वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ इतिहास ३१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ इतिहास रूपरेषा

      • हिज्कीया खोटी उपासना मुळासकट काढून टाकतो (१)

      • याजकांची आणि लेव्यांची चांगली व्यवस्था केली जाते (२-२१)

२ इतिहास ३१:१

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +२इत ३०:१, १८
  • +निर्ग २३:२४
  • +अनु ७:५; २रा १८:१, ४; २इत १४:२, ३; ३४:१, ३
  • +अनु १२:२
  • +२इत २३:१६, १७

२ इतिहास ३१:२

समासातील संदर्भ

  • +१इत २३:६; २४:१
  • +२इत ८:१४
  • +१इत २३:१३, २७-३०

२ इतिहास ३१:३

समासातील संदर्भ

  • +२इत ३०:२४
  • +निर्ग २९:३९
  • +गण २८:९
  • +गण १०:१०
  • +अनु १६:१६

२ इतिहास ३१:४

तळटीपा

  • *

    किंवा “यहोवाचा नियम पाळण्यासाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित करता येईल.”

समासातील संदर्भ

  • +गण १८:२१; नहे १०:३८, ३९

२ इतिहास ३१:५

तळटीपा

  • *

    किंवा “दशांश.”

समासातील संदर्भ

  • +गण १८:१२
  • +निर्ग २२:२९; २३:१९; नहे १०:३७
  • +नीत ३:९

२ इतिहास ३१:६

समासातील संदर्भ

  • +लेवी २७:३०; अनु १४:२८

२ इतिहास ३१:७

समासातील संदर्भ

  • +लेवी २३:१६
  • +लेवी २३:२४

२ इतिहास ३१:१०

समासातील संदर्भ

  • +गण १८:८
  • +मला ३:१०

२ इतिहास ३१:११

तळटीपा

  • *

    किंवा “जेवणाच्या खोल्या.”

समासातील संदर्भ

  • +नहे १०:३८, ३९; १२:४४

२ इतिहास ३१:१२

तळटीपा

  • *

    किंवा “दशांश.”

समासातील संदर्भ

  • +लेवी २७:३०; अनु १४:२८

२ इतिहास ३१:१४

समासातील संदर्भ

  • +१इत २६:१७, १९
  • +अनु १२:५, ६; १६:१०
  • +लेवी २:१०; ७:१
  • +गण १८:८

२ इतिहास ३१:१५

समासातील संदर्भ

  • +यहो २१:१९
  • +१इत २४:१

२ इतिहास ३१:१७

समासातील संदर्भ

  • +गण ४:२, ३; ८:२४; १इत २३:२४
  • +१इत २४:४
  • +१इत २३:६

२ इतिहास ३१:१९

समासातील संदर्भ

  • +लेवी २५:३३, ३४; गण ३५:२; यहो २१:१३

२ इतिहास ३१:२१

समासातील संदर्भ

  • +२इत २९:३५

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

२ इति. ३१:१२इत ३०:१, १८
२ इति. ३१:१निर्ग २३:२४
२ इति. ३१:१अनु ७:५; २रा १८:१, ४; २इत १४:२, ३; ३४:१, ३
२ इति. ३१:१अनु १२:२
२ इति. ३१:१२इत २३:१६, १७
२ इति. ३१:२१इत २३:६; २४:१
२ इति. ३१:२२इत ८:१४
२ इति. ३१:२१इत २३:१३, २७-३०
२ इति. ३१:३२इत ३०:२४
२ इति. ३१:३निर्ग २९:३९
२ इति. ३१:३गण २८:९
२ इति. ३१:३गण १०:१०
२ इति. ३१:३अनु १६:१६
२ इति. ३१:४गण १८:२१; नहे १०:३८, ३९
२ इति. ३१:५गण १८:१२
२ इति. ३१:५निर्ग २२:२९; २३:१९; नहे १०:३७
२ इति. ३१:५नीत ३:९
२ इति. ३१:६लेवी २७:३०; अनु १४:२८
२ इति. ३१:७लेवी २३:१६
२ इति. ३१:७लेवी २३:२४
२ इति. ३१:१०गण १८:८
२ इति. ३१:१०मला ३:१०
२ इति. ३१:११नहे १०:३८, ३९; १२:४४
२ इति. ३१:१२लेवी २७:३०; अनु १४:२८
२ इति. ३१:१४१इत २६:१७, १९
२ इति. ३१:१४अनु १२:५, ६; १६:१०
२ इति. ३१:१४लेवी २:१०; ७:१
२ इति. ३१:१४गण १८:८
२ इति. ३१:१५यहो २१:१९
२ इति. ३१:१५१इत २४:१
२ इति. ३१:१७गण ४:२, ३; ८:२४; १इत २३:२४
२ इति. ३१:१७१इत २४:४
२ इति. ३१:१७१इत २३:६
२ इति. ३१:१९लेवी २५:३३, ३४; गण ३५:२; यहो २१:१३
२ इति. ३१:२१२इत २९:३५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ इतिहास ३१:१-२१

२ इतिहास

३१ मग सण साजरा केल्यावर, तिथे हजर असलेले सर्व इस्राएली लोक यहूदातल्या शहरांमध्ये गेले. त्यांनी यहूदा, बन्यामीन, एफ्राईम आणि मनश्‍शे यांच्या संपूर्ण प्रदेशात जाऊन+ तिथल्या पूजेच्या स्तंभांचा चुराडा केला.+ तसंच, त्यांनी पूजेचे खांब* तोडून टाकले+ आणि उच्च स्थानं*+ व वेदी पाडून टाकल्या.+ या सगळ्यांचा पूर्णपणे नाश केल्यानंतर सर्व इस्राएली लोक आपापल्या शहरांत आपापल्या घरी निघून गेले.

२ मग हिज्कीयाने याजकांना आणि लेव्यांना त्यांच्या-त्यांच्या गटांमध्ये संघटित केलं.+ त्याने त्यांना आपली नेमून दिलेली सेवा पूर्ण करण्यासाठी,+ म्हणजे होमार्पणं आणि शांती-अर्पणं देण्यासाठी; तसंच, यहोवाच्या मंदिराच्या अंगणांच्या दरवाजांजवळ सेवा करण्यासाठी, देवाचे आभार मानण्यासाठी आणि त्याची स्तुती करण्यासाठी संघटित केलं.+ ३ इतकंच नाही, तर यहोवाच्या नियमशास्त्रात सांगितलेल्या होमार्पणांसाठी राजाने स्वतःच्या संपत्तीतून काही भाग दिला;+ त्याने सकाळी व संध्याकाळी दिल्या जाणाऱ्‍या होमार्पणांसाठी,+ तसंच शब्बाथाच्या दिवशी,+ नवचंद्राच्या दिवशी+ आणि सणांच्या दिवशी+ दिल्या जाणाऱ्‍या होमार्पणांसाठी स्वतःच्या संपत्तीतून काही भाग दिला.

४ याशिवाय, राजाने यरुशलेममध्ये राहणाऱ्‍या लोकांना अशी आज्ञा दिली, की त्यांनी याजकांना आणि लेव्यांना त्यांच्या हक्काचा भाग द्यावा.+ म्हणजे त्यांना यहोवाच्या नियमाचं काटेकोरपणे पालन करता येईल.* ५ राजाचा हुकूम निघताच, इस्राएली लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या पहिल्या उत्पन्‍नातलं धान्य, नवीन द्राक्षारस, तेल,+ मध आणि शेतातलं बाकीचं पीक आणलं.+ त्यांनी सगळ्या गोष्टींचा दहावा भाग* आणला आणि अशा रितीने भरपूर दान दिलं.+ ६ यहूदाच्या शहरांमध्ये राहणारे यहूदाचे आणि इस्राएलचे लोक यांनीसुद्धा आपल्या गुराढोरांतून आणि मेंढरांतून दहावा भाग आणला. यासोबतच त्यांनी त्यांचा देव यहोवा याच्यासाठी समर्पित केलेल्या पवित्र गोष्टींमधलाही दहावा भाग आणला.+ आणि या सगळ्या गोष्टी दान करून त्यांनी त्यांचे ढिगच्या ढीग रचले. ७ त्यांनी हे दान तिसऱ्‍या महिन्यात+ द्यायला सुरू केलं, आणि सातव्या महिन्यात+ संपवलं. ८ हिज्कीयाने आणि बाकीच्या अधिकाऱ्‍यांनी येऊन जेव्हा दानांचे ढिगारे पाहिले, तेव्हा त्यांनी यहोवाची स्तुती केली आणि इस्राएलच्या लोकांना आशीर्वाद दिला.

९ हिज्कीयाने याजकांना आणि लेव्यांना त्या ढिगाऱ्‍यांबद्दल विचारलं, १० तेव्हा सादोकच्या घराण्यातला मुख्य याजक अजऱ्‍या त्याला म्हणाला: “लोक यहोवाच्या मंदिरात दान आणू लागले,+ तेव्हापासून लोकांना पोटभर खायला मिळतंय आणि भरपूर उरतंयसुद्धा. यहोवाने त्याच्या लोकांना आशीर्वाद दिलाय आणि म्हणून इतकं सगळं उरलंय.”+

११ त्यावर हिज्कीयाने त्यांना यहोवाच्या मंदिरात कोठारं* तयार करायला सांगितली,+ आणि त्यांनी ती तयार केली. १२ ते विश्‍वासूपणे दहावा भाग*+ आणि दान, तसंच पवित्र गोष्टी आत आणत होते. आणि या सगळ्या गोष्टींवर देखरेख करण्यासाठी कोनन्या लेवी याला अधिकारी म्हणून नेमण्यात आलं होतं. त्याच्या खालोखाल त्याचा भाऊ शिमी हा होता. १३ हिज्कीया राजाच्या आज्ञेवरून कोनन्या आणि त्याचा भाऊ शिमी यांचे सहायक म्हणून ज्यांना नेमण्यात आलं ते हे: यहीएल, अजज्या, नहाथ, असाएल, यरीमोथ, योजाबाद, अलीएल, इस्मख्या, महथ व बनाया. अजऱ्‍या हा खऱ्‍या देवाच्या मंदिराची देखरेख करणारा अधिकारी होता. १४ पूर्वेकडच्या दरवाजावरचा द्वारपाल,+ म्हणजे लेवी इम्नाहचा मुलगा कोरे हा खऱ्‍या देवासाठी स्वेच्छेने दिलेल्या अर्पणांची देखरेख करणारा होता.+ तसंच, यहोवाला दिलेलं दान आणि परमपवित्र गोष्टी वाटून देण्याची जबाबदारीही+ त्याच्यावर होती.+ १५ त्याच्या हाताखाली याजकांच्या शहरांमध्ये एदेन, मिन्यामीन, येशूवा, शमाया, अमऱ्‍या आणि शखन्याह ही माणसं होती.+ ती भरवशालायक असून त्यांच्यावर, वेगवेगळ्या गटांत काम करणाऱ्‍या आपल्या सर्व भाऊबंदांना एकसारखा हिस्सा वाटून देण्याची जबाबदारी होती;+ मग त्यांचे भाऊबंद लहान असोत किंवा मोठे. १६ यांच्या शिवाय, वंशावळीत ज्यांची नावं लिहिण्यात आली होती, आणि जे आपापल्या गटाच्या क्रमानुसार दररोज यहोवाच्या मंदिरात येऊन सेवा करायचे, त्यांनाही त्यांचा हिस्सा देण्याची जबाबदारी या माणसांवर होती. यासोबतच, वंशावळीत नोंद असलेल्या तीन वर्षांच्या व त्याहून जास्त वयाच्या मुलांनाही ते हिस्सा द्यायचे.

१७ याजकांची आणि २० वर्षं व त्याहून जास्त वय असलेल्या लेव्यांच्या नावांची नोंद,+ वंशावळीमध्ये त्यांच्या घराण्यांप्रमाणे+ आणि त्यांच्या गटांच्या जबाबदाऱ्‍यांप्रमाणे करण्यात आली होती.+ १८ वंशावळीत त्यांच्या मुला-मुलींची, बायकांची आणि त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांची नावंही नोंदवण्यात आली होती. (त्यांच्यावर पवित्र कामांच्या जबाबदाऱ्‍या सोपवण्यात आल्या होत्या, म्हणून स्वतःला पवित्र ठेवण्याची ते नेहमी काळजी घ्यायचे.) १९ या वंशावळीत अहरोनच्या वंशजांची, म्हणजे आपापल्या शहरांच्या आसपासच्या प्रदेशांत राहणाऱ्‍या याजकांचीही नावं नोंदवण्यात आली होती.+ त्या सगळ्या शहरांमधून काही माणसांना निवडण्यात आलं होतं. आणि त्यांच्यावर याजकांना आणि लेव्यांच्या वंशावळीत नावं असलेल्या सर्वांना त्यांचा हिस्सा वाटून देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

२० हिज्कीयाने संपूर्ण यहूदामध्ये ही व्यवस्था लावून दिली. आणि तो आपला देव यहोवा याच्या नजरेत जे चांगलं आणि जे योग्य ते करत राहिला व त्याला विश्‍वासू राहिला. २१ हिज्कीयाने आपल्या देवाची उपासना करण्यासाठी जे काही काम हाती घेतलं, मग ते खऱ्‍या देवाच्या मंदिरातल्या सेवेच्या बाबतीत असो+ किंवा नियमशास्त्र व त्यात दिलेल्या आज्ञा पाळण्याच्या बाबतीत असो, ते सगळं त्याने पूर्ण मनाने केलं, आणि तो यशस्वी झाला.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा