वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ राजे १३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ राजे रूपरेषा

      • इस्राएलचा राजा यहोआहाज (१-९)

      • इस्राएलचा राजा यहोआश (१०-१३)

      • अलीशा यहोआशच्या आवेशाची परीक्षा घेतो (१४-१९)

      • अलीशाचा मृत्यू; त्याच्या हाडांच्या स्पर्शाने एका माणसाचं पुनरुत्थान (२०, २१)

      • अलीशाची शेवटची भविष्यवाणी पूर्ण होते (२२-२५)

२ राजे १३:१

समासातील संदर्भ

  • +२रा ८:२६; ९:२७
  • +२रा ११:२, २१
  • +२रा १०:३०, ३५

२ राजे १३:२

समासातील संदर्भ

  • +१रा १२:२८-३०; १३:३३; १४:१६

२ राजे १३:३

समासातील संदर्भ

  • +इब्री १२:२९
  • +लेवी २६:१४, १७
  • +१रा १९:१७; २रा ८:१२
  • +२रा १३:२४

२ राजे १३:४

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३:७; शास १०:१६; २रा १४:२६, २७

२ राजे १३:५

समासातील संदर्भ

  • +नहे ९:२७

२ राजे १३:६

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +२रा १०:२९; १७:२१
  • +अनु ७:५; १रा १४:१५; १६:३३

२ राजे १३:७

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +२रा ८:१२; १०:३२
  • +आम १:३

२ राजे १३:९

तळटीपा

  • *

    शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”

समासातील संदर्भ

  • +२रा १०:३५

२ राजे १३:१०

समासातील संदर्भ

  • +२रा १४:१

२ राजे १३:११

समासातील संदर्भ

  • +२रा १०:२९

२ राजे १३:१२

समासातील संदर्भ

  • +२रा १४:८, १३

२ राजे १३:१३

तळटीपा

  • *

    शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”

  • *

    म्हणजे, यराबाम दुसरा.

समासातील संदर्भ

  • +२रा १०:३५; १३:९
  • +२रा १४:२८

२ राजे १३:१४

समासातील संदर्भ

  • +१रा १९:१६
  • +२रा २:११, १२

२ राजे १३:१७

तळटीपा

  • *

    किंवा “त्याला हरवशील.”

समासातील संदर्भ

  • +१शमु २९:१; १रा २०:२६

२ राजे १३:१९

समासातील संदर्भ

  • +२रा १३:२५

२ राजे १३:२०

तळटीपा

  • *

    कदाचित वसंत ऋतूत.

समासातील संदर्भ

  • +२रा १:१; २४:२

२ राजे १३:२१

समासातील संदर्भ

  • +योह ११:४४; इब्री ११:३५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०१७, पृ. ५

    टेहळणी बुरूज,

    ८/१/२००५, पृ. ११

२ राजे १३:२२

समासातील संदर्भ

  • +१रा १९:१५
  • +२रा ८:१२; १०:३२

२ राजे १३:२३

समासातील संदर्भ

  • +२रा १४:२६, २७
  • +उत्प १३:१४-१६
  • +उत्प २६:३
  • +उत्प २८:१३; स्तो १०५:८; मीख ७:२०

२ राजे १३:२५

समासातील संदर्भ

  • +२रा १३:१९

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

२ राजे १३:१२रा ८:२६; ९:२७
२ राजे १३:१२रा ११:२, २१
२ राजे १३:१२रा १०:३०, ३५
२ राजे १३:२१रा १२:२८-३०; १३:३३; १४:१६
२ राजे १३:३इब्री १२:२९
२ राजे १३:३लेवी २६:१४, १७
२ राजे १३:३१रा १९:१७; २रा ८:१२
२ राजे १३:३२रा १३:२४
२ राजे १३:४निर्ग ३:७; शास १०:१६; २रा १४:२६, २७
२ राजे १३:५नहे ९:२७
२ राजे १३:६२रा १०:२९; १७:२१
२ राजे १३:६अनु ७:५; १रा १४:१५; १६:३३
२ राजे १३:७२रा ८:१२; १०:३२
२ राजे १३:७आम १:३
२ राजे १३:९२रा १०:३५
२ राजे १३:१०२रा १४:१
२ राजे १३:११२रा १०:२९
२ राजे १३:१२२रा १४:८, १३
२ राजे १३:१३२रा १०:३५; १३:९
२ राजे १३:१३२रा १४:२८
२ राजे १३:१४१रा १९:१६
२ राजे १३:१४२रा २:११, १२
२ राजे १३:१७१शमु २९:१; १रा २०:२६
२ राजे १३:१९२रा १३:२५
२ राजे १३:२०२रा १:१; २४:२
२ राजे १३:२१योह ११:४४; इब्री ११:३५
२ राजे १३:२२१रा १९:१५
२ राजे १३:२२२रा ८:१२; १०:३२
२ राजे १३:२३२रा १४:२६, २७
२ राजे १३:२३उत्प १३:१४-१६
२ राजे १३:२३उत्प २६:३
२ राजे १३:२३उत्प २८:१३; स्तो १०५:८; मीख ७:२०
२ राजे १३:२५२रा १३:१९
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ राजे १३:१-२५

२ राजे

१३ यहूदाचा राजा अहज्या+ याच्या मुलाच्या, म्हणजे यहोआशच्या+ शासनकाळाच्या २३ व्या वर्षी, येहूचा मुलगा यहोआहाज राजा बनला.+ त्याने शोमरोन इथून १७ वर्षं इस्राएलवर राज्य केलं. २ यहोआहाजने यहोवाच्या नजरेत जे वाईट ते केलं. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जे पाप करायला लावलं होतं,+ तेच तो करत राहिला; त्याने ते करायचं सोडलं नाही. ३ म्हणून इस्राएलवर यहोवाचा क्रोध+ भडकला+ आणि त्याने त्यांना सीरियाचा राजा हजाएल+ व त्याचा मुलगा बेन-हदाद+ यांच्या हाती दिलं; आणि त्यांनी बराच काळ इस्राएलवर अत्याचार केले.

४ तेव्हा, यहोआहाजने मदतीसाठी यहोवाकडे याचना केली आणि यहोवाने ती ऐकली. कारण सीरियाच्या राजाने इस्राएलवर किती अत्याचार केले होते ते देवाने पाहिलं होतं.+ ५ म्हणून सीरियाच्या तावडीतून इस्राएलची सुटका करण्यासाठी यहोवाने एक वाचवणारा पाठवला.+ त्यानंतर इस्राएली लोक आधीसारखंच आपापल्या घरांत शांतीने राहू लागले. ६ (असं असलं, तरी यराबामच्या घराण्याने इस्राएलला जे पाप करायला लावलं होतं,+ ते करण्याचं त्यांनी सोडलं नाही; ते पाप ते करतच राहिले. तसंच, शोमरोनमध्ये असलेला पूजेचा खांबही*+ त्यांनी काढून टाकला नाही.) ७ यहोआहाजकडे आता फक्‍त ५० घोडेस्वार, १० रथ आणि १०,००० पायदळ सैनिक उरले होते. कारण सीरियाच्या राजाने त्याच्या बाकीच्या सैन्याचा नाश केला होता;+ मळणीच्या वेळी खळ्यात* तुडवल्या गेलेल्या धुळीसारखा त्याने त्यांचा नाश केला होता.+

८ यहोआहाजबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने केलेली पराक्रमाची कामं आणि त्याने जे काही केलं, ते सर्व इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. ९ मग यहोआहाजचा मृत्यू झाला* आणि त्याला शोमरोनात दफन करण्यात आलं.+ त्याच्या जागी त्याचा मुलगा यहोआश राजा बनला.

१० यहूदाचा राजा यहोआश याच्या शासनकाळाच्या ३७ व्या वर्षी यहोआहाजचा मुलगा यहोआश+ राजा बनला; त्याने शोमरोनमधून १६ वर्षं इस्राएलवर राज्य केलं. ११ यहोवाच्या नजरेत जे वाईट, ते तो करत राहिला. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जी पापं करायला लावली होती,+ ती सगळी तो करत राहिला; त्याने ती सोडली नाहीत.

१२ यहोआशबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने केलेली पराक्रमाची कामं आणि त्याने जे काही केलं; तसंच, यहूदाचा राजा अमस्या याच्याशी तो कसा लढला+ ते सर्व इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. १३ मग यहोआशचा मृत्यू झाला* आणि त्याला शोमरोनात इस्राएलच्या राजांच्या कबरेत दफन करण्यात आलं.+ त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा यराबाम*+ राजासनावर बसला.

१४ एकदा अलीशा+ आजारी पडला आणि पुढे त्याच आजाराने त्याचा मृत्यू झाला. तो आजारी असताना इस्राएलचा राजा यहोआश त्याला भेटायला आला होता. तो अलीशासमोर रडून म्हणू लागला: “माझ्या पित्या, माझ्या पित्या! पाहा, इस्राएलचा रथ आणि त्याचे घोडेस्वार!”+ १५ तेव्हा अलीशा त्याला म्हणाला: “धनुष्य आणि बाण घे.” म्हणून त्याने धनुष्य आणि काही बाण घेतले. १६ मग तो इस्राएलच्या राजाला म्हणाला: “धनुष्यावर आपला हात ठेव.” तेव्हा राजाने धनुष्यावर हात ठेवला. नंतर अलीशाने राजाच्या हातांवर आपले हात ठेवले. १७ अलीशा पुढे म्हणाला: “पूर्वेकडची खिडकी उघड!” तेव्हा त्याने ती उघडली. मग अलीशा म्हणाला: “बाण सोड!” तेव्हा त्याने बाण सोडला. अलीशा मग म्हणाला: “हा सीरियावर विजय मिळवून देणारा, यहोवाचा विजयाचा बाण! तू अफेक+ इथे सीरियाचं नामोनिशाण मिटेपर्यंत त्याचा नाश करशील.”*

१८ अलीशा पुढे म्हणाला: “बाण घे.” तेव्हा इस्राएलच्या राजाने हातात काही बाण घेतले. मग अलीशा म्हणाला: “जमिनीवर बाण मार.” तेव्हा राजाने तीन वेळा जमिनीवर बाण मारले आणि तो थांबला. १९ त्यावर खऱ्‍या देवाच्या माणसाला खूप राग आला आणि तो म्हणाला: “तू पाच-सहा वेळा तरी जमिनीवर बाण मारायला हवे होते! तसं केलं असतं, तर सीरियाचं नामोनिशाण मिटेपर्यंत तू त्याचा नाश केला असता. पण आता तू फक्‍त तीन वेळा सीरियाला हरवशील.”+

२० मग अलीशाचा मृत्यू झाला आणि त्याला दफन करण्यात आलं. त्यानंतर, दर वर्षाच्या सुरुवातीला* इस्राएल देशात लूटमार करणाऱ्‍या मवाबी टोळ्या यायच्या.+ २१ एकदा, काही लोक एका मेलेल्या माणसाला दफन करत असताना त्यांना लूटमार करणारी एक टोळी दिसली. टोळी पाहताच त्यांनी त्याला अलीशाच्या कबरेत फेकलं आणि ते तिथून पळून गेले. अलीशाच्या हाडांचा स्पर्श होताच, तो मेलेला माणूस जिवंत झाला+ आणि उठून उभा राहिला.

२२ यहोआहाज राज्य करत होता, त्या संपूर्ण काळात सीरियाचा राजा हजाएल+ याने इस्राएली लोकांवर अत्याचार केले.+ २३ पण यहोवाने त्यांच्यावर कृपा केली आणि त्यांना दया दाखवली;+ अब्राहाम,+ इसहाक+ आणि याकोब यांच्याशी केलेल्या करारामुळे+ त्याला त्यांची काळजी वाटली. त्याला त्यांचा नाश करायची इच्छा नव्हती. म्हणून आजपर्यंत त्याने त्यांना आपल्यासमोरून घालवून दिलं नाही. २४ सीरियाच्या राजाचा, हजाएलचा मृत्यू झाल्यावर त्याचा मुलगा बेन-हदाद त्याच्या जागी राजा बनला. २५ तेव्हा यहोआहाजचा मुलगा यहोआश याने हजाएलच्या मुलाकडून, बेन-हदादकडून आपली सगळी शहरं परत घेतली. ही शहरं बेन-हदादने यहोआशच्या वडिलांशी लढाई करून, म्हणजे यहोआहाजशी लढाई करून घेतली होती. यहोआशने त्याला तीन वेळा हरवून+ इस्राएलची शहरं त्याच्याकडून परत मिळवली.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा