वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ राजे १४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ राजे रूपरेषा

      • यहूदाचा राजा अमस्या (१-६)

      • अदोम आणि इस्राएल यांच्यासोबत युद्ध (७-१४)

      • इस्राएलचा राजा यहोआशचा मृत्यू (१५, १६)

      • अमस्याचा मृत्यू (१७-२२)

      • इस्राएलचा राजा यराबाम दुसरा (२३-२९)

२ राजे १४:१

समासातील संदर्भ

  • +२रा १३:१०

२ राजे १४:२

समासातील संदर्भ

  • +२इत २५:१-४

२ राजे १४:३

समासातील संदर्भ

  • +१रा १५:५
  • +२इत २४:२

२ राजे १४:४

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

  • *

    किंवा “धूर वर जाण्यासाठी बलिदानं जाळत होते.”

समासातील संदर्भ

  • +१रा १५:१४
  • +२रा १२:१, ३

२ राजे १४:५

समासातील संदर्भ

  • +२रा १२:२०; २इत २४:२५

२ राजे १४:६

समासातील संदर्भ

  • +अनु २४:१६

२ राजे १४:७

समासातील संदर्भ

  • +२शमु ८:१३; १इत १८:१२
  • +२रा ८:२०
  • +२इत २५:११, १२

२ राजे १४:८

समासातील संदर्भ

  • +२इत २५:१७-१९

२ राजे १४:१०

समासातील संदर्भ

  • +२रा १४:७

२ राजे १४:११

समासातील संदर्भ

  • +२इत २५:१५, १६
  • +२इत २५:२०-२४
  • +यहो १५:१०, १२; २१:८, १६

२ राजे १४:१३

तळटीपा

  • *

    सुमारे १७८ मी. (५८४ फूट). अति. ख१४ पाहा.

समासातील संदर्भ

  • +नहे ८:१६; १२:३८, ३९
  • +यिर्म ३१:३८; जख १४:१०

२ राजे १४:१६

तळटीपा

  • *

    शब्दशः “तो आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”

  • *

    म्हणजे, यराबाम दुसरा.

समासातील संदर्भ

  • +२रा १०:३५; १३:९
  • +होशे १:१; आम १:१; ७:१०

२ राजे १४:१७

समासातील संदर्भ

  • +२रा १४:१
  • +२रा १३:१०
  • +२इत २५:२५-२८

२ राजे १४:१९

समासातील संदर्भ

  • +२रा १२:२०

२ राजे १४:२०

समासातील संदर्भ

  • +१रा २:१०

२ राजे १४:२१

तळटीपा

  • *

    म्हणजे, “यहोवाने मदत केली आहे.” २रा १५:१३; २इति २६:१-२३; यश ६:१; आणि जख १४:५ या वचनांत त्याला उज्जीया म्हटलं आहे.

समासातील संदर्भ

  • +मत्त १:८
  • +२इत २६:१
  • +२रा १५:१, २

२ राजे १४:२२

तळटीपा

  • *

    शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजल्यानंतर.”

समासातील संदर्भ

  • +अनु २:८; १रा ९:२६; २रा १६:६
  • +२इत २६:२

२ राजे १४:२३

समासातील संदर्भ

  • +होशे १:१; आम १:१

२ राजे १४:२४

समासातील संदर्भ

  • +१रा १२:२८-३०; १३:३४; स्तो १०६:२०

२ राजे १४:२५

तळटीपा

  • *

    किंवा “हमाथच्या प्रवेशद्वारापासून.”

  • *

    म्हणजे, क्षार समुद्र, किंवा मृत समुद्र.

समासातील संदर्भ

  • +गण १३:२१; ३४:२, ७, ८
  • +अनु ३:१६, १७
  • +योन १:१; मत्त १२:३९
  • +यहो १९:१०, १३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अनुकरण, पृ. १२५

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२००९, पृ. २८

२ राजे १४:२६

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३:७; शास १०:१६; स्तो १०६:४३, ४४

२ राजे १४:२७

समासातील संदर्भ

  • +यिर्म ३१:२०
  • +२रा १३:४, ५

२ राजे १४:२८

समासातील संदर्भ

  • +२शमु ८:६
  • +२इत ८:३

२ राजे १४:२९

तळटीपा

  • *

    शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”

समासातील संदर्भ

  • +२रा १५:८

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

२ राजे १४:१२रा १३:१०
२ राजे १४:२२इत २५:१-४
२ राजे १४:३१रा १५:५
२ राजे १४:३२इत २४:२
२ राजे १४:४१रा १५:१४
२ राजे १४:४२रा १२:१, ३
२ राजे १४:५२रा १२:२०; २इत २४:२५
२ राजे १४:६अनु २४:१६
२ राजे १४:७२शमु ८:१३; १इत १८:१२
२ राजे १४:७२रा ८:२०
२ राजे १४:७२इत २५:११, १२
२ राजे १४:८२इत २५:१७-१९
२ राजे १४:१०२रा १४:७
२ राजे १४:११२इत २५:१५, १६
२ राजे १४:११२इत २५:२०-२४
२ राजे १४:११यहो १५:१०, १२; २१:८, १६
२ राजे १४:१३नहे ८:१६; १२:३८, ३९
२ राजे १४:१३यिर्म ३१:३८; जख १४:१०
२ राजे १४:१६२रा १०:३५; १३:९
२ राजे १४:१६होशे १:१; आम १:१; ७:१०
२ राजे १४:१७२रा १४:१
२ राजे १४:१७२रा १३:१०
२ राजे १४:१७२इत २५:२५-२८
२ राजे १४:१९२रा १२:२०
२ राजे १४:२०१रा २:१०
२ राजे १४:२१मत्त १:८
२ राजे १४:२१२इत २६:१
२ राजे १४:२१२रा १५:१, २
२ राजे १४:२२अनु २:८; १रा ९:२६; २रा १६:६
२ राजे १४:२२२इत २६:२
२ राजे १४:२३होशे १:१; आम १:१
२ राजे १४:२४१रा १२:२८-३०; १३:३४; स्तो १०६:२०
२ राजे १४:२५गण १३:२१; ३४:२, ७, ८
२ राजे १४:२५अनु ३:१६, १७
२ राजे १४:२५योन १:१; मत्त १२:३९
२ राजे १४:२५यहो १९:१०, १३
२ राजे १४:२६निर्ग ३:७; शास १०:१६; स्तो १०६:४३, ४४
२ राजे १४:२७यिर्म ३१:२०
२ राजे १४:२७२रा १३:४, ५
२ राजे १४:२८२शमु ८:६
२ राजे १४:२८२इत ८:३
२ राजे १४:२९२रा १५:८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ राजे १४:१-२९

२ राजे

१४ इस्राएलचा राजा यहोआहाज+ याच्या मुलाच्या, म्हणजे यहोआशच्या शासनकाळाच्या दुसऱ्‍या वर्षी, यहूदाचा राजा यहोआश याचा मुलगा अमस्या हा राजा बनला. २ अमस्या राजा बनला तेव्हा तो २५ वर्षांचा होता. त्याने यरुशलेममधून २९ वर्षं राज्य केलं. त्याच्या आईचं नाव यहोअद्दीन असून ती यरुशलेमची राहणारी होती.+ ३ अमस्या यहोवाच्या नजरेत जे योग्य ते करत राहिला; मात्र आपला पूर्वज दावीद याच्याइतकं नाही.+ त्याचे वडील यहोआश यांच्यासारखंच त्याने सगळं काही केलं.+ ४ पण उपासनेची उच्च स्थानं* काढून टाकण्यात आली नव्हती.+ आणि लोक अजूनही उच्च स्थानांवर बलिदानं अर्पण करत होते व बलिदानांचं हवन करत होते.*+ ५ अमस्याने राज्यावरची आपली पकड मजबूत करताच आपल्या वडिलांचा खून करणाऱ्‍या आपल्या सेवकांना ठार मारलं.+ ६ पण त्या सेवकांच्या मुलांना त्याने ठार मारलं नाही. कारण, यहोवाने मोशेच्या नियमशास्त्रात अशी आज्ञा दिली होती: “मुलांच्या पापासाठी वडिलांना, किंवा वडिलांच्या पापासाठी मुलांना ठार मारलं जाऊ नये. तर प्रत्येकाला स्वतःच्याच पापासाठी ठार मारलं जावं.”+ ७ मग अमस्याने क्षार खोऱ्‍यात+ अदोमच्या+ १०,००० माणसांना ठार मारलं. त्याने युद्ध करून सेला शहर काबीज केलं+ आणि त्याला यकथेल असं नाव दिलं; आजपर्यंत ते याच नावाने ओळखलं जातं.

८ मग अमस्याने इस्राएलचा राजा येहू याच्या नातवाला, म्हणजे यहोआहाजचा मुलगा यहोआश याला दूतांच्या हातून असा संदेश पाठवला: “चल, युद्ध करायला ये! आपण समोरासमोर लढू.”+ ९ त्यावर इस्राएलचा राजा यहोआश याने यहूदाचा राजा अमस्या याला असं उत्तर दिलं: “लबानोनच्या काटेरी झुडपाने लबानोनच्या देवदार वृक्षाला एकदा असा निरोप पाठवला: ‘तुझी मुलगी माझ्या मुलाला बायको म्हणून दे.’ पण लबानोनच्या एका जंगली प्राण्याने तिथून जाताना, त्या काटेरी झुडपाला आपल्या पायांखाली तुडवलं. १० हे खरंय, की तू अदोमला हरवलंस,+ आणि यामुळे तुझं मन गर्वाने फुगलंय. तर आता आपल्या घरातच बसून विजयाचा आनंद घे. संकटाला आमंत्रण का देतोस? स्वतःसोबत यहूदालाही संकटात का पाडतोस?” ११ पण अमस्याने त्याचं ऐकलं नाही.+

म्हणून इस्राएलचा राजा यहोआश यहूदाच्या राजाशी, अमस्याशी युद्ध करायला गेला. आणि ते यहूदामधल्या+ बेथ-शेमेश+ या ठिकाणी एकमेकांशी लढले. १२ युद्धात इस्राएलने यहूदाला हरवलं, आणि यहूदाचे सगळे सैनिक घरी पळून गेले. १३ मग इस्राएलचा राजा यहोआश याने बेथ-शेमेश इथे यहूदाचा राजा अमस्या याला बंदी बनवलं (अमस्या हा अहज्याचा नातू आणि यहोआशचा मुलगा होता). यहोआशने अमस्याला बंदी बनवून यरुशलेमला आणलं. तिथे त्याने यरुशलेमच्या भिंतीचा ४०० हात* लांब भाग, म्हणजे एफ्राईमच्या दरवाजापासून+ कोपऱ्‍याच्या दरवाजापर्यंतचा+ भाग तोडून टाकला. १४ मग त्याने यहोवाच्या मंदिरात आणि राजमहालाच्या भांडारांत असलेलं सगळं सोनं, चांदी व सगळ्या वस्तू लुटल्या; आणि लोकांना बंदी बनवून तो शोमरोनला परत गेला.

१५ यहोआशबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने केलेली पराक्रमाची कामं आणि तो यहूदाचा राजा अमस्या याच्याशी कसा लढला; तसंच, त्याने जे काही केलं ते सर्व इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. १६ मग यहोआशचा मृत्यू झाला* आणि त्याला शोमरोनात इस्राएलच्या राजांच्या कबरेत दफन करण्यात आलं.+ त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा यराबाम*+ त्याच्या जागी राजा बनला.

१७ यहूदाचा राजा यहोआश याचा मुलगा अमस्या+ हा इस्राएलचा राजा यहोआहाज याच्या मुलाच्या, म्हणजे यहोआशच्या+ मृत्यूनंतर आणखी १५ वर्षं जगला.+ १८ अमस्याबद्दलची बाकीची माहिती, यहूदाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आली आहे. १९ पुढे अमस्याविरुद्ध यरुशलेममध्ये कट रचण्यात आला;+ म्हणून तो लाखीशला पळून गेला. पण त्याच्या शत्रूंनी लाखीशला त्याच्यामागे माणसं पाठवली आणि त्याला ठार मारलं. २० मग, त्यांनी त्याचा मृतदेह घोड्यावर टाकून यरुशलेममध्ये परत आणला; आणि दावीदपुरात त्याच्या पूर्वजांच्या कबरेत त्याला दफन केलं.+ २१ त्यानंतर यहूदाच्या सर्व लोकांनी अमस्याचा मुलगा अजऱ्‍या*+ याला त्याच्या वडिलांच्या जागी राजा बनवलं.+ त्या वेळी अजऱ्‍या १६ वर्षांचा होता.+ २२ अमस्या राजाचा मृत्यू झाल्यानंतर* अजऱ्‍याने एलाथ+ शहर पुन्हा बांधलं आणि ते यहूदाच्या सत्तेखाली आणलं.+

२३ यहूदाच्या राजाचा मुलगा, म्हणजे यहोआशचा मुलगा अमस्या याच्या शासनकाळाच्या १५ व्या वर्षी, इस्राएलचा राजा यहोआश याचा मुलगा यराबाम+ हा शोमरोनात राजा बनला; त्याने ४१ वर्षं राज्य केलं. २४ यहोवाच्या नजरेत जे वाईट ते तो करत राहिला. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जी पापं करायला लावली होती,+ ती त्याने सोडली नाहीत. २५ त्याने लबो-हमाथपासून*+ थेट अराबाच्या+ समुद्रापर्यंतचा* इस्राएलचा संपूर्ण प्रदेश परत मिळवला. इस्राएलचा देव यहोवा याने आपल्या सेवकाद्वारे, म्हणजे योना संदेष्ट्याद्वारे जे सांगितलं होतं त्याप्रमाणे त्याने हे केलं; योना+ हा अमित्तय याचा मुलगा असून गथ-हेफेर+ इथला राहणारा होता. २६ यहोवाने पाहिलं होतं, की इस्राएलला किती दुःख सहन करावं लागत आहे.+ शिवाय, इस्राएलला मदत करण्यासाठी कोणीही उरला नव्हता; अगदी लाचार किंवा दुर्बळ माणूसही उरला नव्हता. २७ पण यहोवाने अशी शपथ घेतली होती, की तो पृथ्वीवरून इस्राएलचं नाव कधीही मिटवून टाकणार नाही.+ म्हणून त्याने यहोआशचा मुलगा यराबाम याचा उपयोग करून इस्राएलला वाचवलं.+

२८ यराबामबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने केलेली पराक्रमाची कामं, तो कसा लढला आणि त्याने कशा प्रकारे दिमिष्क+ आणि हमाथ+ हे यहूदा व इस्राएलच्या सत्तेखाली परत आणलं; तसंच, त्याने जे काही केलं ते सर्व इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. २९ मग यराबामचा मृत्यू झाला* आणि त्याला इस्राएलच्या राजांच्या कबरेत दफन करण्यात आलं. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जखऱ्‍या+ त्याच्या जागी राजा बनला.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा