वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ थेस्सलनीकाकर ४
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

१ थेस्सलनीकाकर पुस्तकाची रूपरेषा

    • ४

      • अनैतिक लैंगिक कृत्यांविषयी इशारा (१-८)

      • एकमेकांवर अधिकाधिक प्रेम करा (९-१२)

        • दुसऱ्‍याच्या कारभारात लुडबुड करू नका (११)

      • ख्रिस्तामध्ये मरण पावलेले आधी जिवंत होतील (१३-१८)

१ थेस्सलनीकाकर ४:२

तळटीपा

  • *

    किंवा “आदेश.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९८७, पृ. १७-१८

१ थेस्सलनीकाकर ४:३

तळटीपा

  • *

    ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४१

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/१९९७, पृ. १८

    ५/१/१९९०, पृ. २२

    ४/१/१९८७, पृ. १७

१ थेस्सलनीकाकर ४:४

तळटीपा

  • *

    शब्दशः “भांड्यावर.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९८७, पृ. १७

१ थेस्सलनीकाकर ४:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९८७, पृ. १७

१ थेस्सलनीकाकर ४:६

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ७/२०१९, पृ. १

    सावध राहा!,

    १/२००७, पृ. १९

    ५/८/२०००, पृ. १४

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२००२, पृ. २०-२१

    १/१५/२००१, पृ. ६-७

    ७/१५/१९९७, पृ. १८

१ थेस्सलनीकाकर ४:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ७/२०१९, पृ. १

१ थेस्सलनीकाकर ४:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९८७, पृ. १७-१८

१ थेस्सलनीकाकर ४:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/२००३, पृ. १३-१४

    ४/१/१९८७, पृ. १७-१८

१ थेस्सलनीकाकर ४:१३

तळटीपा

  • *

    किंवा “झोपी गेले आहेत.”

  • *

    किंवा “अजाण.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/१९९४, पृ. ३२

    ४/१/१९८७, पृ. १८-१९

१ थेस्सलनीकाकर ४:१५

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

  • *

    किंवा “झोपी गेलेल्यांच्या.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/२००७, पृ. ३०

    प्रकटीकरण कळस, पृ. १०३-१०४

१ थेस्सलनीकाकर ४:१६

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/२००७, पृ. ३०

    ४/१/१९८७, पृ. १९-२०

    प्रकटीकरण कळस, पृ. १०३-१०४, १८०-१८१

१ थेस्सलनीकाकर ४:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१५, पृ. १८-१९

    ९/१५/२००८, पृ. २९

    १/१/२००७, पृ. ३०

    ४/१/१९८७, पृ. २०

    प्रकटीकरण कळस, पृ. १०३-१०४, २११

१ थेस्सलनीकाकर ४:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९८७, पृ. १६-२०

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
  • नवे जग भाषांतर यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
१ थेस्सलनीकाकर ४:१-१८

१ थेस्सलनीकाकर

४ बांधवांनो, शेवटी प्रभू येशूद्वारे आम्ही तुम्हाला विनंती व आग्रह करतो, की देवाचे मन आनंदित करण्यासाठी तुम्ही कसे वागावे याविषयी आम्ही तुम्हाला ज्याप्रमाणे मार्गदर्शन दिले आणि ज्याप्रमाणे तुम्ही करतही आहात, त्याचप्रमाणे आणखी पूर्णपणे करत राहा. २ कारण, प्रभू येशूद्वारे आम्ही तुम्हाला ज्या सूचना* दिल्या, त्या तुम्हाला माहीतच आहेत.

३ देवाची इच्छा हीच आहे की तुम्ही पवित्र असावे आणि अनैतिक लैंगिक कृत्यांपासून* स्वतःला दूर ठेवावे. ४ तुमच्यापैकी प्रत्येकाला स्वतःच्या शरीरावर,* पवित्रतेने व आदराने नियंत्रण ठेवता आले पाहिजे. ५ देवाला न ओळखणाऱ्‍या विदेश्‍यांसारखे लोभीपणाने, अनियंत्रित लैंगिक वासनेच्या आहारी जाऊ नका. ६ कोणीही या बाबतीत उचित मर्यादा ओलांडून आपल्या भावाचा गैरफायदा घेऊ नये, कारण या सर्व गोष्टींबद्दल यहोवा* शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. याविषयी आम्ही तुम्हाला पूर्वीच सांगितले होते आणि कडक ताकीदही दिली होती. ७ कारण देवाने आपल्याला अशुद्धतेसाठी नाही, तर पवित्रतेसाठी बोलावले आहे. ८ त्यामुळे, जो कोणी या शिकवणीचा अनादर करतो तो माणसांचा नाही, तर तुम्हाला आपला पवित्र आत्मा देणाऱ्‍या देवाचा अनादर करतो.

९ पण बंधुप्रेमाविषयी बोलायचे झाले, तर या बाबतीत आम्ही तुम्हाला काही लिहिण्याची गरज नाही, कारण देवाने स्वतः तुम्हाला एकमेकांवर प्रेम करायला शिकवले आहे. १० खरेतर, सबंध मासेदोनियाच्या सर्व बांधवांवर तुम्ही अशा प्रकारचे प्रेम करतही आहात. पण बांधवांनो, आम्ही तुम्हाला ते अधिकाधिक करण्याचे प्रोत्साहन देतो. ११ आम्ही शिकवल्याप्रमाणे, तुम्ही दुसऱ्‍याच्या कारभारात लुडबुड न करता शांतीने राहण्याचा व आपल्या हातांनी कष्ट करण्याचा नेहमी प्रयत्न करा. १२ यासाठी की, बाहेरच्या लोकांच्या दृष्टीत तुम्ही नेहमी सभ्यपणे चालावे आणि तुमच्यात कोणतीही कमी असू नये.

१३ शिवाय बांधवांनो, जे मरण पावले आहेत* त्यांच्याविषयी तुम्ही अंधारात* असावे अशी आमची इच्छा नाही, यासाठी की ज्यांना कोणतीही आशा नाही अशा लोकांप्रमाणे तुम्ही शोक करू नये. १४ कारण येशू मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला या गोष्टीवर जर आपला विश्‍वास असेल, तर मग जे येशूद्वारे मरण पावले आहेत, त्यांनाही देव त्याच्यासोबत असण्याकरता जिवंत करेल. १५ यहोवाच्या* वचनाने आम्ही तुम्हाला हे सांगतो, की जिवंत असलेल्यांपैकी जे आपण प्रभूच्या उपस्थितीपर्यंत हयात असू, ते मरण पावलेल्यांच्या* पुढे जाणारच नाही; १६ कारण, प्रभू स्वतः देवाचा कर्णा घेऊन आद्यदेवदूताच्या* वाणीने आज्ञा देत स्वर्गातून उतरेल, आणि ख्रिस्तासोबत ऐक्यात असलेल्यांपैकी जे मेले आहेत ते आधी जिवंत होतील. १७ त्यानंतर, जिवंत असलेल्यांपैकी जे आपण हयात असू त्यांना आकाशात प्रभूला भेटण्यासाठी ढगांमध्ये उचलून घेतले जाईल आणि अशा रीतीने आपण सदासर्वदा प्रभूसोबत राहू. १८ तेव्हा, या गोष्टींनी एकमेकांना सांत्वन देत जा.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा