वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ शमुवेल १९
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ शमुवेल रूपरेषा

      • दावीद अबशालोमसाठी शोक करतो (१-४)

      • यवाब दावीदला खडसावतो (५-८क)

      • दावीद यरुशलेमला परत येतो (८ख-१५)

      • शिमी माफी मागतो (१६-२३)

      • मफीबोशेथ निर्दोष सिद्ध होतो (२४-३०)

      • बर्जिल्ल्यचा सन्मान (३१-४०)

      • वंशांमध्ये झालेला वादविवाद (४१-४३)

२ शमुवेल १९:१

समासातील संदर्भ

  • +२शमु १८:५, १४

२ शमुवेल १९:३

समासातील संदर्भ

  • +२शमु १७:२४

२ शमुवेल १९:४

समासातील संदर्भ

  • +२शमु १८:३३

२ शमुवेल १९:५

समासातील संदर्भ

  • +२शमु ३:२-५; ५:१४-१६; १३:१
  • +२शमु ५:१३; १५:१६

२ शमुवेल १९:८

समासातील संदर्भ

  • +२शमु १८:१७

२ शमुवेल १९:९

समासातील संदर्भ

  • +१शमु १७:५०; १८:७; १९:५; २शमु ५:२५; ८:५
  • +२शमु १५:१४

२ शमुवेल १९:१०

समासातील संदर्भ

  • +२शमु १५:१०, १२
  • +२शमु १८:१४

२ शमुवेल १९:११

समासातील संदर्भ

  • +२शमु ८:१७; १५:२५; १रा १:८
  • +१शमु २२:२०; ३०:७; २शमु १५:२४; १इत १५:११, १२
  • +२शमु २:४

२ शमुवेल १९:१३

समासातील संदर्भ

  • +२शमु १७:२५; १इत २:१६, १७
  • +२शमु ८:१६; १८:५, १४

२ शमुवेल १९:१५

समासातील संदर्भ

  • +यहो ५:९; १शमु ११:१४

२ शमुवेल १९:१६

समासातील संदर्भ

  • +२शमु १६:५; १रा २:८, ९

२ शमुवेल १९:१७

समासातील संदर्भ

  • +२शमु ९:२, १०; १६:१

२ शमुवेल १९:१८

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “ते.”

२ शमुवेल १९:१९

समासातील संदर्भ

  • +२शमु १६:५

२ शमुवेल १९:२१

समासातील संदर्भ

  • +२शमु २:१८
  • +२शमु २३:१८
  • +निर्ग २२:२८; २शमु १६:७; १रा २१:१३

२ शमुवेल १९:२२

समासातील संदर्भ

  • +२शमु ३:३९; १६:१०

२ शमुवेल १९:२३

समासातील संदर्भ

  • +१रा २:८, ९

२ शमुवेल १९:२४

समासातील संदर्भ

  • +२शमु ९:३, ६; १६:३, ४

२ शमुवेल १९:२५

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “इथून.”

२ शमुवेल १९:२६

समासातील संदर्भ

  • +२शमु ४:४
  • +२शमु ९:९

२ शमुवेल १९:२७

समासातील संदर्भ

  • +लेवी १९:१६; २शमु १६:३

२ शमुवेल १९:२८

समासातील संदर्भ

  • +२शमु ९:७-१०

२ शमुवेल १९:२९

समासातील संदर्भ

  • +२शमु १६:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ८/२०१८, पृ. ६

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००५, पृ. १०

२ शमुवेल १९:३१

समासातील संदर्भ

  • +२शमु १७:२७-२९; १रा २:७

२ शमुवेल १९:३२

समासातील संदर्भ

  • +नीत ३:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ९/२०१८, पृ. ९

२ शमुवेल १९:३३

समासातील संदर्भ

  • +नीत ११:२५

२ शमुवेल १९:३५

समासातील संदर्भ

  • +स्तो ९०:१०
  • +उप २:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ९/२०१८, पृ. ९-१०

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०१७, पृ. २३

२ शमुवेल १९:३७

समासातील संदर्भ

  • +उत्प ५०:१३
  • +१रा २:७

२ शमुवेल १९:३९

समासातील संदर्भ

  • +उत्प ३१:५५; १शमु २०:४१; प्रेका २०:३७

२ शमुवेल १९:४०

समासातील संदर्भ

  • +१शमु ११:१४
  • +२शमु २:४

२ शमुवेल १९:४१

समासातील संदर्भ

  • +शास ८:१; १२:१; २शमु १९:१५

२ शमुवेल १९:४२

समासातील संदर्भ

  • +स्तो ७८:६८, ७०

२ शमुवेल १९:४३

तळटीपा

  • *

    किंवा “यहूदाच्या माणसांचे शब्द इस्राएलच्या माणसांच्या शब्दांपेक्षा कठोर होते.”

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

२ शमु. १९:१२शमु १८:५, १४
२ शमु. १९:३२शमु १७:२४
२ शमु. १९:४२शमु १८:३३
२ शमु. १९:५२शमु ३:२-५; ५:१४-१६; १३:१
२ शमु. १९:५२शमु ५:१३; १५:१६
२ शमु. १९:८२शमु १८:१७
२ शमु. १९:९१शमु १७:५०; १८:७; १९:५; २शमु ५:२५; ८:५
२ शमु. १९:९२शमु १५:१४
२ शमु. १९:१०२शमु १५:१०, १२
२ शमु. १९:१०२शमु १८:१४
२ शमु. १९:११२शमु ८:१७; १५:२५; १रा १:८
२ शमु. १९:१११शमु २२:२०; ३०:७; २शमु १५:२४; १इत १५:११, १२
२ शमु. १९:११२शमु २:४
२ शमु. १९:१३२शमु १७:२५; १इत २:१६, १७
२ शमु. १९:१३२शमु ८:१६; १८:५, १४
२ शमु. १९:१५यहो ५:९; १शमु ११:१४
२ शमु. १९:१६२शमु १६:५; १रा २:८, ९
२ शमु. १९:१७२शमु ९:२, १०; १६:१
२ शमु. १९:१९२शमु १६:५
२ शमु. १९:२१२शमु २:१८
२ शमु. १९:२१२शमु २३:१८
२ शमु. १९:२१निर्ग २२:२८; २शमु १६:७; १रा २१:१३
२ शमु. १९:२२२शमु ३:३९; १६:१०
२ शमु. १९:२३१रा २:८, ९
२ शमु. १९:२४२शमु ९:३, ६; १६:३, ४
२ शमु. १९:२६२शमु ४:४
२ शमु. १९:२६२शमु ९:९
२ शमु. १९:२७लेवी १९:१६; २शमु १६:३
२ शमु. १९:२८२शमु ९:७-१०
२ शमु. १९:२९२शमु १६:४
२ शमु. १९:३१२शमु १७:२७-२९; १रा २:७
२ शमु. १९:३२नीत ३:२७
२ शमु. १९:३३नीत ११:२५
२ शमु. १९:३५स्तो ९०:१०
२ शमु. १९:३५उप २:८
२ शमु. १९:३७उत्प ५०:१३
२ शमु. १९:३७१रा २:७
२ शमु. १९:३९उत्प ३१:५५; १शमु २०:४१; प्रेका २०:३७
२ शमु. १९:४०१शमु ११:१४
२ शमु. १९:४०२शमु २:४
२ शमु. १९:४१शास ८:१; १२:१; २शमु १९:१५
२ शमु. १९:४२स्तो ७८:६८, ७०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
  • ४१
  • ४२
  • ४३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ शमुवेल १९:१-४३

२ शमुवेल

१९ यवाबला असं सांगण्यात आलं, की “राजा अबशालोमसाठी रडतोय आणि खूप शोक करतोय.”+ २ विजयाचा तो दिवस सर्व लोकांसाठी शोकाचा दिवस बनला. कारण लोकांनी असं ऐकलं, की राजा आपल्या मुलासाठी शोक करत आहे. ३ त्या दिवशी लोक गुपचूप शहरात परत आले;+ युद्धातून पळ काढणारे सैनिक जसं लज्जित होऊन परत येतात, तसं ते परत आले. ४ राजा आपलं तोंड झाकून मोठ्याने रडत होता. तो म्हणत होता: “अबशालोम, माझ्या मुला! माझ्या मुला, अबशालोम!”+

५ मग यवाब घरात राजाकडे गेला आणि म्हणाला: “तुमच्या ज्या सेवकांनी आज तुमचा, तुमच्या मुला-मुलींचा,+ तुमच्या बायकांचा आणि उपपत्नींचा+ जीव वाचवला, त्या सगळ्या सेवकांना तुम्ही आज शरमेने खाली पाहायला लावलंय. ६ जे तुमचा द्वेष करतात त्यांच्यावर तुम्ही प्रेम करता, आणि जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांचा तुम्ही द्वेष करता. आज तुम्ही दाखवून दिलंत, की तुम्हाला तुमच्या प्रमुखांची आणि सेवकांची काहीच किंमत नाही. कारण आज जर अबशालोम जिवंत राहिला असता आणि आम्ही सगळे मेलो असतो, तर तुम्हाला काहीच वाटलं नसतं हे मला पक्कं माहीत आहे. ७ तर आता उठा आणि बाहेर जाऊन आपल्या सेवकांना धीर द्या. कारण मी यहोवाची शपथ घेऊन सांगतो, की तुम्ही जर असं केलं नाही तर आज रात्रीपर्यंत इथे एकही माणूस तुमच्यासोबत थांबणार नाही. मग, तरुणपणापासून आजपर्यंत तुमच्यावर जितकी संकटं आली, त्यांपेक्षा हे संकट तुमच्यासाठी जास्त भयंकर ठरेल.” ८ म्हणून मग राजा उठला आणि शहराच्या दरवाजाजवळ जाऊन बसला. आणि सगळ्या लोकांना असं सांगण्यात आलं: “राजा आता दरवाजाजवळ बसलाय.” तेव्हा सगळे लोक राजासमोर जमले.

पण जे इस्राएली युद्धात हरले होते, ते आपल्या घरी पळून गेले.+ ९ इस्राएलच्या सर्व वंशांतले लोक आपापसात वाद घालून म्हणत होते: “राजाने आम्हाला आमच्या शत्रूंपासून वाचवलं;+ त्याने पलिष्टी लोकांच्या हातून आमची सुटका केली. पण आता अबशालोममुळे तो देश सोडून पळून गेलाय.+ १० आणि ज्या अबशालोमचा आपला राजा म्हणून आपण अभिषेक केला होता,+ तो युद्धात मेला.+ तर मग राजाला परत आणण्यासाठी तुम्ही काहीच का करत नाही?”

११ मग दावीद राजाने सादोक+ आणि अब्याथार+ याजकांना असा निरोप पाठवला: “यहूदाच्या वडीलजनांशी+ बोला आणि त्यांना म्हणा: ‘इस्राएलच्या सर्व वंशांकडून राजाच्या घरी त्याच्यासाठी संदेश आलाय; मग राजाला त्याच्या घरी परत आणण्यात, तुम्ही का सगळ्यात मागे आहात? १२ तुम्ही माझे भाऊ आहात; तुमच्याशी तर माझं रक्‍ताचं नातं आहे. असं असूनही राजाला परत आणण्यासाठी तुम्ही सगळ्यात मागे का राहिलात?’ १३ आणि अमासाला+ असं सांगा: ‘तुझं-माझं रक्‍ताचं नातं आहे. म्हणून, आता जर मी तुला यवाबच्या+ जागी सेनापती बनवलं नाही, तर देव मला कठोरातली कठोर शिक्षा करो.’”

१४ अशा प्रकारे त्याने यहूदाच्या सगळ्या माणसांची मनं जिंकली. आणि त्यांच्यात एकमत होऊन त्यांनी राजाला असा संदेश पाठवला: “तुम्ही आणि तुमचे सगळे सेवक परत या.”

१५ म्हणून मग राजा परत जायला निघाला आणि तो यार्देनजवळ पोहोचला. तेव्हा यहूदाचे लोक राजाला भेटायला आणि यार्देन नदी पार करण्यासाठी त्याला मदत करायला गिलगाल+ इथे आले. १६ त्या वेळी गेराचा मुलगा शिमी+ हासुद्धा दावीद राजाला भेटायला घाईघाईने यहूदाच्या माणसांसोबत तिथे आला होता; शिमी हा बन्यामीन वंशातला असून बहुरीम इथला राहणारा होता. १७ तो राजाला भेटायला आला तेव्हा त्याच्यासोबत बन्यामीन वंशातली १,००० माणसंही होती. तसंच, शौलच्या घराण्याचा सेवक सीबा+ हासुद्धा आपल्या १५ मुलांना आणि २० सेवकांना घेऊन घाईघाईने राजाच्या आधी यार्देनकडे पोहोचला होता. १८ मग राजाच्या घराण्यातल्या लोकांना यार्देन नदी पार करून देण्यासाठी आणि राजा म्हणेल ते करण्यासाठी तो* नदी पार करून गेला. पण राजा यार्देन नदी पार करणार, इतक्यात गेराचा मुलगा शिमी राजाच्या पायांजवळ पडला, १९ आणि तो राजाला म्हणाला: “हे राजा, माझ्या प्रभू, माझा अपराध माफ करा. माझे प्रभू ज्या दिवशी यरुशलेममधून निघाले, त्या दिवशी तुमच्या या दासाने जी चूक केली ती राजाने विसरून जावी.+ राजाने ती गोष्ट मनाला लावून घेऊ नये. २० कारण तुमच्या या सेवकाला माहीत आहे, की त्याने पाप केलंय. आणि म्हणूनच योसेफच्या संपूर्ण घराण्यापैकी मीच सगळ्यात आधी माझ्या प्रभूला, राजाला भेटायला आलोय.”

२१ त्यावर सरूवाचा+ मुलगा अबीशय+ लगेच म्हणाला: “शिमीने यहोवाच्या अभिषिक्‍ताला शिव्याशाप दिले होते,+ तेव्हा त्याला मारूनच टाकलं पाहिजे.” २२ पण दावीद म्हणाला: “सरूवाच्या मुलांनो,+ तुम्हाला याच्याशी काय घेणंदेणं? तुम्हाला माझ्या मनाविरुद्ध का वागायचंय? मी आज पुन्हा इस्राएलचा राजा बनलोय. मग इस्राएलमध्ये आज एखाद्याचा जीव घेणं ठीक राहील का?” २३ मग राजा शिमीला म्हणाला: “तू मरणार नाहीस.” राजाने त्याला हे शपथ घेऊन सांगितलं.+

२४ शौलचा नातू मफीबोशेथ+ हासुद्धा राजाला भेटायला आला होता. राजा गेला त्या दिवसापासून ते राजा सुखरूप परत येईपर्यंत मफीबोशेथने आपले पाय धुतले नव्हते. शिवाय, त्याने दाढीमिशीही केली नव्हती आणि आपले कपडेही धुतले नव्हते. २५ तो यरुशलेम इथे* राजाला भेटायला आला, तेव्हा राजा त्याला म्हणाला: “मफीबोशेथ, तू माझ्यासोबत का आला नव्हता?” २६ त्यावर तो म्हणाला: “हे राजा माझ्या प्रभू, तुम्हाला माहीत आहे की तुमचा हा सेवक अधू आहे.+ मी माझ्या सेवकाला+ म्हणालो होतो: ‘माझ्यासाठी गाढव तयार कर, म्हणजे मी त्यावर बसून राजासोबत जाईन.’ पण त्याने मला फसवलं. २७ त्याने तुमच्या या सेवकाची माझ्या प्रभूकडे, राजाकडे बदनामी केली.+ पण माझे प्रभू, माझे राजे खऱ्‍या देवाच्या स्वर्गदूतासारखे आहेत. तेव्हा, तुम्हाला आता जसं योग्य वाटतं तसं करा. २८ खरंतर माझे प्रभू, माझे राजे, माझ्या वडिलांच्या संपूर्ण घराण्याचा नाश करू शकले असते. पण त्यांनी तसं केलं नाही. उलट, आपल्या या सेवकाला त्यांनी आपल्यासोबत मेजावर बसून जेवण्याचा मान दिला.+ असं असताना, राजाकडे आणखी काही मागण्याचा मला काय अधिकार?”

२९ पण राजा त्याला म्हणाला: “तू असं का बोलतोस? मी ठरवलंय, की तू आणि सीबा तुम्ही दोघं शेत वाटून घ्याल.”+ ३० त्यावर मफीबोशेथ राजाला म्हणाला: “माझे प्रभू, माझे राजे आता सुखरूप आपल्या घरी परत आले आहेत, तेव्हा सीबालाच सगळं काही घेऊ द्या.”

