वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ करिंथकर ७
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ करिंथकर पुस्तकाची रूपरेषा

    • ७

      • दूषित करणाऱ्‍या गोष्टींपासून स्वतःला शुद्ध करा (१)

      • करिंथकरांमुळे पौलला आनंद (२-४)

      • तीत चांगली बातमी घेऊन येतो (५-७)

      • देवाच्या इच्छेनुसार असलेले दुःख आणि पश्‍चात्ताप (८-१६)

२ करिंथकर ७:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४०

    सावध राहा!,

    क्र. ३ २०१९, पृ. ४-५

    पृ. २०

    देवाचे प्रेम, पृ. १०७-१०८

    टेहळणी बुरूज,

    ११/१/२००६, पृ. २७

    ८/१/१९९७, पृ. ५-७

    ४/१/१९८७, पृ. ११

    कुटुंब, पृ. ४५-४८

२ करिंथकर ७:५

तळटीपा

  • *

    शब्दशः “शरीर.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१४, पृ. २३

    ११/१५/१९९८, पृ. ३०

    ११/१/१९९६, पृ. ११-१२

२ करिंथकर ७:६

तळटीपा

  • *

    शब्दशः “उपस्थितीद्वारे.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १६६

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/१९९८, पृ. ३०

    ११/१/१९९६, पृ. ११-१२

२ करिंथकर ७:७

तळटीपा

  • *

    शब्दशः “तुमचा आवेश.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १६६

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/१९९८, पृ. ३०

२ करिंथकर ७:१०

तळटीपा

  • *

    किंवा “आपल्याला वाचवले जाते.”

२ करिंथकर ७:११

तळटीपा

  • *

    किंवा “निष्कलंक; निर्दोष.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९७, पृ. १४

२ करिंथकर ७:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/१९९८, पृ. ३०

२ करिंथकर ७:१६

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “तुमच्यामुळे मला खूप धीर मिळतो.”

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
  • नवे जग भाषांतर यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
२ करिंथकर ७:१-१६

२ करिंथकर

७ म्हणूनच प्रिय बांधवांनो, आपल्याला ही अभिवचने मिळाली असल्यामुळे आपण शरीराला व आत्म्याला दूषित करणाऱ्‍या सर्व गोष्टींपासून स्वतःला शुद्ध करू या आणि देवाचे भय बाळगून अधिकाधिक पवित्र होऊ या.

२ आमचा मनापासून स्वीकार करा. आम्ही कोणाचे वाईट केले नाही, कोणाचे नुकसान केले नाही, कोणाचा गैरफायदाही घेतला नाही. ३ अर्थात, तुम्हाला दोष देण्यासाठी मी या गोष्टी बोलत नाही. कारण मी आधीच सांगितले आहे, की आम्ही जगलो किंवा मेलो तरी तुम्ही कायम आमच्या मनात असाल. ४ तुमच्याशी मी अगदी मनमोकळेपणाने बोलू शकतो. मला तुमचा फार अभिमान वाटतो. तुमच्यामुळे, मला खूप दिलासा मिळाला आहे; आमच्यावर इतकी संकटे असूनही माझे मन आनंदाने ओसंडून वाहत आहे.

५ आम्ही मासेदोनियात आलो, तेव्हा खरेतर आमच्या जिवाला* जराही विसावा नव्हता. आम्ही सर्व प्रकारची दुःखे सहन करत होतो; बाहेर भांडणतंटे, तर आत भीती. ६ पण देव, जो खचून गेलेल्यांचे सांत्वन करतो, त्याने तीतच्या भेटीद्वारे* आमचे सांत्वन केले. ७ आणि केवळ त्याच्या भेटीमुळेच नाही, तर मला भेटण्यासाठी तुमची आतुरता, तुम्ही करत असलेला शोक, माझ्याबद्दल असलेली तुमची काळजी* हे सर्व आम्हाला येऊन सांगताना त्याला तुमच्याकडून किती दिलासा मिळाला हे ऐकूनसुद्धा आम्हाला सांत्वन मिळाले; आणि म्हणून मला आणखी जास्त आनंद झाला.

८ मी लिहिलेल्या पत्रामुळे तुम्हाला दुःख झाले असले, तरी याबद्दल मला वाईट वाटत नाही. अर्थात, सुरुवातीला वाटले (कारण थोड्या वेळासाठी का होईना ते पत्र वाचून तुम्हाला दुःख झाले होते), ९ पण आता मात्र मला आनंद होतो; कारण तुम्हाला फक्‍त दुःखच झाले नाही, तर त्या दुःखामुळे तुम्ही पश्‍चात्ताप करण्यासही प्रवृत्त झाला. तुमचे हे दुःख, देवाच्या इच्छेनुसार असल्यामुळे आम्ही तुम्हाला आधी जे सांगितले त्यामुळे तुमचे मुळीच नुकसान झाले नाही. १० कारण, देवाच्या इच्छेनुसार असलेल्या दुःखामुळे पश्‍चात्ताप उत्पन्‍न होऊन तारण होते* आणि यामुळे पुढे पस्तावा करण्याची वेळ येत नाही; याउलट, जगातल्या लोकांसारख्या दुःखामुळे मरण येते. ११ कारण पाहा! देवाच्या इच्छेनुसार असलेल्या दुःखामुळे तुमच्यामध्ये इतकी उत्सुकता निर्माण झाली, की तुम्ही तुमच्यातला दोष दूर करण्यास झटला, झालेल्या चुकीबद्दल तुम्हाला मनापासून वाईट वाटले, तुमच्या मनात देवाबद्दल गाढ आदर, पश्‍चात्ताप करण्याची प्रामाणिक इच्छा व आवेश उत्पन्‍न झाला आणि तुम्ही आपली चूक सुधारली! या बाबतीत तुम्ही सर्व प्रकारे शुद्ध* असल्याचे दाखवून दिले. १२ मी तुम्हाला जे पत्र लिहिले ते, चूक करणाऱ्‍यामुळे किंवा ज्याच्याविरुद्ध चूक करण्यात आली त्याच्यामुळे नाही, तर आम्ही सांगितलेल्या गोष्टी ऐकण्यास तुम्ही किती उत्सुक आहात हे देवाच्या समोर सिद्ध व्हावे म्हणून लिहिले. १३ यामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे.

पण, यासोबतच तीतला मिळालेल्या आनंदामुळे आम्ही आणखीनच आनंदी झालो, कारण तुम्ही त्याच्या मनाला उभारी दिली. १४ मी तुमच्याविषयी त्याच्याजवळ जो अभिमान व्यक्‍त केला त्यामुळे माझ्यावर खाली पाहण्याची वेळ आली नाही; आम्ही तुम्हाला सांगितलेल्या सर्व गोष्टी जितक्या खऱ्‍या होत्या, तितकाच आम्ही तीत याच्याजवळ व्यक्‍त केलेला अभिमानही खरा ठरला. १५ इतकेच नाही, तर तुमच्या सर्वांची आज्ञाधारक वृत्ती आणि तुम्ही भीतभीत व थरथर कापत कशा प्रकारे त्याचा स्वीकार केला या गोष्टींची त्याला आठवण होते तेव्हा तुमच्याबद्दल त्याला आणखीनच आपुलकी वाटते. १६ मला या गोष्टीचा आनंद होतो, की मी सर्व बाबतींत तुमच्यावर भरवसा ठेवू शकतो.*

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा