वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उत्पत्ती २६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

उत्पत्ती रूपरेषा

      • गरारमध्ये इसहाक आणि रिबका (१-११)

        • देव आपल्या वचनाची इसहाकला खातरी देतो (३-५)

      • विहिरींवरून वाद (१२-२५)

      • इसहाकचा अबीमलेखसोबत करार (२६-३३)

      • एसावच्या दोन हित्ती बायका (३४, ३५)

उत्पत्ती २६:१

समासातील संदर्भ

  • +उत्प १२:१०

उत्पत्ती २६:३

तळटीपा

  • *

    शब्दशः “बीज.”

समासातील संदर्भ

  • +उत्प २०:१; इब्री ११:८, ९
  • +उत्प १२:७; १५:१८
  • +उत्प २२:१६-१८; स्तो १०५:९-११; इब्री ६:१३, १४

उत्पत्ती २६:४

तळटीपा

  • *

    शब्दशः “बीज.”

  • *

    शब्दशः “बीज.”

  • *

    शब्दशः “बीज.”

  • *

    किंवा “स्वतःसाठी आशीर्वाद मिळवतील.”

समासातील संदर्भ

  • +उत्प १५:१, ५; इब्री ११:१२
  • +अनु ३४:४
  • +उत्प १२:१-३; प्रेका ३:२५; गल ३:८

उत्पत्ती २६:५

समासातील संदर्भ

  • +उत्प १७:१०, २३; २२:३, १२; इब्री ११:८; याक २:२१

उत्पत्ती २६:६

समासातील संदर्भ

  • +उत्प २६:१७

उत्पत्ती २६:७

समासातील संदर्भ

  • +उत्प १२:११-१३
  • +उत्प २४:१६

उत्पत्ती २६:८

समासातील संदर्भ

  • +उत्प २४:६७

उत्पत्ती २६:९

समासातील संदर्भ

  • +उत्प २०:११

उत्पत्ती २६:१०

समासातील संदर्भ

  • +उत्प १२:१८
  • +उत्प २०:९

उत्पत्ती २६:१२

समासातील संदर्भ

  • +उत्प २४:३४, ३५

उत्पत्ती २६:१४

समासातील संदर्भ

  • +उत्प १२:१६

उत्पत्ती २६:१५

समासातील संदर्भ

  • +उत्प २१:२७, ३०

उत्पत्ती २६:१७

समासातील संदर्भ

  • +उत्प १०:१९; २०:१

उत्पत्ती २६:१८

समासातील संदर्भ

  • +उत्प २१:२५
  • +उत्प २१:३१

उत्पत्ती २६:२०

तळटीपा

  • *

    म्हणजे, “भांडण.”

उत्पत्ती २६:२१

तळटीपा

  • *

    म्हणजे, “आरोप.”

उत्पत्ती २६:२२

तळटीपा

  • *

    म्हणजे, “मोकळ्या जागा.”

समासातील संदर्भ

  • +उत्प १७:५, ६; २८:१, ३

उत्पत्ती २६:२३

समासातील संदर्भ

  • +उत्प २१:३१

उत्पत्ती २६:२४

तळटीपा

  • *

    शब्दशः “बीज.”

समासातील संदर्भ

  • +उत्प १७:१; २८:१३
  • +उत्प १५:१
  • +उत्प १७:१९; स्तो १०५:९-११

उत्पत्ती २६:२५

समासातील संदर्भ

  • +उत्प १२:८, ९
  • +इब्री ११:९

उत्पत्ती २६:२६

समासातील संदर्भ

  • +उत्प २१:३२

उत्पत्ती २६:२८

समासातील संदर्भ

  • +उत्प २१:२२
  • +उत्प २१:२७

उत्पत्ती २६:३१

समासातील संदर्भ

  • +उत्प २१:२२-२४

उत्पत्ती २६:३२

समासातील संदर्भ

  • +उत्प २६:१८

उत्पत्ती २६:३३

समासातील संदर्भ

  • +शास २०:१

उत्पत्ती २६:३४

समासातील संदर्भ

  • +उत्प ३६:२, ३

उत्पत्ती २६:३५

तळटीपा

  • *

    शब्दशः “जिवाचा कडवटपणा.”

समासातील संदर्भ

  • +उत्प २७:४६; २८:८

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

उत्प. २६:१उत्प १२:१०
उत्प. २६:३उत्प २०:१; इब्री ११:८, ९
उत्प. २६:३उत्प १२:७; १५:१८
उत्प. २६:३उत्प २२:१६-१८; स्तो १०५:९-११; इब्री ६:१३, १४
उत्प. २६:४उत्प १५:१, ५; इब्री ११:१२
उत्प. २६:४अनु ३४:४
उत्प. २६:४उत्प १२:१-३; प्रेका ३:२५; गल ३:८
उत्प. २६:५उत्प १७:१०, २३; २२:३, १२; इब्री ११:८; याक २:२१
उत्प. २६:६उत्प २६:१७
उत्प. २६:७उत्प १२:११-१३
उत्प. २६:७उत्प २४:१६
उत्प. २६:८उत्प २४:६७
उत्प. २६:९उत्प २०:११
उत्प. २६:१०उत्प १२:१८
उत्प. २६:१०उत्प २०:९
उत्प. २६:१२उत्प २४:३४, ३५
उत्प. २६:१४उत्प १२:१६
उत्प. २६:१५उत्प २१:२७, ३०
उत्प. २६:१७उत्प १०:१९; २०:१
उत्प. २६:१८उत्प २१:२५
उत्प. २६:१८उत्प २१:३१
उत्प. २६:२२उत्प १७:५, ६; २८:१, ३
उत्प. २६:२३उत्प २१:३१
उत्प. २६:२४उत्प १७:१; २८:१३
उत्प. २६:२४उत्प १५:१
उत्प. २६:२४उत्प १७:१९; स्तो १०५:९-११
उत्प. २६:२५उत्प १२:८, ९
उत्प. २६:२५इब्री ११:९
उत्प. २६:२६उत्प २१:३२
उत्प. २६:२८उत्प २१:२२
उत्प. २६:२८उत्प २१:२७
उत्प. २६:३१उत्प २१:२२-२४
उत्प. २६:३२उत्प २६:१८
उत्प. २६:३३शास २०:१
उत्प. २६:३४उत्प ३६:२, ३
उत्प. २६:३५उत्प २७:४६; २८:८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
उत्पत्ती २६:१-३५

उत्पत्ती

२६ पूर्वी अब्राहामच्या दिवसांत जसा दुष्काळ पडला होता,+ तसाच देशात पुन्हा दुष्काळ पडला. म्हणून, इसहाक गरारमध्ये पलिष्ट्यांचा राजा अबीमलेख याच्याकडे गेला. २ तेव्हा यहोवा इसहाकसमोर प्रकट होऊन म्हणाला: “इजिप्तला जाऊ नकोस, तर मी सांगेन त्या देशात राहा. ३ त्या देशात तू विदेश्‍यासारखा राहा.+ मी तुझ्यासोबत असेन आणि तुला आशीर्वाद देईन. कारण हे सगळे देश मी तुला आणि तुझ्या संततीला* देणार आहे+ आणि तुझा पिता अब्राहाम याला दिलेली ही शपथ मी पूर्ण करीन:+ ४ ‘मी तुझी संतती* आकाशातल्या ताऱ्‍यांसारखी वाढवीन+ आणि मी हे सगळे देश तुझ्या संततीला* देईन.+ तुझ्या संततीमुळे* पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल.’*+ ५ कारण अब्राहामने माझं ऐकलं आणि तो माझे नियम, माझ्या आज्ञा, माझे आदेश आणि माझे कायदे पाळत राहिला.”+ ६ म्हणून इसहाक गरारमध्येच राहिला.+

७ तिथली माणसं त्याच्या बायकोबद्दल विचारायची, तेव्हा तो म्हणायचा: “ही माझी बहीण आहे.”+ कारण त्याला, “ही माझी बायको आहे” हे सांगायला भीती वाटायची. रिबका दिसायला सुंदर असल्यामुळे,+ “हे लोक तिच्यामुळे मला मारून टाकतील” असा तो विचार करायचा. ८ काही काळाने, पलिष्ट्यांचा राजा अबीमलेख याने एकदा खिडकीतून बाहेर पाहिलं, तेव्हा त्याला इसहाक आपली बायको रिबका हिला मिठी मारताना दिसला.+ ९ तेव्हा अबीमलेखने लगेच इसहाकला बोलावलं आणि तो त्याला म्हणाला: “ती तर तुझी बायको आहे! मग ‘ती माझी बहीण आहे’ असं तू का म्हणालास?” यावर इसहाक त्याला म्हणाला: “तिच्यामुळे मला कोणी मारून टाकेल अशी मला भीती वाटली.”+ १० पण अबीमलेख त्याला म्हणाला: “तू आमच्यासोबत असं का केलंस?+ एखाद्या माणसाने तुझ्या बायकोसोबत काही वाईट काम केलं असतं तर तुझ्यामुळे आमच्यावर दोष आला असता!”+ ११ मग अबीमलेखने आपल्या सर्व लोकांना अशी आज्ञा दिली: “जो कोणी या माणसाला आणि त्याच्या बायकोला हात लावेल त्याला नक्की ठार मारलं जाईल!”

१२ इसहाकने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्या वर्षी त्याने जितकं पेरलं, त्याच्या १०० पट पीक त्याला मिळालं, कारण त्याच्यावर यहोवाचा आशीर्वाद होता.+ १३ तो धनवान झाला आणि त्याची आणखी भरभराट झाल्यामुळे तो खूप श्रीमंत झाला. १४ त्याच्याजवळ मेंढरांचे कळप, गुरंढोरं आणि पुष्कळ दासदासी झाल्या.+ म्हणून पलिष्टी लोक त्याचा हेवा करू लागले.

१५ त्यामुळे पलिष्टी लोकांनी त्याचा पिता अब्राहाम याच्या सेवकांनी ज्या विहिरी पूर्वी खोदल्या होत्या, त्या सगळ्या माती टाकून बुजवून टाकल्या.+ १६ मग अबीमलेख इसहाकला म्हणाला: “तू इथून निघून जा कारण तू आमच्यापेक्षा खूप शक्‍तिशाली बनला आहेस.” १७ म्हणून इसहाक तिथून निघाला आणि गरारच्या खोऱ्‍यात+ तंबू ठोकून तिथे राहू लागला. १८ इसहाकचा पिता अब्राहाम याच्या काळात खोदण्यात आलेल्या, पण पलिष्टी लोकांनी अब्राहामच्या मृत्यूनंतर बुजवून टाकलेल्या विहिरी इसहाकने पुन्हा खोदल्या.+ त्याच्या पित्याने त्या विहिरींना जी नावं दिली होती, तीच नावं त्याने त्यांना दिली.+

१९ इसहाकचे सेवक खोऱ्‍यात खोदकाम करत असताना त्यांना एक स्वच्छ पाण्याची विहीर सापडली. २० तेव्हा गरारचे मेंढपाळ इसहाकच्या मेंढपाळांसोबत भांडू लागले आणि म्हणाले, “हे पाणी आमचं आहे!” म्हणून त्याने त्या विहिरीचं नाव एसेक* असं ठेवलं, कारण ते त्याच्याशी भांडले होते. २१ मग त्याचे सेवक आणखी एक विहीर खोदू लागले, तेव्हा ते पुन्हा त्यांच्याशी भांडू लागले. म्हणून त्याने तिचं नाव सितना* ठेवलं. २२ नंतर तो तिथून निघून दुसरीकडे गेला आणि त्याने तिथेही एक विहीर खोदली. पण या वेळी ते त्याच्याशी भांडले नाहीत. म्हणून त्याने तिचं नाव रेहोबोथ* ठेवलं आणि तो म्हणाला: “कारण यहोवाने आता आम्हाला भरपूर जागा दिली आहे, आणि या देशात आमची भरभराट केली आहे.”+

२३ मग तो तिथून निघून बैर-शेबाला+ गेला. २४ त्या रात्री यहोवा त्याच्यासमोर प्रकट होऊन म्हणाला: “मी तुझा पिता अब्राहाम याचा देव आहे.+ घाबरू नकोस,+ कारण मी तुझ्याबरोबर आहे. मी तुला आशीर्वाद देईन आणि माझा सेवक अब्राहाम याच्यामुळे तुझी संतती* खूप वाढवीन.”+ २५ म्हणून त्याने तिथे एक वेदी बांधली आणि यहोवाचं नाव घेऊन त्याला प्रार्थना केली.+ इसहाकने तिथे आपला तंबू ठोकला+ आणि त्याच्या सेवकांनी तिथे एक विहीर खोदली.

२६ नंतर अबीमलेख गरारहून आपला वैयक्‍तिक सल्लागार, अहुज्जाथ आणि आपला सेनापती पीकोल+ यांना घेऊन इसहाककडे आला. २७ तेव्हा इसहाक त्यांना म्हणाला: “तुम्ही माझा हेवा करून मला आपल्याइथून घालवून दिलं, मग आता माझ्याकडे का आला आहात?” २८ यावर ते म्हणाले: “यहोवा तुझ्यासोबत आहे हे आम्हाला स्पष्टपणे दिसून आलं आहे.+ म्हणून आम्ही विचार केला, की ‘आपण एकमेकांना शांती राखण्याचं वचन देऊ आणि आपसात असा करार करू,+ २९ की जसं आम्ही तुझं काहीही वाईट केलं नाही, तसं तूही आमचं काही वाईट करणार नाहीस. कारण आम्ही तुझ्याशी चांगलं वागलो आणि शांतीने तुला तिथून जाऊ दिलं. आता यहोवाचा आशीर्वाद तुझ्यावर आहे.’” ३० मग त्याने त्यांना मेजवानी दिली आणि त्यांनी खाणंपिणं केलं. ३१ त्यांनी पहाटे उठून एकमेकांना वचन दिलं+ आणि इसहाकने त्यांना पाठवून दिलं. मग, ते शांतीने तिथून निघून गेले.

३२ त्या दिवशी इसहाकच्या सेवकांनी येऊन आपण खोदलेल्या विहिरीबद्दल त्याला सांगितलं.+ ते म्हणाले: “विहिरीला पाणी लागलं!” ३३ म्हणून त्याने त्या विहिरीचं नाव शेबा ठेवलं. त्यावरून आजपर्यंत त्या शहराला बैर-शेबा+ या नावाने ओळखलं जातं.

३४ एसाव ४० वर्षांचा असताना त्याने हित्ती बैरी याची मुलगी यहूदीथ, तसंच हित्ती एलोन याची मुलगी बासमथ यांच्याशी लग्न केलं.+ ३५ त्यांच्यामुळे इसहाक आणि रिबका यांना खूप दुःख* झालं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा