वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ करिंथकर १
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ करिंथकर पुस्तकाची रूपरेषा

    • १

      • नमस्कार (१, २)

      • सर्व संकटांत देवाकडून सांत्वन (३-११)

      • पौलच्या प्रवासाच्या योजनेत फेरबदल (१२-२४)

२ करिंथकर १:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    ४/२०१९, पृ. ७

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०१७, पृ. १३, १६

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०११, पृ. २३-२४

    १०/१/२००८, पृ. २७

    ३/१५/२००८, पृ. १५

    १२/१५/१९९६, पृ. ३०

    ११/१/१९९६, पृ. १३-१४

    ६/१/१९९५, पृ. ११-१२

    ७/१/१९८६, पृ. १७-१९

२ करिंथकर १:४

तळटीपा

  • *

    किंवा “संकटांमध्ये.”

  • *

    किंवा “आपल्याला धीर देतो.”

  • *

    किंवा “संकटात.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    ४/२०१९, पृ. ७

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०११, पृ. २३-२४

    १०/१/२००८, पृ. २७

    ३/१५/२००८, पृ. १५

    २/१५/१९९८, पृ. २६

    ११/१/१९९६, पृ. १३-१४

    ६/१/१९९५, पृ. ११-१२

२ करिंथकर १:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९६, पृ. १४

२ करिंथकर १:६

तळटीपा

  • *

    किंवा “संकटांना.”

  • *

    किंवा “वाचवले जावे.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९६, पृ. १४

२ करिंथकर १:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९६, पृ. १२-१३, १४-१६

२ करिंथकर १:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१४, पृ. २३

    १२/१५/१९९६, पृ. २४

    ११/१/१९९६, पृ. १६-१७

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १६३

२ करिंथकर १:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९६, पृ. १६-१७

२ करिंथकर १:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९६, पृ. १६

२ करिंथकर १:१३

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “ज्या तुम्हाला आधीच चांगल्या प्रकारे माहीत आहेत.”

  • *

    शब्दशः “शेवटपर्यंत.”

२ करिंथकर १:१५

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “तुम्हाला दोन वेळा फायदा व्हावा.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१४, पृ. ३०-३१

२ करिंथकर १:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१४, पृ. ३०-३१

    १०/१५/२०१२, पृ. २८-२९

२ करिंथकर १:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१४, पृ. ३१

२ करिंथकर १:१९

तळटीपा

  • *

    ज्याला सीला असेही म्हणतात.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१४, पृ. ३१

२ करिंथकर १:२०

तळटीपा

  • *

    शब्दशः “‘हो’ आहेत.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१४, पृ. ३१

    १२/१५/२००८, पृ. १३

२ करिंथकर १:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९५, पृ. १०

२ करिंथकर १:२२

तळटीपा

  • *

    किंवा “आगाऊ रक्कम (विसार).”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०१६, पृ. ३२

    १/२०१६, पृ. १८

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९५, पृ. १०

    प्रकटीकरण कळस, पृ. ११५

२ करिंथकर १:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०१२, पृ. २८-२९

२ करिंथकर १:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०१३, पृ. २७-२८

    १/१५/२००३, पृ. १६

    ६/१/१९९९, पृ. १५-१६

    ३/१५/१९९८, पृ. २१-२२

    ९/१/१९९६, पृ. २२-२३

    ४/१/१९९५, पृ. १८

    ९/१/१९९४, पृ. १४

    ८/१/१९९१, पृ. १९

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
  • नवे जग भाषांतर यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
२ करिंथकर १:१-२४

२ करिंथकर

१ करिंथ येथील देवाची मंडळी व सबंध अखयातल्या सर्व पवित्र जनांना, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित असलेला पौल व आपला भाऊ तीमथ्य यांच्याकडून:

२ देव जो आपला पिता आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हाला अपार कृपा व शांती लाभो.

३ आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव व पिता, जो अतिशय करुणामय असा पिता आहे, आणि सर्व प्रकारच्या सांत्वनाचा देव आहे, त्याची स्तुती असो. ४ तो आपल्या सर्व परीक्षांमध्ये* आपले सांत्वन करतो,* अशा हेतूने, की देवाकडून मिळणाऱ्‍या या सांत्वनाद्वारे आपल्यालाही इतरांचे, कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत* सांत्वन करता यावे. ५ कारण ज्या प्रकारे ख्रिस्तासाठी आपल्याला पुष्कळ संकटांना तोंड द्यावे लागते, त्याच प्रकारे ख्रिस्ताद्वारे आपल्याला पुष्कळ सांत्वनदेखील मिळते. ६ आता, जर आम्हाला परीक्षांना* तोंड द्यावे लागते, तर ते यासाठी की तुम्हाला सांत्वन व तारण मिळावे;* आणि जर आमचे सांत्वन केले जाते, तर तेसुद्धा तुमच्याच सांत्वनासाठी आहे. कारण, आम्हाला जी दुःखे सोसावी लागतात, त्याच प्रकारची दुःखे सोसण्यास हे सांत्वन तुम्हाला साहाय्य करते. ७ आणि तुमच्याविषयी आमची आशा ही न डळमळणारी आहे. कारण, ज्या प्रकारे तुम्ही आमच्यासोबत दुःखे सोसता, त्याच प्रकारे आमच्यासोबत तुमचे सांत्वनही केले जाईल हे आम्हाला माहीत आहे.

८ बांधवांनो, आशिया प्रांतात आम्हाला जे संकट सोसावे लागले त्याविषयी तुम्हाला माहीत असावे असे आम्हाला वाटते. तिथे आमच्यावर इतक्या भयंकर समस्या आल्या, की स्वतःच्या बळावर त्यांचा सामना करणे आम्हाला शक्य नव्हते; एवढेच काय, तर आमच्या जिवाचीही आम्हाला खातरी नव्हती. ९ खरेतर आम्हाला मृत्युदंड सुनावण्यात आला आहे असे आम्हाला वाटले. हे यासाठी घडले की आम्ही स्वतःवर नाही, तर जो मेलेल्यांना उठवतो त्या देवावर भरवसा ठेवावा. १० त्याने आम्हाला मरणासारख्या मोठ्या संकटातून वाचवले, पुढेही वाचवेल आणि वाचवत राहील अशी आम्ही आशा बाळगतो. ११ तुम्हीही आमच्यासाठी देवाला याचना करण्याद्वारे आमचे साहाय्य करू शकता. कारण यामुळे, अनेकांनी केलेल्या प्रार्थनांचे उत्तर म्हणून आमच्यावर होणाऱ्‍या कृपेबद्दल अनेकांना देवाचे आभार मानण्याची संधी मिळेल.

१२ आम्हाला अभिमान वाटतो तो या गोष्टीचा, की जगातल्या लोकांशी आणि विशेषतः तुमच्याशी व्यवहार करताना आम्ही पवित्रतेने व देव शिकवत असलेल्या प्रामाणिकपणाने वागलो; आणि मानवी बुद्धीने नाही, तर देवाच्या अपार कृपेने वागलो आणि याविषयी आमचा विवेक साक्ष देतो. १३ कारण ज्या गोष्टी तुम्ही वाचू शकता* व ज्यांचा अर्थ समजून घेऊ शकता अशा गोष्टींशिवाय आम्ही तुम्हाला दुसरे काही लिहीत नाही, आणि तुम्ही या गोष्टी पुढेही* पूर्णपणे समजून घेत राहाल अशी मी आशा करतो. १४ खरेतर, तुम्ही काही प्रमाणात हे समजूनही घेतले आहे, की आम्ही तुमच्यासाठी अभिमानाचे कारण आहोत आणि तुम्हीही आपला प्रभू येशू याच्या दिवशी आमच्यासाठी अभिमानाचे कारण असाल.

१५ याच भरवशामुळे मी आधी तुमच्याकडे येण्याच्या विचारात होतो, यासाठी की तुम्हाला आनंद करण्याची आणखी एक संधी मिळावी;* १६ कारण मासेदोनियाला जात असताना आणि तिथून परतताना तुम्हाला भेट द्यावी, आणि मग यहूदीयाला जाताना तुम्ही काही अंतरापर्यंत सोबत येऊन मला निरोप द्यावा, असा माझा विचार होता. १७ आता, असा विचार करताना मी बेजबाबदारपणे वागलो का? किंवा मानवी विचारसरणीनुसार या गोष्टींची योजना करून आधी, “हो, हो” आणि नंतर “नाही, नाही” असे मी म्हणालो का? १८ पण ज्याप्रमाणे देव भरवशालायक आहे त्याचप्रमाणे आम्ही तुम्हाला जे सांगतो तेही खरे आहे. आम्ही आधी “हो” आणि नंतर “नाही,” असे म्हणणार नाही. १९ कारण देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त, ज्याच्याबद्दल आम्ही, म्हणजेच मी, सिल्वान* व तीमथ्य याने तुमच्यामध्ये घोषणा केली, तो ख्रिस्त “हो” आणि तरीसुद्धा “नाही” असा झाला नाही; तर त्याच्या बाबतीत “हो” याचा अर्थ नेहमी “हो” असाच झाला आहे. २० कारण देवाची कितीही अभिवचने असली, तरी ती सर्व ख्रिस्ताद्वारे खरी ठरली आहेत.* आणि म्हणून, त्याच्याचद्वारे आपण देवाला “आमेन” असे म्हणतो आणि यामुळे आपल्याद्वारे त्याचा गौरव होतो. २१ पण तुम्ही आणि आम्ही ख्रिस्ताचे आहोत या गोष्टीची जो हमी देतो आणि ज्याने आपल्याला अभिषिक्‍त केले, तो स्वतः देव आहे. २२ त्याने आपल्यावर त्याचा शिक्का मारला आहे आणि आपल्याला येणाऱ्‍या गोष्टींची एक हमी* दिली आहे, अर्थात, आपल्या हृदयात त्याने दिलेला त्याचा आत्मा.

२३ तुम्हाला आणखी दुःख द्यायचे नसल्यामुळेच मी अजून करिंथला आलेलो नाही. हे खोटे असल्यास देवाने माझ्याविरुद्ध साक्ष द्यावी. २४ आम्ही तुमच्या विश्‍वासावर सत्ता गाजवणारे आहोत असे नाही, तर तुमच्या आनंदासाठी आम्ही तुमचे सहकारी आहोत, कारण तुम्ही उभे आहात ते तुमच्या स्वतःच्याच विश्‍वासामुळे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा