वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रकटीकरण १३
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

प्रकटीकरण पुस्तकाची रूपरेषा

    • १३

      • समुद्रातून वर आलेला सात डोक्यांचा जंगली पशू (१-१०)

      • पृथ्वीतून वर आलेला दोन शिंगाचा पशू (११-१३)

      • सात डोकी असलेल्या पशूची मूर्ती (१४, १५)

      • जंगली पशूची खूण व संख्या (१६-१८)

प्रकटीकरण १३:१

तळटीपा

  • *

    अर्थात, अजगर.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१२, पृ. ८-११, १४-१८

    २/१५/२००९, पृ. ४

    ४/१/२००४, पृ. ४

    ४/१/१९८९, पृ. २०

    १२/१/१९८८, पृ. २५

    ३/१/१९८७, पृ. ५-६

    प्रकटीकरण कळस, पृ. १८६-१८९

    उपासनेतील ऐक्य, पृ. ६३

प्रकटीकरण १३:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १८६-१८९, २२७

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२००४, पृ. ४

    १२/१/१९८८, पृ. २५

    ३/१/१९८७, पृ. ५-६

    उपासनेतील ऐक्य, पृ. ६३

प्रकटीकरण १३:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १८९-१९१

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९८८, पृ. २५-२६

प्रकटीकरण १३:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १९१

प्रकटीकरण १३:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १९१-१९२

प्रकटीकरण १३:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१२, पृ. १५

    ३/१/१९८७, पृ. ५

    प्रकटीकरण कळस, पृ. १९१-१९२

    उपासनेतील ऐक्य, पृ. ६३

प्रकटीकरण १३:८

तळटीपा

  • *

    किंवा “गुंडाळीत.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००९, पृ. ३

    प्रकटीकरण कळस, पृ. १९१-१९२

प्रकटीकरण १३:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १९२-१९३

प्रकटीकरण १३:१०

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “ज्या कोणाला तलवारीने मारले जाणार असेल.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १९२-१९३

प्रकटीकरण १३:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००९, पृ. ३

    ४/१/१९८९, पृ. २०

    १/१/१९९०, पृ. ३१-३२

    ३/१/१९८७, पृ. ६

    प्रकटीकरण कळस, पृ. १९३-१९४

प्रकटीकरण १३:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १९३-१९४

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९८७, पृ. ६

प्रकटीकरण १३:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००९, पृ. ३

    प्रकटीकरण कळस, पृ. १९३-१९४

प्रकटीकरण १३:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १९४-१९५, २४०-२४१

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९८९, पृ. २०

    २/१/१९९०, पृ. २८-२९

    ३/१/१९८७, पृ. ६

प्रकटीकरण १३:१५

तळटीपा

  • *

    किंवा “आत्मा.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १९४-१९५, २४०-२४१

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९८८, पृ. २५-२६

प्रकटीकरण १३:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ९/२०२१, पृ. १८

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००९, पृ. ४

    ४/१/२००४, पृ. ६-७

    ११/१/१९९७, पृ. १५-१६

    प्रकटीकरण कळस, पृ. १९५-१९८

प्रकटीकरण १३:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००९, पृ. ४

    ११/१/१९९७, पृ. १५-१६

    प्रकटीकरण कळस, पृ. १९५-१९८

प्रकटीकरण १३:१८

तळटीपा

  • *

    किंवा “एक मानवी संख्या.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००९, पृ. ४

    ४/१/२००४, पृ. ३, ४-७

    १२/१/१९८८, पृ. २५-२६

    प्रकटीकरण कळस, पृ. १९५-१९६

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
  • नवे जग भाषांतर यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
प्रकटीकरण १३:१-१८

प्रकटीकरण

१३ आणि तो* समुद्राच्या वाळूवर उभा राहिला.

आणि एक जंगली पशू समुद्रातून वर येताना मला दिसला; त्याला दहा शिंगे व सात डोकी होती आणि त्याच्या शिंगांवर दहा मुकुट होते; पण, त्याच्या डोक्यांवर देवाची निंदा करणारी नावे होती. २ मी जो जंगली पशू पाहिला तो एका चित्त्यासारखा होता, पण त्याचे पाय अस्वलाच्या पायांसारखे आणि तोंड सिंहाच्या तोंडासारखे होते. आणि अजगराने या पशूला आपली शक्‍ती, आपले राजासन आणि मोठा अधिकार दिला.

३ त्याच्या एका डोक्याला जणू जीवघेणी जखम झाल्याचे मला दिसले; जखम जीवघेणी असली, तरी ती बरी झाली होती, आणि सगळे जग आश्‍चर्य करत त्या जंगली पशूच्या मागे गेले. ४ त्यांनी अजगराची उपासना केली, कारण त्यानेच जंगली पशूला अधिकार दिला होता; आणि “जंगली पशूसारखं कोण आहे, आणि त्याच्याशी कोण लढू शकेल?” असे म्हणत त्यांनी जंगली पशूचीही उपासना केली. ५ त्याला मोठमोठ्या गोष्टी बोलणारे व देवाची निंदा करणारे तोंड देण्यात आले आणि बेचाळीस महिने आपल्या मनासारखे वागण्याचा अधिकार त्याला देण्यात आला. ६ आणि त्याने आपले तोंड उघडून देवाची, अर्थात त्याच्या नावाची व त्याच्या निवासस्थानाची, इतकेच काय तर स्वर्गात राहणाऱ्‍यांचीही निंदा केली. ७ त्याला पवित्र जनांविरुद्ध लढण्याची व त्यांच्यावर विजय मिळवण्याची परवानगी देण्यात आली, आणि प्रत्येक वंश, लोक, भाषा व राष्ट्र यांवर अधिकार देण्यात आला. ८ पृथ्वीवर राहणारे सर्व जण त्याची उपासना करतील. जगाच्या स्थापनेपासून, यांच्यापैकी एकाचेही नाव वधलेल्या कोकऱ्‍याच्या जीवनाच्या पुस्तकात* लिहिण्यात आलेले नाही.

९ ज्याला कान आहे त्याने ऐकावे. १० जर कोणाला कैद केले जाणार असेल, तर त्याला कैद केले जाईल. जो कोणी एखाद्याला तलवारीने ठार मारेल,* त्याला तलवारीने ठार मारण्यात येईल. म्हणूनच, पवित्र जनांना धीराची आणि विश्‍वासाची गरज आहे.

११ मग, आणखी एक जंगली पशू पृथ्वीतून वर येताना मला दिसला. त्याला कोकऱ्‍यासारखी दोन शिंगे होती, पण तो अजगरासारखा बोलू लागला. १२ तो त्या पहिल्या जंगली पशूचा सर्व अधिकार त्याच्यासमोर चालवतो. आणि ज्याची जीवघेणी जखम बरी झाली होती, त्या पहिल्या जंगली पशूची उपासना करायला तो पृथ्वीला आणि तिच्या रहिवाशांना भाग पाडतो. १३ आणि तो मोठमोठी चिन्हे करतो; लोकांसमोर आकाशातून पृथ्वीवर अग्नीचा वर्षावही करतो.

१४ त्याला जंगली पशूसमोर जी चिन्हे घडवून आणण्याची परवानगी देण्यात आली होती त्यांद्वारे तो पृथ्वीवर राहणाऱ्‍यांना फसवतो. त्यासोबतच, पृथ्वीवर राहणाऱ्‍यांना तो त्या जंगली पशूची मूर्ती बनवायलाही सांगतो, जो तलवारीचा घाव सोसूनसुद्धा वाचला होता. १५ आणि त्याला जंगली पशूच्या मूर्तीमध्ये श्‍वास* फुंकण्याची परवानगी देण्यात आली, यासाठी की जंगली पशूच्या मूर्तीने बोलावे आणि जे जंगली पशूच्या मूर्तीची उपासना करत नाहीत त्या सर्वांची हत्या घडवून आणावी.

१६ तो लहान-मोठे, गरीब-श्रीमंत, स्वतंत्र व गुलाम अशा सर्व लोकांना बळजबरी करतो, यासाठी की त्यांनी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खूण करवून घ्यावी; १७ आणि ज्या व्यक्‍तीवर ती खूण, म्हणजे जंगली पशूचे नाव किंवा त्याच्या नावाची संख्या आहे त्या व्यक्‍तीशिवाय कोणीही खरेदी किंवा विक्री करू नये. १८ ही गोष्ट समजून घेण्यासाठी बुद्धीची गरज आहे: ज्याच्याकडे समजशक्‍ती आहे त्याने जंगली पशूच्या संख्येचा हिशोब करावा, कारण ती एका मनुष्याची संख्या* आहे, आणि त्याची संख्या ६६६ आहे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा