वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उत्पत्ती २५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

उत्पत्ती रूपरेषा

      • अब्राहाम पुन्हा लग्न करतो (१-६)

      • अब्राहामचा मृत्यू (७-११)

      • इश्‍माएलची मुलं (१२-१८)

      • याकोब आणि एसावचा जन्म (१९-२६)

      • एसाव प्रथमपुत्राचा हक्क विकतो (२७-३४)

उत्पत्ती २५:२

समासातील संदर्भ

  • +उत्प ३७:२८; निर्ग २:१५; गण ३१:२; शास ६:२
  • +१इत १:३२, ३३

उत्पत्ती २५:५

समासातील संदर्भ

  • +उत्प २४:३६

उत्पत्ती २५:६

समासातील संदर्भ

  • +उत्प २१:१४

उत्पत्ती २५:८

तळटीपा

  • *

    काव्यात मरणाला सूचित करणारा वाक्यांश.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    २/२०१६, पृ. १२

    समाधानी जीवन, पृ. २८

उत्पत्ती २५:९

समासातील संदर्भ

  • +उत्प २३:८, ९; ४९:२९, ३०

उत्पत्ती २५:१०

समासातील संदर्भ

  • +उत्प २३:२, १९

उत्पत्ती २५:११

समासातील संदर्भ

  • +उत्प १७:१९; २६:१२-१४
  • +उत्प १६:१४

उत्पत्ती २५:१२

समासातील संदर्भ

  • +गल ४:२४
  • +उत्प १६:१०, ११

उत्पत्ती २५:१३

समासातील संदर्भ

  • +उत्प ३६:२, ३; यश ६०:७
  • +स्तो १२०:५; यिर्म ४९:२८; यहे २७:२१
  • +१इत १:२९-३१

उत्पत्ती २५:१६

तळटीपा

  • *

    किंवा “सभोवती भिंती असलेल्या छावण्यांनुसार.”

समासातील संदर्भ

  • +उत्प १७:२०

उत्पत्ती २५:१७

तळटीपा

  • *

    काव्यात मरणाला सूचित करणारा वाक्यांश.

उत्पत्ती २५:१८

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “आपल्या सगळ्या भावांशी त्यांचं शत्रुत्व होतं.”

समासातील संदर्भ

  • +१शमु १५:७
  • +उत्प १६:७, ८
  • +उत्प १६:११, १२

उत्पत्ती २५:१९

समासातील संदर्भ

  • +उत्प २२:२; मत्त १:१, २

उत्पत्ती २५:२०

समासातील संदर्भ

  • +उत्प २२:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    नवे जग भाषांतर, पृ. २५०९

उत्पत्ती २५:२२

समासातील संदर्भ

  • +रोम ९:१०

उत्पत्ती २५:२३

तळटीपा

  • *

    शब्दशः “राष्ट्रं.”

समासातील संदर्भ

  • +स्तो १३९:१५
  • +उत्प ३६:३१; गण २०:१४
  • +उत्प २७:२९, ३०; अनु २:४
  • +२शमु ८:१४; मला १:२, ३; रोम ९:१०-१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००४, पृ. २८

    १०/१५/२००३, पृ. २९

उत्पत्ती २५:२५

तळटीपा

  • *

    म्हणजे, “केसाळ.”

समासातील संदर्भ

  • +उत्प २७:११
  • +उत्प २७:३२; ३६:९; मला १:३

उत्पत्ती २५:२६

तळटीपा

  • *

    म्हणजे, “टाच धरणारा; दुसऱ्‍याची जागा घेणारा.”

समासातील संदर्भ

  • +होशे १२:३
  • +उत्प २७:३६

उत्पत्ती २५:२७

तळटीपा

  • *

    किंवा “निर्दोष.”

समासातील संदर्भ

  • +उत्प २७:३, ५
  • +इब्री ११:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०१३, पृ. २७

    १०/१५/२००३, पृ. २८

उत्पत्ती २५:२८

समासातील संदर्भ

  • +उत्प २७:६, ७, ४६

उत्पत्ती २५:३०

तळटीपा

  • *

    किंवा “मला खूप भूक लागली आहे.”

  • *

    म्हणजे, “लाल.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ३६:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/२००२, पृ. ११

उत्पत्ती २५:३१

समासातील संदर्भ

  • +अनु २१:१६, १७

उत्पत्ती २५:३३

समासातील संदर्भ

  • +इब्री १२:१६

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

उत्प. २५:२उत्प ३७:२८; निर्ग २:१५; गण ३१:२; शास ६:२
उत्प. २५:२१इत १:३२, ३३
उत्प. २५:५उत्प २४:३६
उत्प. २५:६उत्प २१:१४
उत्प. २५:९उत्प २३:८, ९; ४९:२९, ३०
उत्प. २५:१०उत्प २३:२, १९
उत्प. २५:११उत्प १७:१९; २६:१२-१४
उत्प. २५:११उत्प १६:१४
उत्प. २५:१२गल ४:२४
उत्प. २५:१२उत्प १६:१०, ११
उत्प. २५:१३उत्प ३६:२, ३; यश ६०:७
उत्प. २५:१३स्तो १२०:५; यिर्म ४९:२८; यहे २७:२१
उत्प. २५:१३१इत १:२९-३१
उत्प. २५:१६उत्प १७:२०
उत्प. २५:१८१शमु १५:७
उत्प. २५:१८उत्प १६:७, ८
उत्प. २५:१८उत्प १६:११, १२
उत्प. २५:१९उत्प २२:२; मत्त १:१, २
उत्प. २५:२०उत्प २२:२३
उत्प. २५:२२रोम ९:१०
उत्प. २५:२३स्तो १३९:१५
उत्प. २५:२३उत्प ३६:३१; गण २०:१४
उत्प. २५:२३उत्प २७:२९, ३०; अनु २:४
उत्प. २५:२३२शमु ८:१४; मला १:२, ३; रोम ९:१०-१३
उत्प. २५:२५उत्प २७:११
उत्प. २५:२५उत्प २७:३२; ३६:९; मला १:३
उत्प. २५:२६होशे १२:३
उत्प. २५:२६उत्प २७:३६
उत्प. २५:२७उत्प २७:३, ५
उत्प. २५:२७इब्री ११:९
उत्प. २५:२८उत्प २७:६, ७, ४६
उत्प. २५:३०उत्प ३६:१
उत्प. २५:३१अनु २१:१६, १७
उत्प. २५:३३इब्री १२:१६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
उत्पत्ती २५:१-३४

उत्पत्ती

२५ अब्राहामने पुन्हा लग्न केलं. त्याच्या बायकोचं नाव कटूरा होतं. २ पुढे तिला अब्राहामपासून जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान,+ इश्‍बाक आणि शूह+ ही मुलं झाली.

३ यक्षानला शबा आणि ददान ही मुलं झाली.

अश्‍शूरी, लटूशी आणि लऊमी ही ददानची मुलं होती.

४ मिद्यानला एफा, एफर, हनोख, अबीदा आणि एल्दा ही मुलं झाली.

ही सर्व कटूराची मुलं होती.

५ नंतर अब्राहामने आपलं सर्वकाही इसहाकला+ दिलं. ६ पण अब्राहामने आपल्या उपपत्नींच्या मुलांना भेटवस्तू दिल्या. तो जिवंत असतानाच, त्याने आपल्या उपपत्नींच्या मुलांना इसहाकपासून दूर,+ पूर्वेकडच्या देशात पाठवून दिलं. ७ अब्राहाम १७५ वर्षं जगला. ८ बरीच वर्षं जगल्यावर, अब्राहाम म्हातारा होऊन सुखाने मरण पावला आणि आपल्या लोकांना जाऊन मिळाला.* ९ इसहाक आणि इश्‍माएल या त्याच्या मुलांनी त्याला मम्रेच्या समोर असलेल्या मकपेलाच्या गुहेत पुरलं. ही गुहा हित्ती सोहरचा मुलगा एफ्रोन याच्या शेतात होती.+ १० हे शेत अब्राहामने हेथच्या मुलांकडून विकत घेतलं होतं. तिथे अब्राहामची बायको सारा हिला पुरण्यात आलं होतं आणि तिथेच अब्राहामलाही पुरण्यात आलं.+ ११ अब्राहामच्या मृत्यूनंतर देव त्याचा मुलगा इसहाक+ याला आशीर्वाद देत राहिला. इसहाक बैर-लहाय-रोईजवळ+ राहायचा.

१२ इजिप्तची हागार,+ जी साराची दासी होती तिला अब्राहामपासून झालेल्या मुलाचा, म्हणजेच इश्‍माएलचा+ हा वृत्तान्त आहे.

१३ इश्‍माएलच्या मुलांच्या घराण्यांनुसार त्यांची नावं अशी: इश्‍माएलच्या पहिल्या मुलाचं नाव नबायोथ.+ त्याच्यानंतर केदार,+ अदबील, मिबसाम,+ १४ मिश्‍मा, दुमा, मस्सा, १५ हदाद, तेमा, यतूर, नाफीश आणि केदमा. १६ ही इश्‍माएलची मुलं होती. त्यांच्या वस्त्यांनुसार आणि छावण्यांनुसार,* त्यांच्या १२ कुळांच्या १२ प्रधानांची+ ही नावं होती. १७ इश्‍माएल १३७ वर्षं जगला. मग तो मरण पावला आणि आपल्या लोकांना जाऊन मिळाला.* १८ मग इश्‍माएलच्या वंशजांनी हवीलापासून+ अश्‍शूरपर्यंत वस्ती केली. हवीला शूरजवळ+ आहे आणि शूर इजिप्तजवळ आहे. ते सर्व आपल्या भावांच्या जवळ वस्ती करू लागले.*+

१९ अब्राहामचा मुलगा इसहाक+ याचा हा वृत्तान्त आहे.

इसहाक अब्राहामचा मुलगा होता. २० इसहाक ४० वर्षांचा असताना त्याने रिबकाशी लग्न केलं. ती पदन-अराम इथे राहणाऱ्‍या अरामी बथुवेलची मुलगी+ आणि लाबानची बहीण होती. २१ इसहाकची बायको वांझ होती. त्यामुळे तो यहोवाला तिच्याबद्दल याचना करत होता. यहोवाने त्याची याचना ऐकली आणि रिबका गरोदर राहिली. २२ तिच्या पोटात असलेली मुलं एकमेकांशी भांडू लागली.+ तेव्हा ती म्हणाली: “असं असेल तर मी जगून काय उपयोग?” म्हणून तिने यहोवाला याबद्दल विचारलं. २३ मग यहोवा तिला म्हणाला: “तुझ्या पोटात दोन मुलं* आहेत+ आणि त्यांच्यापासून दोन राष्ट्रं बनतील.+ एक राष्ट्र दुसऱ्‍यापेक्षा शक्‍तिशाली असेल+ आणि मोठा धाकट्याची सेवा करेल.”+

२४ तिचे दिवस भरल्यानंतर, तिला जुळी मुलं झाली. २५ मोठ्याचा जन्म झाला तेव्हा त्याचं अंग लाल होतं आणि तो खूप केसाळ होता.+ म्हणून त्यांनी त्याचं नाव एसाव*+ ठेवलं. २६ त्याच्यानंतर त्याच्या भावाचा जन्म झाला. त्याने आपल्या हाताने एसावची टाच धरली होती.+ म्हणून त्याचं नाव याकोब* ठेवण्यात आलं.+ रिबकाने त्या मुलांना जन्म दिला तेव्हा इसहाक ६० वर्षांचा होता.

२७ मग ती मुलं मोठी झाली. एसाव एक कुशल शिकारी बनला.+ तो सहसा रानात भटकायचा. पण याकोब शांत स्वभावाचा* होता. तो तंबूंमध्ये राहायचा.+ २८ इसहाकचं एसाववर प्रेम होतं कारण तो त्याच्यासाठी मांस आणायचा. पण रिबकाचा याकोबवर जीव होता.+ २९ एकदा एसाव रानातून थकून आला, तेव्हा याकोब वरण बनवत होता. ३० एसाव याकोबला म्हणाला: “मला पटकन ते थोडं लाल वरण खायला दे, कारण मी खूप दमून आलोय.”* म्हणून त्याचं नाव अदोम*+ पडलं. ३१ यावर याकोब म्हणाला: “पण आधी तुझा प्रथमपुत्राचा हक्क मला वीक!”+ ३२ हे ऐकून एसाव त्याला म्हणाला: “इथे मी मरायला टेकलोय. तो हक्क माझ्या काय कामाचा?” ३३ पण याकोब म्हणाला: “आधी तू शपथ घे!” तेव्हा एसावने शपथ घेतली आणि आपला प्रथमपुत्राचा हक्क याकोबला विकला.+ ३४ मग याकोबने एसावला भाकर आणि वरण दिलं. त्याचं खाणंपिणं झाल्यावर तो उठून निघून गेला. अशा रितीने एसावने दाखवलं, की प्रथमपुत्र असण्याच्या हक्काची त्याला काही किंमत नव्हती.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा