वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ शमुवेल १७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ शमुवेल रूपरेषा

      • हूशय अहिथोफेलचा सल्ला निष्फळ ठरवतो (१-१४)

      • दावीदला सावधगिरीचा इशारा; तो अबशालोमपासून पळतो (१५-२९)

        • बर्जिल्ल्य आणि इतर जण अन्‍नसामग्री पुरवतात (२७-२९)

२ शमुवेल १७:२

समासातील संदर्भ

  • +२शमु १६:१४
  • +स्तो ३७:१२; ४१:९; ५५:१२, १३

२ शमुवेल १७:५

समासातील संदर्भ

  • +२शमु १५:३२; १६:१६

२ शमुवेल १७:७

समासातील संदर्भ

  • +२शमु १५:३४

२ शमुवेल १७:८

समासातील संदर्भ

  • +१शमु १६:१८; २शमु १५:१८; २३:८, १८; १इत ११:२६
  • +नीत १७:१२
  • +१शमु १७:५०; १८:७; १९:८; २शमु १०:१८

२ शमुवेल १७:९

तळटीपा

  • *

    किंवा “खळग्यात; डोंगर कपारीत.”

समासातील संदर्भ

  • +१शमु २२:१; २३:१९

२ शमुवेल १७:१०

समासातील संदर्भ

  • +उत्प ४९:९; २शमु १:२३; यश ३१:४
  • +१शमु १८:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/१९९६, पृ. ३२

२ शमुवेल १७:११

समासातील संदर्भ

  • +शास २०:१
  • +१रा ४:२०

२ शमुवेल १७:१४

तळटीपा

  • *

    किंवा “करण्याची आज्ञा दिली होती.”

समासातील संदर्भ

  • +नीत २१:१
  • +अनु २:३०; २इत २५:२०
  • +२शमु १५:३१, ३४; १६:२३; नीत १९:२१; २१:३०

२ शमुवेल १७:१५

समासातील संदर्भ

  • +२शमु ८:१७; १५:३५

२ शमुवेल १७:१६

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “सपाट प्रदेशात.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ३५:२४, २५

२ शमुवेल १७:१७

समासातील संदर्भ

  • +१रा १:४२
  • +२शमु १५:२७, ३६; १८:१९
  • +यहो १५:७, १२; १८:१६, २०; १रा १:९

२ शमुवेल १७:१८

समासातील संदर्भ

  • +२शमु १६:५; १९:१६

२ शमुवेल १७:२०

समासातील संदर्भ

  • +निर्ग १:१९; यहो २:३-५; १शमु १९:१२, १४; २१:२

२ शमुवेल १७:२१

समासातील संदर्भ

  • +२शमु १७:१, २

२ शमुवेल १७:२३

तळटीपा

  • *

    किंवा “गळा आवळून.”

समासातील संदर्भ

  • +यहो १५:२०, ५१; २शमु १५:१२
  • +२रा २०:१
  • +१शमु ३१:४; १रा १६:१८; स्तो ५:१०; ५५:२३; मत्त २७:३, ५; प्रेका १:१८

२ शमुवेल १७:२४

समासातील संदर्भ

  • +उत्प ३२:१, २; यहो १३:२४, २६

२ शमुवेल १७:२५

समासातील संदर्भ

  • +२शमु ८:१६
  • +२शमु १९:१३; २०:४, १०
  • +१इत २:१६, १७

२ शमुवेल १७:२६

समासातील संदर्भ

  • +गण ३२:१; अनु ३:१५

२ शमुवेल १७:२७

समासातील संदर्भ

  • +अनु ३:११; यहो १३:२४, २५; २शमु १२:२६, २९
  • +२शमु ९:३-५
  • +२शमु १९:३१, ३२; १रा २:७

२ शमुवेल १७:२९

समासातील संदर्भ

  • +नीत ११:२५
  • +१शमु २५:१८; २शमु १६:२

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

२ शमु. १७:२२शमु १६:१४
२ शमु. १७:२स्तो ३७:१२; ४१:९; ५५:१२, १३
२ शमु. १७:५२शमु १५:३२; १६:१६
२ शमु. १७:७२शमु १५:३४
२ शमु. १७:८१शमु १६:१८; २शमु १५:१८; २३:८, १८; १इत ११:२६
२ शमु. १७:८नीत १७:१२
२ शमु. १७:८१शमु १७:५०; १८:७; १९:८; २शमु १०:१८
२ शमु. १७:९१शमु २२:१; २३:१९
२ शमु. १७:१०उत्प ४९:९; २शमु १:२३; यश ३१:४
२ शमु. १७:१०१शमु १८:५
२ शमु. १७:११शास २०:१
२ शमु. १७:१११रा ४:२०
२ शमु. १७:१४नीत २१:१
२ शमु. १७:१४अनु २:३०; २इत २५:२०
२ शमु. १७:१४२शमु १५:३१, ३४; १६:२३; नीत १९:२१; २१:३०
२ शमु. १७:१५२शमु ८:१७; १५:३५
२ शमु. १७:१६स्तो ३५:२४, २५
२ शमु. १७:१७१रा १:४२
२ शमु. १७:१७२शमु १५:२७, ३६; १८:१९
२ शमु. १७:१७यहो १५:७, १२; १८:१६, २०; १रा १:९
२ शमु. १७:१८२शमु १६:५; १९:१६
२ शमु. १७:२०निर्ग १:१९; यहो २:३-५; १शमु १९:१२, १४; २१:२
२ शमु. १७:२१२शमु १७:१, २
२ शमु. १७:२३यहो १५:२०, ५१; २शमु १५:१२
२ शमु. १७:२३२रा २०:१
२ शमु. १७:२३१शमु ३१:४; १रा १६:१८; स्तो ५:१०; ५५:२३; मत्त २७:३, ५; प्रेका १:१८
२ शमु. १७:२४उत्प ३२:१, २; यहो १३:२४, २६
२ शमु. १७:२५२शमु ८:१६
२ शमु. १७:२५२शमु १९:१३; २०:४, १०
२ शमु. १७:२५१इत २:१६, १७
२ शमु. १७:२६गण ३२:१; अनु ३:१५
२ शमु. १७:२७अनु ३:११; यहो १३:२४, २५; २शमु १२:२६, २९
२ शमु. १७:२७२शमु ९:३-५
२ शमु. १७:२७२शमु १९:३१, ३२; १रा २:७
२ शमु. १७:२९नीत ११:२५
२ शमु. १७:२९१शमु २५:१८; २शमु १६:२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ शमुवेल १७:१-२९

२ शमुवेल

१७ अहिथोफेल मग अबशालोमला म्हणाला: “कृपया मला १२,००० माणसं निवडण्याची परवानगी दे. म्हणजे मी त्यांना घेऊन आज रात्रीच दावीदचा पाठलाग करायला निघेन. २ तो जेव्हा थकला-भागलेला असेल आणि त्याच्यात काहीच ताकद उरलेली नसेल,+ तेव्हा मी त्याच्यावर हल्ला करून त्याला गोंधळात पाडीन. मग त्याच्यासोबत असलेले सगळे लोक पळून जातील. आणि मी फक्‍त राजाला ठार मारीन.+ ३ त्यानंतर मी सगळ्या लोकांना तुझ्याकडे परत आणीन. तू ज्या माणसाच्या जिवावर उठलाय तो एकदाचा मेला, की त्याचे सर्व लोक तुझ्याकडे परत येतील. मग सगळे लोक शांतीने राहतील.” ४ अहिथोफेलने सुचवलेली ही योजना अबशालोमला आणि इस्राएलच्या सर्व वडीलजनांना पटली.

५ पण अबशालोम म्हणाला: “हूशय+ अर्कीलासुद्धा बोलवा; त्याचं काय म्हणणं आहे तेही ऐकूयात.” ६ हूशय जेव्हा अबशालोमकडे आला तेव्हा अबशालोम त्याला म्हणाला: “अहिथोफेलने असा-असा सल्ला दिलाय. तुला काय वाटतं, आपण त्याच्या सल्ल्याप्रमाणे करावं का? किंवा मग तुझं काय म्हणणं आहे ते सांग.” ७ त्यावर हूशय त्याला म्हणाला: “या वेळेस अहिथोफेलने जो सल्ला दिलाय तो काही बरोबर वाटत नाही!”+

८ हूशय पुढे म्हणाला: “तुमचे वडील आणि त्यांची माणसं किती शूरवीर आहेत+ हे तुम्हाला चांगलं माहीत आहे. आणि ते सर्व जण, पिल्लं हरवलेल्या जंगलातल्या अस्वलीसारखं चवताळलेले आहेत.+ शिवाय, तुमचे वडील शूर योद्धे आहेत;+ ते काही लोकांमध्ये राहून रात्र काढणार नाहीत. ९ या क्षणी, ते कुठल्यातरी गुहेत* किंवा मग दुसरीकडे कुठेतरी लपून बसले असतील;+ आणि जर त्यांनी सर्वात आधी हल्ला केला, तर ऐकणारे म्हणतील, ‘अबशालोमच्या बाजूचे लोक हरले!’ १० मग, सिंहासारखं+ हृदय असलेल्या माणसाचंही भीतीने पाणीपाणी होईल. कारण, तुमचे वडील एक शूर योद्धे आहेत+ आणि त्यांच्यासोबतची माणसंही धैर्यवान आहेत हे संपूर्ण इस्राएलला माहीत आहे. ११ तेव्हा मी असा सल्ला देईन: दानपासून बैर-शेबापर्यंत+ असलेल्या सर्व इस्राएली लोकांना तुमच्याकडे एकत्र करा, म्हणजे त्यांची संख्या समुद्रकिनाऱ्‍यावरच्या वाळूइतकी अगणित होईल;+ त्यानंतर तुम्ही स्वतः युद्धात त्यांचं नेतृत्व करा. १२ ते जिथे कुठे सापडतील तिथे जाऊन आपण त्यांच्यावर हल्ला करू. जमिनीवर जसं दव पडतं तसं आपण त्यांच्यावर तुटून पडू. म्हणजे त्यांच्यापैकी कोणीही वाचणार नाही; तुमचे वडीलही नाहीत आणि त्यांची माणसंही नाहीत. १३ ते जर एखाद्या शहरात पळून गेले, तर सर्व इस्राएली लोक दोरखंड घेऊन त्या शहराकडे जातील; आणि आपण ते शहर दोरखंडांनी ओढून खोऱ्‍यात टाकून देऊ. मग एक खडासुद्धा तिथे शिल्लक राहणार नाही.”

१४ मग अबशालोम आणि इस्राएलची सर्व माणसं म्हणाली: “अहिथोफेलच्या सल्ल्यापेक्षा हूशय अर्कीचा सल्ला जास्त चांगला वाटतो!”+ यहोवाला अबशालोमवर संकट आणता यावं,+ यासाठी यहोवाने अहिथोफेलचा उत्तम सल्ला निष्फळ करण्याचं ठरवलं होतं,*+ आणि म्हणून असं घडलं.

१५ हूशय नंतर सादोक आणि अब्याथार+ याजकांना म्हणाला: “अहिथोफेलने अबशालोमला आणि इस्राएलच्या वडीलजनांना असा-असा सल्ला दिला होता; पण मी त्यांना असा सल्ला दिला. १६ तर आता पटकन जाऊन दावीदला सावध करा आणि त्यांना असा निरोप द्या: ‘आज रात्री ओसाड रानाच्या उतारांजवळ* थांबू नका. कसंही करून नदी पार करून जा. नाहीतर राजा आणि त्याच्यासोबतचे सगळे लोक मारले जातील.’”+

१७ योनाथान+ आणि अहीमास+ हे शहराबाहेर एन-रोगेल+ इथे राहत होते. शहरात जाताना आपल्याला कोणीतरी पाहील याची त्यांना भीती होती. म्हणून एका दासीने त्यांच्याकडे जाऊन त्यांना सगळी खबर दिली; मग ती खबर घेऊन ते दावीदकडे निघाले. १८ पण जाताना एका तरुणाने त्यांना पाहिलं आणि अबशालोमला येऊन सांगितलं. म्हणून मग योनाथान आणि अहीमास लगेच तिथून निघाले आणि बहुरीम+ इथे एका माणसाच्या घरी गेले; त्या माणसाच्या घराच्या अंगणात एक विहीर होती. ते त्या विहिरीत उतरले. १९ मग त्या माणसाच्या बायकोने एक कापड घेऊन विहिरीच्या तोंडावर अंथरलं आणि त्यावर भरडलेलं धान्य पसरवलं. त्यामुळे कोणाला काहीच कळलं नाही. २० मग अबशालोमचे सेवक त्या स्त्रीच्या घरी आले आणि त्यांनी तिला विचारलं: “अहीमास आणि योनाथान कुठे आहेत?” त्यावर ती स्त्री त्यांना म्हणाली: “ते नदीच्या दिशेने गेले.”+ अबशालोमच्या सेवकांनी त्यांचा खूप शोध केला, पण ते काही सापडले नाहीत. म्हणून मग ते सेवक यरुशलेमला परत गेले.

२१ अबशालोमचे सेवक गेल्यानंतर योनाथान आणि अहीमास त्या विहिरीतून बाहेर आले. मग दावीदकडे जाऊन त्यांनी त्याला खबर दिली. ते म्हणाले: “लगेच निघा आणि नदी पार करून जा. कारण अहिथोफेलने तुमच्या विरोधात असा-असा सल्ला दिलाय.”+ २२ तेव्हा दावीद आणि त्याच्यासोबतचे सगळे लोक लगेच निघाले आणि यार्देन पार करून गेले; दिवस उजाडेपर्यंत, एकूण एक माणूस यार्देन पार करून गेला होता.

२३ अहिथोफेलने जेव्हा पाहिलं, की त्याच्या सल्ल्याप्रमाणे काम झालं नाही, तेव्हा तो गाढवावर बसून आपल्या गावी गेला.+ मग त्याने आपल्या घराची सर्व व्यवस्था लावली+ आणि त्यानंतर तो फाशी घेऊन* मेला.+ अहिथोफेलला त्याच्या पूर्वजांच्या कबरेत पुरण्यात आलं.

२४ यादरम्यान, दावीद महनाइम+ इथे गेला. आणि अबशालोम आपल्या सर्व इस्राएली माणसांना घेऊन यार्देन पार करून गेला. २५ अबशालोमने यवाबच्या जागी अमासा याला सेनापती नेमलं;+ अमासा+ हा इथ्रा या इस्राएली माणसाचा मुलगा होता. इथ्राने नाहाशची मुलगी अबीगईल+ हिच्याशी संबंध ठेवले होते; अबीगईल ही यवाबची आई सरूवा हिची बहीण होती. २६ मग अबशालोम आणि त्याच्यासोबतची इस्राएली माणसं यांनी गिलादच्या+ प्रदेशात छावणी दिली.

२७ दावीद महनाइममध्ये आला तेव्हा राब्बा+ इथला (अम्मोनी लोकांच्या प्रदेशातलं शहर) नाहाशचा मुलगा शोबी, लो-दबार इथला अम्मीएलचा मुलगा माखीर+ आणि रोगलीम इथला बर्जिल्ल्य+ गिलादी, २८ यांनी आपल्यासोबत बिछाने, स्वयंपाकाची भांडी, मातीची भांडी, गहू, जव, पीठ, हुरडा, कडधान्यं, डाळी, वाळवलेलं धान्य, २९ मध, लोणी, पनीर आणि मेंढरं आणली. या सर्व गोष्टी त्यांनी दावीद आणि त्याच्या लोकांसाठी आणल्या होत्या.+ कारण, “ओसाड रानात लोक भुकेने आणि तहानेने अगदी व्याकूळ झाले असतील,”+ असा त्यांनी विचार केला.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा