वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रेषितांची कार्यं ४
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

प्रेषितांची कार्ये पुस्तकाची रूपरेषा

    • ४

      • पेत्र व योहान यांना अटक (१-४)

        • विश्‍वास ठेवणाऱ्‍यांची संख्या पाच हजार इतकी झाली (४)

      • न्यायसभेसमोर चौकशी (५-२२)

        • “बोलायचं आम्ही थांबवू शकत नाही” (२०)

      • धैर्य मिळण्यासाठी प्रार्थना (२३-३१)

      • शिष्य आपल्या वस्तू एकमेकांसोबत वाटून घेतात (३२-३७)

प्रेषितांची कार्यं ४:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ३/२०२०, पृ. ३१

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ३१

प्रेषितांची कार्यं ४:२

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

  • *

    किंवा “येशूचे उदाहरण घेऊन मेलेल्यांच्या पुनरुत्थानाबद्दल.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ३१

प्रेषितांची कार्यं ४:३

तळटीपा

  • *

    किंवा “अटक केली.”

प्रेषितांची कार्यं ४:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ३५

प्रेषितांची कार्यं ४:१०

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

प्रेषितांची कार्यं ४:११

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ११/२०१८, पृ. ५

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०११, पृ. १२-१३

    ७/१५/२०००, पृ. १४

प्रेषितांची कार्यं ४:१३

तळटीपा

  • *

    किंवा “उघडपणे.”

  • *

    किंवा “निरक्षर,” अर्थात, रब्बींच्या शाळांमध्ये शिक्षण न घेतलेले; त्यांना लिहिता वाचता येत नव्हते असा अर्थ नाही.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/२०१८, पृ. ४

    ५/१/२००६, पृ. २२-२३

    सावध राहा!,

    ४/८/१९९८, पृ. २५

प्रेषितांची कार्यं ४:१५

तळटीपा

  • *

    अर्थात, यहुदी उच्च न्यायालय. शब्दार्थसूची पाहा.

प्रेषितांची कार्यं ४:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २२

प्रेषितांची कार्यं ४:२२

तळटीपा

  • *

    शब्दशः “चिन्ह.”

प्रेषितांची कार्यं ४:२५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००४, पृ. १६-१७

प्रेषितांची कार्यं ४:२६

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

  • *

    किंवा “त्याच्या ख्रिस्ताच्या.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००४, पृ. १६-१७

प्रेषितांची कार्यं ४:२९

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ३४-३५

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९०, पृ. २८

प्रेषितांची कार्यं ४:३१

तळटीपा

  • *

    किंवा “कळकळीने प्रार्थना.”

प्रेषितांची कार्यं ४:३२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९९१, पृ. ३१-३२

प्रेषितांची कार्यं ४:३६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/१९९८, पृ. २०

    १२/१/१९९०, पृ. २८

प्रेषितांची कार्यं ४:३७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/१९९८, पृ. २०

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
  • नवे जग भाषांतर यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
प्रेषितांची कार्यं ४:१-३७

प्रेषितांची कार्यं

४ ते दोघे लोकांशी बोलत असताना याजक, मंदिराचा अधिकारी आणि सदूकी लोक त्यांच्याजवळ आले. २ ते सर्व चिडले होते, कारण प्रेषित लोकांना शिकवत होते आणि येशूचे मेलेल्यांतून पुनरुत्थान* झाले आहे असे* उघडपणे सांगत होते. ३ म्हणून, त्यांनी त्यांना धरले* आणि संध्याकाळ झाली असल्यामुळे दुसऱ्‍या दिवसापर्यंत कैदेत ठेवले. ४ पण, प्रेषितांनी सांगितलेल्या गोष्टी ज्यांनी ऐकल्या होत्या, त्यांपैकी बऱ्‍याच जणांनी विश्‍वास ठेवला आणि अशा रीतीने माणसांची संख्या सुमारे पाच हजार इतकी झाली.

५ दुसऱ्‍या दिवशी त्यांचे अधिकारी, वडील जन आणि शास्त्री यरुशलेममध्ये एकत्र जमले. ६ मुख्य याजक हन्‍ना, कयफा, योहान, आलेक्सांद्र आणि मुख्य याजकाचे सर्व नातेवाईकही तिथे होते. ७ त्यांनी पेत्र व योहान यांना मध्ये उभे करून विचारले: “तुम्ही कोणाच्या सामर्थ्याने किंवा नावाने हे काम केलं?” ८ तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन त्यांना म्हणाला:

“लोकांच्या अधिकाऱ्‍यांनो व वडील जनांनो, ९ जर आज एका पांगळ्या माणसासाठी केलेल्या चांगल्या कामाबद्दल आमची चौकशी होत असेल आणि या माणसाला कोणी बरं केलं हे खरंच तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, १० तर तुम्हा सर्वांना आणि इस्राएलच्या सर्व लोकांना हे कळावं, की ज्याला तुम्ही वधस्तंभावर* खिळून ठार मारलं, पण ज्याला देवाने मेलेल्यांतून उठवलं, त्या नासरेथच्या येशू ख्रिस्ताच्या नावाने हा माणूस आज इथे तुमच्यासमोर धडधाकट उभा आहे. ११ ‘बांधकाम करणाऱ्‍यांनी, म्हणजे तुम्ही जो दगड तुच्छ लेखला व जो कोपऱ्‍याचा मुख्य दगड* बनला आहे,’ तोच हा आहे. १२ शिवाय, तारण आणखी कोणाच्याही द्वारे मिळणं शक्य नाही, कारण ज्याद्वारे आपलं तारण होऊ शकेल, असं आकाशाखाली माणसांमध्ये दुसरं कोणतंही नाव देण्यात आलेलं नाही.”

१३ पेत्र व योहान किती धैर्याने* बोलत आहेत हे त्यांनी पाहिले, आणि खरेतर ते अशिक्षित* व साधारण आहेत हे त्यांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांना फार आश्‍चर्य वाटले. आणि ही माणसे येशूसोबत असायची हे त्यांनी ओळखले. १४ पण, ज्याला बरे करण्यात आले होते तो माणूस तिथेच उभा असल्यामुळे त्यांना त्यांच्याविरुद्ध काहीच बोलता आले नाही. १५ म्हणून त्यांनी त्यांना न्यायसभेच्या* बाहेर जायला सांगितले आणि ते आपसात चर्चा करू लागले, १६ व म्हणू लागले: “या माणसांचं आपण काय करावं? कारण त्यांनी खरोखरच एक अद्‌भुत चिन्ह केलं आहे; शिवाय, यरुशलेमच्या सर्व लोकांनी स्वतःच्या डोळ्यांनी ते पाहिलं असल्यामुळे आपण ते नाकारूही शकत नाही. १७ पण आता ही गोष्ट लोकांमध्ये आणखी पसरू नये म्हणून आपण त्यांना धमकावून, पुन्हा या नावाने कोणाशीही न बोलण्याची ताकीद देऊ या.”

१८ मग त्यांनी त्यांना आत बोलावले आणि असा आदेश दिला, की त्यांनी येशूच्या नावाने काहीच बोलू किंवा शिकवू नये. १९ पण पेत्र आणि योहान यांनी त्यांना असे उत्तर दिले: “आम्ही देवापेक्षा तुमचं ऐकावं, हे देवाच्या दृष्टीने योग्य ठरेल का, हे तुम्हीच ठरवा. २० पण आमच्याविषयी विचाराल, तर ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या व ऐकल्या आहेत त्यांबद्दल बोलायचं आम्ही थांबवू शकत नाही.” २१ तेव्हा, त्यांनी त्यांना आणखी धमकावले आणि त्यांची सुटका केली कारण त्यांना शिक्षा देण्यासारखा कोणताही पुरावा त्यांना सापडला नाही; तसेच त्यांना लोकांचीही भीती होती, कारण ते सर्व जण घडलेल्या चमत्काराबद्दल देवाचा गौरव करत होते. २२ कारण ज्या माणसाला चमत्काराने* बरे करण्यात आले होते, त्याचे वय चाळीसपेक्षा जास्त होते.

२३ त्यांची सुटका झाल्यानंतर ते आपल्या लोकांकडे गेले आणि मुख्य याजकांनी व वडील जनांनी त्यांना काय म्हटले होते, हे त्यांना सांगितले. २४ हे ऐकून त्या सर्वांनी मिळून देवाला मोठ्याने अशी प्रार्थना केली:

“हे सर्वोच्च प्रभू, ज्याने आकाश, पृथ्वी आणि समुद्र व त्यांतील सर्व गोष्टी बनवल्या तो तूच आहेस. २५ आणि तूच पवित्र आत्म्याद्वारे आमचा पूर्वज व तुझा सेवक दावीद याच्या तोंडून असं म्हटलं: ‘राष्ट्रे का खवळली आहेत आणि देशोदेशीचे लोक व्यर्थ गोष्टींवर विचार का करत आहेत? २६ पृथ्वीचे राजे यहोवाच्या* व त्याच्या अभिषिक्‍त जनाच्या* विरोधात उभे राहिले आणि अधिकारी त्यांच्या विरोधात एकजूट झाले.’ २७ कारण खरोखरच हेरोद आणि पंतय पिलात, तसंच विदेशी लोक व इस्राएली लोक तुझा पवित्र सेवक येशू, ज्याला तू अभिषिक्‍त केलं, त्याच्या विरोधात या शहरात एकत्र झाले होते, २८ यासाठी की जे काही घडण्याविषयी तू आपल्या सामर्थ्यानुसार व संकल्पानुसार आधीच ठरवलं होतं, ते त्यांनी करावं. २९ तर आता, हे यहोवा* त्यांच्या धमक्यांकडे लक्ष दे आणि तुझं वचन पूर्ण धैर्याने सांगत राहण्यासाठी तुझ्या सेवकांना बळ दे, ३० आणि तू आपला हात पुढे करून लोकांना बरं कर आणि तुझा पवित्र सेवक येशू याच्या नावाने चिन्हे व चमत्कार घडवून आण.”

३१ त्यांनी अशी याचना* केली, तेव्हा ज्या ठिकाणी ते सर्व एकत्र जमले होते ती जागा हादरली आणि ते सर्वच्या सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि देवाचे वचन धैर्याने सांगू लागले.

३२ शिवाय, ज्यांनी विश्‍वास ठेवला होता ते सर्व जण एकदिलाने व ऐक्याने राहायचे आणि त्यांच्यापैकी कोणीही आपल्या मालकीच्या वस्तू स्वतःच्या आहेत, असे म्हणत नव्हता, तर ते सर्व गोष्टी एकमेकांसोबत वाटून घ्यायचे. ३३ आणि प्रेषित मोठ्या प्रभावशाली रीतीने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाबद्दल साक्ष देत राहिले आणि देव त्या सर्वांवर आपल्या अपार कृपेचा वर्षाव करत होता. ३४ खरेतर, त्यांच्यापैकी कोणीही गरजू नव्हता, कारण ज्या कोणाच्या मालकीची शेते किंवा घरे होती, तो ती विकून त्यातून मिळालेला पैसा ३५ प्रेषितांच्या पायांजवळ आणून ठेवायचा. मग ज्याच्या त्याच्या गरजेनुसार ते पैसे वाटून दिले जायचे. ३६ उदाहरणार्थ, कुप्र इथला रहिवासी योसेफ, जो लेवी होता आणि ज्याला प्रेषितांनी बर्णबा (ज्याचा अर्थ “सांत्वनाचा पुत्र” असा होतो) असे नाव दिले होते, ३७ त्याच्याही मालकीची एक जमीन होती आणि त्याने ती विकली व मिळालेले पैसे आणून प्रेषितांच्या पायांजवळ ठेवले.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा