मुख्य विषय | जग अंताच्या उंबरठ्यावर?
अंतातून बरेच जण बचावतील—त्यांपैकी तुम्हीसुद्धा असू शकता!
अंतादरम्यान येणाऱ्या संकटांबद्दल बायबल असं म्हणतं: “जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही, ... असे मोठे संकट त्या काळी येईल; आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता.” (मत्तय २४:२१, २२) पण देव आपल्याला याची खातरी देतो की बरेच जण वाचतील. तो म्हणतो: “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.”—१ योहान २:१७.
जगाच्या विनाशातून वाचून तुम्हाला “सर्वकाळ” जिवंत राहायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही जीवनावश्यक गोष्टी साठवून ठेवल्या पाहिजेत का किंवा दुसऱ्या काही योजना केल्या पाहिजेत का? नाही, उलट देवाच्या इच्छेनुसार वागण्याकडे आपण सर्वात जास्त लक्ष दिलं पाहिजे असं बायबलमध्ये आर्जवलं आहे. त्यात असं म्हटलं आहे: “ही सर्व अशी लयास जाणारी आहेत म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?” (२ पेत्र ३:१०-१२) या वचनात “ही सर्व” असं जे म्हटलं आहे त्यामध्ये कोणाचा समावेश होतो? त्यामध्ये या भ्रष्ट जगाच्या सर्व राजकीय घटकांचा आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांचा समावेश होतो; ते देवाच्या राज्याचं समर्थन करत नाहीत आणि त्यांचा नाश केला जाईल. यावरून स्पष्ट होतं की, आपण भौतिक गोष्टींची जमवाजमव करत राहिलो तर जगाच्या अंतातून आपला बचाव होणार नाही.
आपला बचाव व्हावा असं वाटत असेल तर आपण यहोवा देवाला विश्वासू असलं पाहिजे आणि त्याचं मन आनंदित होईल अशा प्रकारे वागण्यास शिकलं पाहिजे. (सफन्या २:३) आपण किती महत्त्वपूर्ण काळात जगत आहोत याच्या स्पष्ट चिन्हांकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा आणि जमावाच्या मागे जाण्यापेक्षा, यहोवाचा दिवस किती जवळ आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. लवकरच येणाऱ्या विनाशातून तुम्ही कसं वाचू शकता याची माहिती यहोवाचे साक्षीदार तुम्हाला बायबलमधून देतील. ▪ (w15-E 05/01)