वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w15 ७/१ पृ. ९
  • तुम्हाला माहीत होतं का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्हाला माहीत होतं का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • मिळती जुळती माहिती
  • सिंहांच्या गुहेत दानीएल
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • सिंह—आफ्रिकेतील जंगलाचा राजा
    सावध राहा!—१९९९
  • निर्दयी अश्‍शुर दुसरे प्रबळ जागतिक साम्राज्य
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • बॅबिलोनमधला बंदिवास ते जेरूसलेमच्या वेशीची पुनर्बांधणी
    बायबल कथांचं माझं पुस्तक
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
w15 ७/१ पृ. ९

तुम्हाला माहीत होतं का?

उत्खननात मिळालेले पुरावे बायबलचं समर्थन करतात का?

अश्‍शूरी राजा सर्गोन दुसरा याचं दगडावरील उठावदार चित्र

यशया २०:१ मध्ये उल्लेख करण्यात आलेला अश्‍शूरी राजा सर्गोन दुसरा

बिब्लिकल आर्कियॉलॉजी रिव्ह्यू या नियतकालिकाच्या एका लेखात सांगितलं होतं, की बायबलमधल्या इब्री शास्त्रवचनांतील “कमीत कमी ५०” व्यक्‍ती खरंच अस्तित्वात होते हे उत्खननात मिळालेल्या पुराव्यांमुळं आता सिद्ध झालं आहे. या व्यक्‍तींमध्ये नामांकित राजा दावीद, हिज्किया, मनहेम, पेकह यांसारखे यहूदाचे व इस्राएलचे १४ राजे आहेत. शिवाय या यादीत इजिप्तचे ५ फारो आणि अश्‍शूर, बॅबिलॉन, मवाब, पर्शिया आणि सिरिया या देशांचे १९ राजे यांचाही समावेश होतो. बायबलमधील राजांसोबतच काही महायाजक, शास्त्री आणि इतर अधिकारी हेदेखील खरोखरचे व्यक्‍ती होते याचेही पुरावे उत्खननात मिळाले आहेत.

वर उल्लेख केलेल्या नियतकालिकानुसार बरेच विद्वान खातरीनं सांगतात की हे सर्व लोक खरंच अस्तित्वात होते. बायबलमधल्या ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत हेरोद, पंतय पिलात, तिबिर्य, कयफा आणि सिर्ग्य पौल या व्यक्‍तींचा उल्लेख करण्यात आला आहे. आणि हे लोक अस्तित्वात होते याचे पुरावेही उत्खननात मिळाले आहेत.

पवित्र भूमी म्हटल्या जाणाऱ्‍या देशांतून सिंह केव्हा लुप्त झाले?

प्राचीन बॅबिलॉनमधील चकचकीत विटांवर रेखाटलेलं सिंहाच चित्र

प्राचीन बॅबिलॉनमधील चकचकीत विटांवर रेखाटलेलं चित्र

हे खरं आहे की पवित्र भूमी म्हटल्या जाणाऱ्‍या इस्राएल आणि पॅलेस्टाईन देशांमध्ये आज सिंह लुप्त झाले आहेत. पण बायबलमध्ये सिंहांचा १५० वेळा संदर्भ दिला आहे. यावरून हे कळतं की बायबलच्या लेखकांना सिंहांची माहिती होती. यातील बरेच संदर्भ लाक्षणिक असले तरी काही संदर्भावरून दिसून येतं की लोकांचा सिंहांशी आमना-सामना झाला होता. जसं की, शमशोन, दावीद आणि बनाया यांनी सिंहांना ठार केल्याचा उल्लेख आहे. (शास्ते १४:५, ६; १ शमुवेल १७:३४, ३५; २ शमुवेल २३:२०) तर काही ठिकाणी सिंहांनी लोकांना मारल्याचा उल्लेख आहे.—१ राजे १३:२४; २ राजे १७:२५.

प्राचीन काळात, आशिया मायनर आणि ग्रीस या देशांपासून ते पॅलेस्टाईन, सिरिया, मेसोपोटेमिया आणि उत्तर-पश्‍चिम भारतापर्यंत आशियाई सिंह पाहायला मिळायचे. इथले लोक सिंहाला घाबरायचे पण त्याला मानायचेही; म्हणून ते सिंहाचे चित्र भिंतींवर रंगवायचे. प्राचीन बॅबिलॉनच्या प्रमुख मंदिराला जोडणाऱ्‍या पवित्र मार्गाच्या भिंतींवर सिंहांच्या मोठमोठ्या प्रतिमा असायच्या.

इसवी सन १२ व्या शतकाच्या शेवटी पॅलेस्टाईनमध्ये युद्ध झालं होतं. त्या वेळी काही राजांनी सिंहांची शिकार केल्याचं म्हटलं जातं. त्यामुळं १४ व्या शतकाच्या सुरुवातीला त्या भागातील सिंह लुप्त झाल्याचे दिसून आले आहे. पण मेसोपोटेमिया आणि सिरियामध्ये मात्र १९ व्या शतकापर्यंत आणि इराण-इराकमध्ये २० व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत सिंहांचं अस्तित्व असल्याचा उल्लेख आहे.▪ (w15-E 05/01)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा