वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उत्पत्ती २०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

उत्पत्ती रूपरेषा

      • अबीमलेखपासून साराची सुटका (१-१८)

उत्पत्ती २०:१

तळटीपा

  • *

    किंवा “विदेशी म्हणून राहू लागला.”

समासातील संदर्भ

  • +उत्प १३:१८
  • +गण १३:२६
  • +उत्प २५:१७, १८
  • +उत्प १०:१९; २६:६

उत्पत्ती २०:२

समासातील संदर्भ

  • +उत्प १२:११-१३; २०:११, १२
  • +उत्प १२:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०१५, पृ. १२

उत्पत्ती २०:३

समासातील संदर्भ

  • +उत्प १२:१७; स्तो १०५:१४
  • +अनु २२:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/१९९५, पृ. १२

उत्पत्ती २०:४

तळटीपा

  • *

    म्हणजे, त्याने तिच्याशी संबंध ठेवले नव्हते.

  • *

    किंवा “नीतिमान.”

उत्पत्ती २०:७

समासातील संदर्भ

  • +स्तो १०५:१४, १५
  • +ईयो ४२:८

उत्पत्ती २०:१०

समासातील संदर्भ

  • +उत्प १२:१८, १९; २६:९, १०

उत्पत्ती २०:११

समासातील संदर्भ

  • +उत्प १२:११, १२; २६:७

उत्पत्ती २०:१२

समासातील संदर्भ

  • +उत्प ११:२९

उत्पत्ती २०:१३

समासातील संदर्भ

  • +उत्प १२:१
  • +उत्प १२:१३

उत्पत्ती २०:१६

समासातील संदर्भ

  • +उत्प २०:२, १२

उत्पत्ती २०:१८

तळटीपा

  • *

    किंवा “अबीमलेखच्या घरातल्या सगळ्या स्त्रियांचं गर्भाशय बंद केलं होतं.”

समासातील संदर्भ

  • +उत्प १२:१७

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

उत्प. २०:१उत्प १३:१८
उत्प. २०:१गण १३:२६
उत्प. २०:१उत्प २५:१७, १८
उत्प. २०:१उत्प १०:१९; २६:६
उत्प. २०:२उत्प १२:११-१३; २०:११, १२
उत्प. २०:२उत्प १२:१५
उत्प. २०:३उत्प १२:१७; स्तो १०५:१४
उत्प. २०:३अनु २२:२२
उत्प. २०:७स्तो १०५:१४, १५
उत्प. २०:७ईयो ४२:८
उत्प. २०:१०उत्प १२:१८, १९; २६:९, १०
उत्प. २०:११उत्प १२:११, १२; २६:७
उत्प. २०:१२उत्प ११:२९
उत्प. २०:१३उत्प १२:१
उत्प. २०:१३उत्प १२:१३
उत्प. २०:१६उत्प २०:२, १२
उत्प. २०:१८उत्प १२:१७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
उत्पत्ती २०:१-१८

उत्पत्ती

२० अब्राहामने आपला मुक्काम हलवला+ आणि तो नेगेब देशात गेला. तो कादेश+ आणि शूर+ यांच्या मध्ये असलेल्या एका ठिकाणी राहू लागला.* अब्राहाम गरारमध्ये+ राहत होता तेव्हा, २ त्याने पुन्हा आपली बायको सारा हिच्याबद्दल म्हटलं: “ही माझी बहीण आहे.”+ तेव्हा गरारचा राजा अबीमलेख याने आपल्या माणसांना पाठवून साराला आपल्याकडे आणलं.+ ३ नंतर, देव अबीमलेखला रात्री स्वप्नात येऊन म्हणाला: “तू या स्त्रीला आणून स्वतःवर मृत्यू ओढवून घेतला आहेस.+ कारण तिचं लग्न झालेलं आहे आणि ती दुसऱ्‍या माणसाची बायको आहे.”+ ४ पण अबीमलेख अजून तिच्या जवळ गेला नव्हता.* म्हणून तो म्हणाला: “यहोवा, तू खरंच एका निर्दोष* राष्ट्राचा नाश करणार आहेस का? ५ ‘ती माझी बहीण आहे’ असं तोच म्हणाला नव्हता का, आणि ‘तो माझा भाऊ आहे’ असं तीही म्हणाली नव्हती का? माझं मन साफ आहे आणि मी निर्दोष आहे.” ६ तेव्हा स्वप्नात खरा देव त्याला म्हणाला: “तू हे साफ मनाने केलंस हे मला माहीत आहे. म्हणूनच मी तुला माझ्याविरुद्ध पाप करण्यापासून अडवलं आणि तिला हात लावू दिला नाही. ७ आता त्या माणसाची बायको त्याला परत कर, कारण तो एक संदेष्टा आहे.+ तो तुझ्यासाठी याचना करेल+ आणि तू जिवंत राहशील. पण जर तू तिला परत केलं नाहीस, तर लक्षात ठेव, तू आणि तुझे सर्व लोक नक्की मरतील.”

८ अबीमलेखने पहाटेच उठून आपल्या सगळ्या सेवकांना बोलावलं आणि त्यांना या सर्व गोष्टी सांगितल्या. हे ऐकून ते खूप घाबरले. ९ तेव्हा अबीमलेख अब्राहामला बोलावून म्हणाला: “तू आमच्यासोबत असं का केलंस? मी तुझ्याविरुद्ध कोणतं पाप केलं होतं, की तू माझ्यावर आणि माझ्या राज्यावर इतकं मोठं संकट आणणार होतास? तू जे केलंस ते योग्य नाही.” १० अबीमलेख अब्राहामला पुढे म्हणाला: “तू कोणत्या उद्देशाने हे केलंस?”+ ११ अब्राहाम म्हणाला: “मी विचार केला, की ‘इथे कोणालाही देवाची भीती नाही आणि माझ्या बायकोमुळे हे लोक मला मारून टाकतील.’+ १२ आणि तसं पाहिलं तर ती माझी बहीणच आहे, कारण ती माझ्या वडिलांची मुलगी आहे, पण माझ्या आईची नाही आणि मी तिच्याशी लग्न केलं.+ १३ त्यामुळे देवाच्या सांगण्यावरून जेव्हा मी माझ्या वडिलांचं घर सोडून+ ठिकठिकाणी प्रवास करू लागलो, तेव्हा मी तिला म्हणालो: ‘आपण जिथेजिथे जाऊ तिथेतिथे, “हा माझा भाऊ आहे”+ असं सांगून तू माझ्याबद्दल एकनिष्ठ प्रेम दाखव.’”

१४ मग अबीमलेखने अब्राहामला त्याची बायको परत केली. तसंच, त्याने त्याला मेंढरं, गुरंढोरं आणि दास व दासीही दिल्या. १५ शिवाय, तो अब्राहामला म्हणाला: “माझा सगळा देश तुझ्यासमोर आहे. तुला वाटेल तिथे तू राहू शकतोस.” १६ मग तो साराला म्हणाला: “बघ, मी तुझ्या भावाला+ १,००० चांदीचे तुकडे देत आहे. तुझ्यासोबत असलेल्यांसाठी आणि इतर सर्व लोकांसाठी, तू निर्दोष असल्याचं हे चिन्ह आहे. तू निष्कलंक आहेस.” १७ तेव्हा अब्राहामने खऱ्‍या देवाकडे याचना केली आणि देवाने अबीमलेख, त्याची बायको व त्याच्या दासींना बरं केलं आणि त्यांना मुलं होऊ लागली. १८ कारण यहोवाने अब्राहामची बायको सारा+ हिच्यामुळे, अबीमलेखच्या घरातल्या सर्व स्त्रियांना वांझ केलं होतं.*

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा