळिंबांच्या १०० आकृत्या बनवून त्या साखळ्यांना लावल्या. १७ मग त्याने ते दोन्ही स्तंभ मंदिराच्या समोर ठेवले; त्याने एक स्तंभ उजवीकडे* आणि एक डावीकडे* ठेवला. त्याने उजवीकडच्या स्तंभाला याखीन,* तर डावीकडच्या स्तंभाला बवाज* असं नाव दिलं.