३१ मग रोगलीम इथून, बर्जिल्ल्य+ गिलादी हासुद्धा राजाला यार्देनपर्यंत पोहोचवायला आला. ३२ बर्जिल्ल्य हा खूप वयस्कर होता, तो ८० वर्षांचा होता. राजा महनाइममध्ये राहत असताना बर्जिल्ल्यने त्याला अन्‍नसामग्री पुरवली होती.+ कारण तो फार श्रीमंत होता. ३३ राजा बर्जिल्ल्यला म्हणाला: “माझ्यासोबत नदी पार करून चल. यरुशलेममध्ये मी तुझ्या खाण्यापिण्याची सगळी सोय करीन.”+ ३४ पण बर्जिल्ल्य राजाला म्हणाला: “माझ्या आयुष्याचे दिवस उरलेच किती? मग मी राजासोबत यरुशलेमला का जावं? ३५ मी आता ८० वर्षांचा म्हातारा झालोय.+ या वयात मी बऱ्‍यावाइटाची पारख करू शकत नाही. मी जे खातो-पितो त्याची चव मला कळत नाही. गायकांच्या सुरेल आवाजाचा आनंदही मला घेता येत नाही.+ तर मग हे राजा, माझ्या प्रभू, तुमच्या या सेवकाने सोबत येऊन तुमच्यावर भार का व्हावं? ३६ मला तुमच्यासोबत यार्देनपर्यंत येण्याचा मान मिळाला, हीच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. म्हणून राजाने मला कोणताही मोबदला देण्याची गरज नाही. ३७ तुमच्या या सेवकाला परत जाऊ द्या. म्हणजे माझ्या शहरात, माझ्या आईवडिलांच्या कबरेजवळ मला मरण येईल.+ पण पाहा, तुमचा सेवक किम्हाम+ हा इथे आहे. कृपा करून त्याला माझ्या प्रभूसोबत, राजासोबत, यार्देन पार करून येऊ द्या. आणि तुम्हाला जे काही चांगलं करायचंय, ते त्याच्यासाठी करा.”

३८ मग राजा म्हणाला: “किम्हाम यार्देन पार करून माझ्यासोबत येईल. आणि तुला जे चांगलं वाटतं ते मी त्याच्यासाठी करीन; तू म्हणशील तसं मी तुझ्यासाठी करीन.” ३९ मग सगळे लोक यार्देन पार करून जाऊ लागले. राजाही नदी पार करून गेला; जाण्याआधी त्याने बर्जिल्ल्यचा मुका घेतला+ आणि त्याला आशीर्वाद दिला. त्यानंतर बर्जिल्ल्य आपल्या घरी परत गेला. ४० राजा नदी पार करून गिलगालला+ गेला, तेव्हा किम्हामसुद्धा त्याच्यासोबत गेला. यहूदाच्या सर्व लोकांनी आणि इस्राएलच्या निम्म्या लोकांनी राजाला नदीपार आणलं.+

४१ तेव्हा इस्राएलची सर्व माणसं राजाकडे येऊन म्हणाली: “आमच्या भावांनी, यहूदाच्या या माणसांनी असं का केलं? आम्हाला न सांगता त्यांनी तुम्हाला, तुमच्या घराण्याला आणि तुमच्या सगळ्या माणसांना गुपचूप यार्देनपार का आणलं?”+ ४२ त्यावर यहूदाची सर्व माणसं इस्राएलच्या माणसांना म्हणाली: “कारण राजा आमचा नातेवाईक आहे.+ पण तुम्हाला का एवढा राग येतोय? राजाने काय आमच्या खाण्यापिण्यावर खर्च केलाय? की, राजाकडून आम्हाला इनाम मिळालाय?”

४३ पण इस्राएलची माणसं यहूदाच्या माणसांना म्हणाली: “या राज्यात आमचे दहा हिश्‍शे आहेत. त्यामुळे राजावर सगळ्यात जास्त हक्क आमचा आहे. मग तुम्ही आमच्याशी असं तुच्छपणे का वागलात? खरंतर, राजाला आणायला सगळ्यात आधी आम्ही जायला हवं होतं.” पण या वादात यहूदाच्या माणसांपुढे इस्राएलच्या माणसांचं काहीएक चाललं नाही.*

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा