वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रकटीकरण १६
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

प्रकटीकरण पुस्तकाची रूपरेषा

    • १६

      • देवाच्या क्रोधाच्या सात वाट्या (१-२१)

        • पृथ्वीवर (२), समुद्रावर (३), नद्यांवर व झऱ्‍यांवर (४-७), सूर्यावर (८, ९), जंगली पशूच्या राजासनावर (१०, ११), फरात नदीवर (१२-१६), आणि हवेत ओतल्या जातात (१७-२१)

        • हर्मगिदोनात देवाचे युद्ध (१४, १६)

प्रकटीकरण १६:१

तळटीपा

  • *

    अर्थात, मंदिराचे परमपवित्र स्थान.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २२०

प्रकटीकरण १६:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २२१-२२३

प्रकटीकरण १६:३

तळटीपा

  • *

    किंवा “जीव.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २२३-२२४

प्रकटीकरण १६:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २२४-२२५

प्रकटीकरण १६:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २२४-२२५

प्रकटीकरण १६:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ३०-३१, २२४-२२५

प्रकटीकरण १६:७

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

  • *

    किंवा “न्याय निर्णय.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २२४-२२५

प्रकटीकरण १६:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २२५-२२७

प्रकटीकरण १६:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २२५, २२६-२२७

प्रकटीकरण १६:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २२७-२२८

प्रकटीकरण १६:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २२८-२२९

प्रकटीकरण १६:१२

तळटीपा

  • *

    किंवा “पूर्वेकडून.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१२, पृ. १७-१८

    प्रकटीकरण कळस, पृ. २२९-२३०, २६०-२६१

प्रकटीकरण १६:१३

तळटीपा

  • *

    शब्दशः “अशुद्ध आत्मे.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००९, पृ. ४

    प्रकटीकरण कळस, पृ. २३०-२३१

प्रकटीकरण १६:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ९/२०१९, पृ. ८-९

    २/१५/२००९, पृ. ४

    ३/१/१९८७, पृ. ३०

    प्रकटीकरण कळस, पृ. २३०-२३१, २८५

प्रकटीकरण १६:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २३१-२३२

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००५, पृ. १८

    १२/१५/२००३, पृ. २१

    १२/१/१९९९, पृ. १८

    ३/१/१९९७, पृ. १४-१९

    ७/१/१९९१, पृ. २८

प्रकटीकरण १६:१६

तळटीपा

  • *

    ग्रीक, हर मगेदोन, हा शब्द “मगिद्दोचे पर्वत” या अर्थाच्या हिब्रू शब्दावरून आला आहे.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ९/२०१९, पृ. ८-९

    नवे जग भाषांतर, पृ. २५४७

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२०१२, पृ. ५-६

    ४/१५/१९९७, पृ. १७

    ६/१/१९८९, पृ. १६-१७

    ३/१/१९८७, पृ. ३०

    प्रकटीकरण कळस, पृ. २३२-२३३, २८५

    कुरुक्षेत्र, पृ. ५-६

प्रकटीकरण १६:१७

तळटीपा

  • *

    अर्थात, मंदिराचे परमपवित्र स्थान.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००९, पृ. ३-४

    प्रकटीकरण कळस, पृ. २३३-२३४

प्रकटीकरण १६:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २३४

प्रकटीकरण १६:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २३४

प्रकटीकरण १६:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २३४

प्रकटीकरण १६:२१

तळटीपा

  • *

    शब्दशः “एक तालान्त इतके.” एक ग्रीक तालान्त म्हणजे २०.४ किलोग्राम चांदीची नाणी होती. शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. १९८

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१५, पृ. १६-१७

    २/१५/२००९, पृ. ४

    ७/१५/२००८, पृ. ७

    नवे जग भाषांतर, पृ. २६२७

    प्रकटीकरण कळस, पृ. २३४

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
  • नवे जग भाषांतर यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
प्रकटीकरण १६:१-२१

प्रकटीकरण

१६ मग, पवित्र स्थानातून* एक मोठा आवाज मला ऐकू आला, जो त्या सात देवदूतांना म्हणाला: “जा आणि देवाच्या क्रोधाने भरलेल्या सात वाट्या पृथ्वीवर ओता.”

२ पहिला देवदूत निघून गेला आणि त्याने आपली वाटी पृथ्वीवर ओतली. तेव्हा, ज्या लोकांवर जंगली पशूची खूण होती आणि जे त्याच्या मूर्तीची उपासना करत होते त्यांना वेदनादायक व भयंकर फोड आले.

३ दुसऱ्‍या देवदूताने आपली वाटी समुद्रावर ओतली, तेव्हा समुद्रातील पाणी मेलेल्या माणसाच्या रक्‍तासारखे झाले आणि प्रत्येक जिवंत प्राणी,* हो, समुद्रात असलेले सर्वकाही मरून गेले.

४ तिसऱ्‍या देवदूताने आपली वाटी नद्यांवर आणि पाण्याच्या झऱ्‍यांवर ओतली, तेव्हा त्यांचे रक्‍त झाले. ५ मग, पाण्यावर अधिकार असलेल्या देवदूताला मी असे म्हणताना ऐकले: “हे एकनिष्ठ देवा, तू जो आहेस आणि होतास, तू नीतिमान आहेस, कारण तू हा न्यायनिवाडा केला आहे; ६ त्यांनी पवित्र जनांचं आणि संदेष्ट्यांचं रक्‍त सांडलं, आणि तू त्यांना रक्‍त प्यायला दिलं आहेस; ते याच लायकीचे आहेत.” ७ मग मी वेदीला असे म्हणताना ऐकले: “हे सर्वसमर्थ यहोवा* देवा, खरंच, तुझे निर्णय* खरे व न्यायाला धरून आहेत.”

८ चौथ्या देवदूताने आपली वाटी सूर्यावर ओतली आणि लोकांना अग्नीने होरपळून टाकण्याचा अधिकार सूर्याला देण्यात आला. ९ आणि भयंकर उष्णतेमुळे लोक होरपळून गेले, पण त्यांनी पश्‍चात्ताप केला नाही. उलट, त्यांनी देवाच्या नावाची निंदा केली; आणि या पीडांवर अधिकार असलेल्या देवाचा गौरव केला नाही.

१० पाचव्या देवदूताने आपली वाटी जंगली पशूच्या राजासनावर ओतली, तेव्हा त्याच्या राज्यावर अंधार पसरला, आणि वेदनेमुळे लोक जिभा चावू लागले; ११ पण त्यांनी पश्‍चात्ताप केला नाही. उलट, आपल्या वेदनांमुळे व फोडांमुळे त्यांनी स्वर्गाच्या देवाची निंदा केली.

१२ सहाव्या देवदूताने फरात महानदीवर आपली वाटी ओतली, तेव्हा सूर्याच्या उगवतीपासून* येणाऱ्‍या राजांसाठी मार्ग तयार व्हावा म्हणून नदीतील पाणी आटून गेले.

१३ आणि अजगराच्या तोंडातून, जंगली पशूच्या तोंडातून आणि खोट्या संदेष्ट्याच्या तोंडातून बेडकांसारखी दिसणारी तीन अशुद्ध प्रेरित वचने* बाहेर येताना मला दिसली. १४ ती मुळात, दुरात्म्यांनी प्रेरित केलेली वचने आहेत आणि ती चमत्कार करतात; तसेच, ती सबंध पृथ्वीवरील राजांकडे जाऊन त्यांना सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या युद्धासाठी एकत्र करतात.

१५ “पाहा! मी चोरासारखा येत आहे. जो जागा राहतो आणि आपण उघडेवाघडे फिरू नये व लोकांसमोर लज्जित होऊ नये, म्हणून आपली बाह्‍य वस्त्रे राखतो तो सुखी आहे.”

१६ आणि त्यांनी इब्री भाषेत हर्मगिदोन* म्हटलेल्या ठिकाणी सर्व राजांना एकत्र आणले.

१७ सातव्या देवदूताने आपली वाटी हवेत ओतली, तेव्हा पवित्र स्थानातून,* राजासनापासून एक आवाज ऐकू आला, जो म्हणाला: “पूर्ण झालं आहे!” १८ आणि विजा चमकल्या, आवाज व ढगांचे गडगडाट ऐकू आले आणि पृथ्वीवर मानव झाल्यापासून कधीही आला नव्हता, इतका मोठा आणि भयंकर भूकंप आला. १९ त्या मोठ्या नगरीचे तीन भाग झाले, आणि राष्ट्रांतील शहरे कोसळून पडली; आणि देवासमोर मोठ्या बाबेलची आठवण करण्यात आली, यासाठी की त्याने त्याच्या क्रोधाच्या व संतापाच्या द्राक्षारसाचा प्याला तिला द्यावा. २० तसेच, प्रत्येक बेट नाहीसे झाले आणि पर्वतांचा ठावठिकाणा राहिला नाही. २१ मग, लोकांवर आकाशातून मोठमोठ्या गारा पडल्या आणि प्रत्येक गारेचे वजन सुमारे २० किलो* इतके होते; आणि गारांच्या या पीडेमुळे लोकांनी देवाची निंदा केली, कारण ती पीडा खरोखरच महाभयंकर होती.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा