वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ शमुवेल २४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ शमुवेल रूपरेषा

      • लोकांची मोजणी करून दावीदने केलेलं पाप (१-१४)

      • साथीच्या रोगामुळे ७०,००० लोकांचा मृत्यू (१५-१७)

      • दावीद वेदी बांधतो (१८-२५)

        • किंमत चुकवल्याशिवाय बलिदान नाही (२४)

२ शमुवेल २४:१

समासातील संदर्भ

  • +२शमु २१:१
  • +१इत २१:१-३
  • +१इत २७:२३, २४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००५, पृ. ११

२ शमुवेल २४:२

समासातील संदर्भ

  • +२शमु ८:१६; २०:२३
  • +शास २०:१

२ शमुवेल २४:४

समासातील संदर्भ

  • +गण १:२; १इत २१:४

२ शमुवेल २४:५

तळटीपा

  • *

    किंवा “दक्षिणेकडे.”

समासातील संदर्भ

  • +अनु २:३६; यहो १३:८, ९
  • +गण ३२:३४, ३५

२ शमुवेल २४:६

समासातील संदर्भ

  • +गण ३२:४०
  • +उत्प १०:१५; ४९:१३; यहो ११:८

२ शमुवेल २४:७

समासातील संदर्भ

  • +यहो १९:२४, २९
  • +यहो ११:१९
  • +यहो १५:१
  • +उत्प २१:३१; यहो १५:२१, २८

२ शमुवेल २४:९

समासातील संदर्भ

  • +गण २:३२; २६:५१; १इत २१:५, ६; २७:२३

२ शमुवेल २४:१०

तळटीपा

  • *

    किंवा “दावीदचा विवेक त्याला बोचू लागला.”

समासातील संदर्भ

  • +१शमु २४:५; रोम २:१५
  • +२शमु १२:१३
  • +स्तो १३०:३; होशे १४:२; १यो १:९
  • +१इत २१:८-१३

२ शमुवेल २४:११

समासातील संदर्भ

  • +१शमु २२:५; १इत २९:२९

२ शमुवेल २४:१२

समासातील संदर्भ

  • +नीत ३:१२

२ शमुवेल २४:१३

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:१८, २०; २शमु २१:१
  • +लेवी २६:१४, १७
  • +लेवी २६:१६

२ शमुवेल २४:१४

समासातील संदर्भ

  • +स्तो १०३:८; ११९:१५६
  • +इब्री १२:६
  • +२इत २८:१, ५

२ शमुवेल २४:१५

समासातील संदर्भ

  • +गण १६:४६; १इत २७:२४
  • +२शमु २४:२
  • +१इत २१:१४, १५

२ शमुवेल २४:१६

तळटीपा

  • *

    किंवा “पस्तावा झाला.”

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +स्तो ७८:३८; यिर्म २६:१९; योए २:१३
  • +२इत ३:१
  • +उत्प १०:१५, १६; यहो १५:८

२ शमुवेल २४:१७

समासातील संदर्भ

  • +स्तो ९५:७
  • +१इत २१:१६, १७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००५, पृ. ११

२ शमुवेल २४:१८

समासातील संदर्भ

  • +१इत २१:१८-२३; २इत ३:१

२ शमुवेल २४:२१

समासातील संदर्भ

  • +गण १६:४६, ४७; २५:८; २शमु २४:१५

२ शमुवेल २४:२२

तळटीपा

  • *

    शब्दशः “त्यांच्या दृष्टीने जे योग्य आहे ते.”

  • *

    शब्दार्थसूचीत “जू” पाहा.

२ शमुवेल २४:२३

तळटीपा

  • *

    शब्दशः “अरवना.”

२ शमुवेल २४:२४

तळटीपा

  • *

    एक शेकेल म्हणजे ११.४ ग्रॅम. अति. ख१४ पाहा.

समासातील संदर्भ

  • +१इत २१:२४-२८

२ शमुवेल २४:२५

समासातील संदर्भ

  • +निर्ग २०:२५; १इत २२:१
  • +२शमु २१:१४; २इत ३३:१३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

२ शमु. २४:१२शमु २१:१
२ शमु. २४:११इत २१:१-३
२ शमु. २४:११इत २७:२३, २४
२ शमु. २४:२२शमु ८:१६; २०:२३
२ शमु. २४:२शास २०:१
२ शमु. २४:४गण १:२; १इत २१:४
२ शमु. २४:५अनु २:३६; यहो १३:८, ९
२ शमु. २४:५गण ३२:३४, ३५
२ शमु. २४:६गण ३२:४०
२ शमु. २४:६उत्प १०:१५; ४९:१३; यहो ११:८
२ शमु. २४:७यहो १९:२४, २९
२ शमु. २४:७यहो ११:१९
२ शमु. २४:७यहो १५:१
२ शमु. २४:७उत्प २१:३१; यहो १५:२१, २८
२ शमु. २४:९गण २:३२; २६:५१; १इत २१:५, ६; २७:२३
२ शमु. २४:१०१शमु २४:५; रोम २:१५
२ शमु. २४:१०२शमु १२:१३
२ शमु. २४:१०स्तो १३०:३; होशे १४:२; १यो १:९
२ शमु. २४:१०१इत २१:८-१३
२ शमु. २४:१११शमु २२:५; १इत २९:२९
२ शमु. २४:१२नीत ३:१२
२ शमु. २४:१३लेवी २६:१८, २०; २शमु २१:१
२ शमु. २४:१३लेवी २६:१४, १७
२ शमु. २४:१३लेवी २६:१६
२ शमु. २४:१४स्तो १०३:८; ११९:१५६
२ शमु. २४:१४इब्री १२:६
२ शमु. २४:१४२इत २८:१, ५
२ शमु. २४:१५गण १६:४६; १इत २७:२४
२ शमु. २४:१५२शमु २४:२
२ शमु. २४:१५१इत २१:१४, १५
२ शमु. २४:१६स्तो ७८:३८; यिर्म २६:१९; योए २:१३
२ शमु. २४:१६२इत ३:१
२ शमु. २४:१६उत्प १०:१५, १६; यहो १५:८
२ शमु. २४:१७स्तो ९५:७
२ शमु. २४:१७१इत २१:१६, १७
२ शमु. २४:१८१इत २१:१८-२३; २इत ३:१
२ शमु. २४:२१गण १६:४६, ४७; २५:८; २शमु २४:१५
२ शमु. २४:२४१इत २१:२४-२८
२ शमु. २४:२५निर्ग २०:२५; १इत २२:१
२ शमु. २४:२५२शमु २१:१४; २इत ३३:१३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ शमुवेल २४:१-२५

२ शमुवेल

२४ यहोवाचा क्रोध पुन्हा एकदा इस्राएलवर भडकला.+ कारण, दावीदला कोणी इस्राएलविरुद्ध प्रवृत्त करून असं म्हटलं: “जा आणि इस्राएल व यहूदाच्या माणसांची+ मोजणी कर.”+ २ म्हणून, राजा आपल्यासोबत असलेल्या सेनापतीला, यवाबला+ म्हणाला: “दानपासून बैर-शेबापर्यंत+ इस्राएलच्या सगळ्या वंशांत जा आणि लोकांची नोंदणी कर. म्हणजे त्यांची संख्या किती आहे ते मला कळेल.” ३ पण यवाब राजाला म्हणाला: “माझे प्रभू, माझे राजे, तुमचा देव यहोवा हा लोकांची संख्या १०० पटींनी वाढवो आणि तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी ते पाहोत. पण माझ्या प्रभूला, राजाला ही गोष्ट का करावीशी वाटते?”

४ पण राजाच्या म्हणण्यापुढे यवाबचं आणि इतर सेनापतींचं काहीही चाललं नाही. म्हणून मग ते इस्राएलच्या लोकांची नोंदणी करायला राजापुढून निघून गेले.+ ५ त्यांनी यार्देन नदी पार करून अरोएर+ शहरात तळ दिला; त्यांनी शहराच्या उजवीकडे* खोऱ्‍याच्या मधोमध तळ दिला. तिथून ते गाद वंशाच्या प्रदेशाकडे आणि पुढे याजेर+ शहराकडे गेले. ६ त्यानंतर ते गिलाद+ आणि तहतीम-होदशी या प्रदेशांत गेले. पुढे ते दान-यान इथे गेले आणि तिथून वळसा घालून सीदोनला+ गेले. ७ मग ते सोरच्या+ किल्ल्यात आणि हिव्वी+ व कनानी लोकांच्या सगळ्या शहरांत गेले. आणि शेवटी ते यहूदाच्या नेगेबकडे+ असलेल्या बैर-शेबात+ गेले. ८ अशा प्रकारे ते संपूर्ण देशातून फिरले आणि नऊ महिने व २० दिवसांनंतर यरुशलेमला परत आले. ९ मग यवाबने नोंदणी केलेल्या लोकांची संख्या राजाला सांगितली. तलवार चालवणाऱ्‍या इस्राएलमधल्या योद्ध्यांची संख्या ८,००,००० आणि यहूदामधल्या माणसांची संख्या ५,००,००० इतकी होती.+

१० पण लोकांची संख्या मोजल्यानंतर दावीदचं मन त्याला खाऊ लागलं.*+ म्हणून तो यहोवाला म्हणाला: “हे यहोवा! मी हे काम करून खूप मोठं पाप केलंय.+ कृपा करून आपल्या या सेवकाचा अपराध माफ कर;+ मी खरंच, खूप मूर्खपणे वागलोय.”+ ११ दावीद सकाळी उठला तेव्हा यहोवा गाद+ संदेष्ट्याला, म्हणजे दावीदच्या दृष्टान्त पाहणाऱ्‍याला म्हणाला: १२ “दावीदकडे जा आणि त्याला म्हण, ‘यहोवा असं म्हणतो: “मी तुझ्यासमोर तीन पर्याय ठेवतो. त्यातला एक निवड, म्हणजे त्याप्रमाणे मी तुझ्या बाबतीत करीन.”’”+ १३ म्हणून गाद संदेष्टा दावीदकडे गेला आणि त्याला म्हणाला: “तुझ्या देशावर सात वर्षं दुष्काळ पडावा?+ की तुझ्या शत्रूंनी तुझा पाठलाग करावा आणि तू तीन महिने त्यांच्यापासून पळ काढावा?+ की तुझ्या देशात तीन दिवस रोगाची साथ पसरावी?+ आता काळजीपूर्वक विचार कर आणि ज्याने मला पाठवलंय त्याला मी काय उत्तर देऊ ते सांग.” १४ तेव्हा दावीद गाद संदेष्ट्याला म्हणाला: “मी मोठ्या संकटात सापडलोय. यहोवा अतिशय दयाळू आहे,+ म्हणून आपण त्याच्या हातात पडलेलं बरं.+ पण मला माणसाच्या हाती पडू देऊ नको.”+

१५ मग यहोवाने सकाळपासून ते ठरवलेल्या वेळेपर्यंत इस्राएलवर रोगाची साथ पाठवली.+ तेव्हा दानपासून बैर-शेबापर्यंत+ ७०,००० लोक मृत्युमुखी पडले.+ १६ स्वर्गदूताने जेव्हा यरुशलेमचा नाश करण्यासाठी आपला हात पुढे केला, तेव्हा आपण आणलेल्या संकटाबद्दल यहोवाला फार वाईट वाटलं.*+ आणि लोकांचा नाश करणाऱ्‍या त्या स्वर्गदूताला तो म्हणाला: “आता पुरे! आपला हात आवर.” त्या वेळी यहोवाचा स्वर्गदूत अरवना+ यबूसी+ याच्या खळ्याजवळ* होता.

१७ दावीदने जेव्हा लोकांचा नाश करणाऱ्‍या त्या स्वर्गदूताला पाहिलं, तेव्हा तो यहोवाला म्हणाला: “पाप मी केलंय, चूक तर माझी आहे; पण ही मेंढरं+​—यांनी काय केलंय? कृपा करून, तुझा हात माझ्यावर आणि माझ्या वडिलांच्या घराण्यावर पडू दे.”+

१८ म्हणून, गाद संदेष्टा त्या दिवशी दावीदकडे येऊन म्हणाला: “जा, वरती जाऊन अरवना यबूसी याच्या खळ्यावर यहोवासाठी एक वेदी बांध.”+ १९ म्हणून, गाद संदेष्ट्याद्वारे यहोवाने सांगितलं होतं त्याप्रमाणे दावीद वरती खळ्याकडे गेला. २० अरवनाने जेव्हा खाली नजर टाकली, तेव्हा राजा आणि त्याचे सेवक आपल्याकडे येताना त्याला दिसले. म्हणून तो लगेच बाहेर गेला आणि त्याने जमिनीपर्यंत डोकं टेकवून राजाला दंडवत घातला. २१ अरवनाने विचारलं: “माझ्या प्रभूचं, माझ्या राजाचं आपल्या या सेवकाकडे कसं काय येणं झालं?” त्यावर दावीद म्हणाला: “मी तुझ्याकडून हे खळं विकत घ्यायला आलोय. लोकांवर ओढवलेलं संकट थांबावं म्हणून इथे मला यहोवासाठी एक वेदी बांधायची आहे.”+ २२ तेव्हा अरवना दावीदला म्हणाला: “माझ्या प्रभूने, राजाने ते असंच घ्यावं आणि हवं ते* अर्पण करावं. पाहा, होमार्पणासाठी इथे गुरं आहेत. शिवाय, जाळण्यासाठी मळणीच्या फळ्या आणि जूसुद्धा* आहे. २३ हे राजा, मी* हे सगळं काही तुम्हाला देतो.” अरवना पुढे राजाला म्हणाला: “तुमचा देव यहोवा तुमच्यावर कृपा करो.”

२४ पण राजा अरवनाला म्हणाला: “नाही, मी हे असंच घेणार नाही. मी ते तुझ्याकडून विकत घेईन. ज्या होमार्पणांसाठी मला कोणतीही किंमत चुकवावी लागणार नाही, अशी होमार्पणं मी माझा देव यहोवा याला कधीच देणार नाही.” म्हणून मग दावीदने ५० शेकेल* चांदी देऊन ते खळं आणि बैल विकत घेतले.+ २५ मग दावीदने तिथे यहोवासाठी एक वेदी बांधली+ आणि त्यावर होमार्पणं आणि शांती-अर्पणं वाहिली. त्यानंतर देशासाठी केलेली विनवणी यहोवाने ऐकली+ आणि इस्राएलमधली रोगाची साथ थांबली.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा