बाप्तिस्मा घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी प्रश्न
भाग १ ख्रिस्ती विश्वास
यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास केल्यामुळे तुम्हाला सत्य माहीत झालं आहे. या माहितीमुळे नक्कीच तुम्हाला देवासोबत जवळचं नातं जोडायला मदत झाली असेल. तसंच तुम्हाला देवाच्या राज्यात, पृथ्वीवरच्या नंदनवनामध्ये जीवनाचा आनंद घेण्याची आणि अनेक आशीर्वाद उपभोगण्याची आशाही मिळाली आहे. देवाच्या वचनावर तुमचा विश्वास आणखी मजबूत झाला आहे. आणि ख्रिस्ती मंडळीसोबत संगती केल्यामुळे तुम्हाला आजही बरेच आशीर्वाद अनुभवायला मिळाले आहेत. यहोवा आज आपल्या लोकांशी कशा प्रकारे व्यवहार करतो हे समजून घेण्याची तुम्हाला संधी मिळाली आहे.—जख. ८:२३.
आता तुम्ही बाप्तिस्म्याची तयारी करत असताना, काही महत्त्वाच्या ख्रिस्ती विश्वासांची उजळणी करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. मंडळीचे वडील तुमच्यासोबत ही उजळणी करतील. (इब्री ६:१-३) यहोवाला जाणून घेण्याच्या तुमच्या प्रयत्नांवर त्याने आशीर्वाद द्यावा आणि त्याने वचन दिलेलं जीवनाचं बक्षीस तुम्हाला द्यावं हीच आमची प्रार्थना आहे.—योहा. १७:३.
१. तुम्हाला बाप्तिस्मा का घ्यायचा आहे?
२. यहोवा कोण आहे?
“वर आकाशात व खाली पृथ्वीवर परमेश्वरच [“यहोवाच,” NW] देव आहे, दुसरा कोणी नाही.”—अनु. ४:३९.
“तू, केवळ तूच, परमेश्वर [“याव्हे,” तळटीप] ह्या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळून येईल.”—स्तो. ८३:१८.
३. तुम्ही देवाच्या नावाचा उपयोग करणं का महत्त्वाचं आहे?
“तेव्हा अशा प्रकारे प्रार्थना करा: ‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझं नाव पवित्र मानलं जावो.’”—मत्त. ६:९.
“जो कोणी यहोवाचं नाव घेऊन त्याला हाक मारेल, त्याला वाचवलं जाईल.”—रोम. १०:१३.
४. यहोवाचं वर्णन करण्यासाठी बायबलमध्ये कोणते शब्द वापरण्यात आले आहेत?
“परमेश्वर हा सनातन देव, परमेश्वर, दिगंतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्नकर्ता . . . आहे.”—यश. ४०:२८.
“आमच्या स्वर्गातील पित्या.” —मत्त. ६:९.
“देव प्रेम आहे.”—१ योहा. ४:८.
५. तुम्ही यहोवा देवाला काय देऊ शकता?
“तू आपला देव यहोवा याच्यावर आपल्या पूर्ण मनाने आणि आपल्या पूर्ण जिवाने आणि आपल्या पूर्ण बुद्धीने आणि आपल्या पूर्ण शक्तीने प्रेम कर.”—मार्क १२:३०.
“तू केवळ तुझा देव यहोवा याचीच उपासना कर आणि केवळ त्याचीच पवित्र सेवा कर.”—लूक ४:८.
६. तुम्हाला यहोवाला एकनिष्ठ का राहायचं आहे?
“माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्यास मी प्रत्युत्तर देईन.”—नीति. २७:११.
७. तुम्ही कोणाला प्रार्थना करता आणि कोणाच्या नावाने करता?
“मी [येशू] तुम्हाला अगदी खरं सांगतो, तुम्ही पित्याकडे काहीही मागितलं, तरी तो माझ्या नावाने तुम्हाला देईल.”—योहा. १६:२३.
८. तुम्ही कोणकोणत्या गोष्टींसाठी प्रार्थना करू शकता?
“तेव्हा अशा प्रकारे प्रार्थना करा: ‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझं नाव पवित्र मानलं जावो. तुझं राज्य येवो. तुझी इच्छा जशी स्वर्गात पूर्ण होत आहे, तशी पृथ्वीवरही होवो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जसं आम्ही आमच्या कर्जदारांना माफ केलं आहे, तसं तूदेखील आमची कर्जे माफ कर. आम्हाला मोहास बळी पडू देऊ नको, तर त्या दुष्टापासून वाचव.’”—मत्त. ६:९-१३.
“देवाच्या बाबतीत आपल्याला ही खातरी आहे, की त्याच्या इच्छेनुसार असलेले काहीही आपण मागितले तरी तो आपले ऐकतो.”—१ योहा. ५:१४.
९. एखाद्या व्यक्तीच्या प्रार्थना यहोवा का ऐकणार नाही?
“त्या समयी ते परमेश्वराला आरोळी मारतील तरी तो त्यांचे ऐकावयाचा नाही . . . कारण त्यांनी दुष्कत्ये केली आहेत.”—मीखा ३:४.
“यहोवाचे डोळे नीतिमानांकडे लागलेले असतात आणि तो त्यांच्या याचनेकडे कान लावतो, पण वाईट गोष्टी करणाऱ्याकडे यहोवा पाठ फिरवतो.”—१ पेत्र ३:१२.
१०. येशू ख्रिस्त कोण आहे?
“शिमोन पेत्र याने उत्तर दिले: ‘तू ख्रिस्त, जिवंत देवाचा पुत्र आहेस.’”—मत्त. १६:१६.
११. येशू पृथ्वीवर का आला होता?
“मनुष्याचा पुत्रदेखील सेवा करून घेण्यासाठी नाही, तर सेवा करण्यासाठी आणि अनेकांच्या मोबदल्यात आपलं जीवन खंडणी म्हणून देण्यासाठी आला आहे.”—मत्त. २०:२८.
“मला इतर शहरांतही देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश घोषित केला पाहिजे, कारण मला यासाठीच पाठवण्यात आलं आहे.”—लूक ४:४३.
१२. येशूने दिलेल्या बलिदानाबद्दल तुम्हाला कदर आहे हे तुम्ही कसं दाखवू शकता?
“तो सर्वांसाठी मेला ते या हेतूने, की जे जगतात त्यांनी यापुढे स्वतःसाठी नाही, तर जो त्यांच्यासाठी मेला आणि उठवला गेला, त्याच्यासाठी जगावे.”—२ करिंथ. ५:१५.
१३. येशूकडे कोणता अधिकार आहे?
“स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आला आहे.”—मत्त. २८:१८.
“देवाने त्याला एक श्रेष्ठ स्थान देऊन गौरवले आणि त्याच्यावर कृपा करून इतर सर्व नावांपेक्षा महान असलेले नाव त्याला बहाल केले.”—फिलिप्पै. २:९.
१४. यहोवाच्या साक्षीदारांचं नियमन मंडळ हाच येशूने नेमलेला “विश्वासू आणि बुद्धिमान दास” आहे, असं तुम्ही मानता का?
“आपल्या घरातील सेवकांना योग्य वेळी अन्न पुरवण्यासाठी मालकाने ज्याला नेमलं, असा विश्वासू आणि बुद्धिमान दास खरोखर कोण आहे?”—मत्त. २४:४५.
१५. पवित्र आत्मा एक व्यक्ती आहे का?
“तेव्हा देवदूत तिला म्हणाला: ‘पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि सर्वोच्च देवाचं सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. आणि म्हणूनच जो जन्माला येईल त्याला पवित्र व देवाचा पुत्र असं म्हटलं जाईल.’”—लूक १:३५.
“तुम्ही पापी असूनही आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी द्यायचं तुम्हाला कळतं, तर मग जे स्वर्गातील पित्याकडे मागतात त्यांना तो किती विशेषकरून पवित्र आत्मा देईल!”—लूक ११:१३.
१६. यहोवाने त्याच्या पवित्र आत्म्याचा कसा वापर केला आहे?
“परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले; त्याच्या मुखश्वासाने [पवित्र आत्म्याने] आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले.”—स्तो. ३३:६.
“पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल आणि तुम्ही यरुशलेममध्ये, सबंध यहूदीयात आणि शोमरोनात, तसंच पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांत माझ्याविषयी साक्ष द्याल.”—प्रे. कार्ये १:८.
“शास्त्रातील कोणतीही भविष्यवाणी कोणी स्वतःच्या मनाप्रमाणे केलेली नाही. कारण, भविष्यवाणी ही कधीही माणसाच्या इच्छेनुसार झाली नाही, तर माणसे देवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने बोलली.”—२ पेत्र १:२०, २१.
१७. देवाचं राज्य काय आहे?
“स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसऱ्याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.”—दानी. २:४४.
१८. देवाच्या राज्यामुळे तुम्हाला कसा फायदा होईल?
“तो त्यांच्या डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल, आणि यापुढे मरण नसेल; तसंच शोक, रडणं किंवा दुःखही नसेल; कारण, आधीच्या गोष्टी नाहीशा झाल्या आहेत.”—प्रकटी. २१:४.
१९. आपल्याला देवाच्या राज्याचे आशीर्वाद लवकरच मिळतील असं आपण का म्हणू शकतो?
“शिष्य एकांतात त्याच्याजवळ येऊन म्हणाले: ‘आम्हाला सांग, या गोष्टी केव्हा होतील आणि तुझ्या उपस्थितीचं आणि जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीचं चिन्ह काय असेल?’ यावर येशूने त्यांना उत्तर दिलं: ‘. . . एका राष्ट्रावर दुसरं राष्ट्र आणि एका राज्यावर दुसरं राज्य हल्ला करेल. ठिकठिकाणी दुष्काळ पडतील आणि भूकंप होतील. आणि सगळ्या राष्ट्रांना साक्ष मिळावी म्हणून राज्याचा हा आनंदाचा संदेश संपूर्ण जगात घोषित केला जाईल आणि त्यानंतर अंत येईल.’”—मत्त. २४:३, ४, ७, १४.
“शेवटच्या दिवसांत अतिशय कठीण काळ येईल हे लक्षात ठेव. कारण, लोक केवळ स्वतःवर प्रेम करणारे, पैशावर प्रेम करणारे, बढाई मारणारे, गर्विष्ठ, निंदा करणारे, आईवडिलांचे न ऐकणारे, उपकारांची जाण न ठेवणारे, बेइमान, माया-ममता नसलेले, कोणत्याही गोष्टीशी सहमत न होणारे, इतरांची बदनामी करणारे, संयम नसलेले, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम नसलेले, विश्वासघात करणारे, अडेल वृत्तीचे, गर्वाने फुगलेले, देवापेक्षा चैनीची आवड असलेले, देवाची भक्ती करण्याचा केवळ दिखावा करून आपल्या जीवनावर तिचा प्रभाव न होऊ देणारे असे असतील.”—२ तीम. ३:१-५.
२०. देवाचं राज्य तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे हे तुम्ही कसं दाखवता?
“आधी देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्त्व मिळवण्याचा प्रयत्न करत राहा.”—मत्त. ६:३३.
“येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला: ‘जर कोणाला माझ्यामागे यायचं असेल तर त्याने स्वतःला नाकारावं आणि आपला वधस्तंभ उचलून माझ्यामागे चालत राहावं.’”—मत्त. १६:२४.
२१. सैतान आणि दुरात्मे कोण आहेत?
“तुम्ही तुमचा पिता, सैतान याच्यापासून आहात . . . तो तर सुरुवातीपासूनच खुनी आहे.”—योहा. ८:४४.
“सबंध पृथ्वीवरील लोकांना फसवणाऱ्या त्या मोठ्या अजगराला, म्हणजेच दियाबल व सैतान म्हटलेल्या त्या जुन्या सापाला खाली फेकण्यात आले; त्याला पृथ्वीवर फेकून देण्यात आले आणि त्याच्यासोबत त्याच्या दूतांनाही फेकण्यात आले.”—प्रकटी. १२:९.
२२. सैतानाने यहोवावर आणि त्याची उपासना करणाऱ्यांवर कोणते आरोप लावले आहेत?
“स्त्रीने सर्पास म्हटले, ‘बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की “ते खाऊ नका; त्याला स्पर्शही करु नका, कराल तर मराल.”’ सर्प स्त्रीला म्हणाला, ‘तुम्ही खरोखर मरणार नाही; कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील, आणि तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.’”—उत्प. ३:२-५.
“सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले, ‘त्वचेसाठी त्वचा! मनुष्य आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल.’”—ईयो. २:४.
२३. सैतानाचे आरोप खोटे आहेत हे तुम्ही कसं सिद्ध करू शकता?
“मनोभावे [देवाची] सेवा कर.”—१ इति. २८:९.
“माझा प्राण जाईतोवर मी आपले सत्त्वसमर्थन सोडणार नाही.”—ईयो. २७:५.
२४. माणसं का मरतात?
“एका माणसाद्वारे पाप जगात आले आणि पापाद्वारे मरण आले, त्याच प्रकारे मरण सर्व माणसांमध्ये पसरले, कारण त्या सर्वांनी पाप केले होते.”—रोम. ५:१२.
२५. मेलेले लोक कोणत्या स्थितीत असतात?
“आपणास मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते; पण मृतांस तर काहीच कळत नाही.”—उप. ९:५.
२६. ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्यासाठी कोणती आशा आहे?
“नीतिमान आणि अनीतिमान अशा सर्व लोकांचं पुनरुत्थान होणार आहे.”—प्रे. कार्ये २४:१५.
२७. येशूसोबत राज्य करायला किती लोक स्वर्गात जाणार आहेत?
“पाहा! कोकरा सीयोन पर्वतावर उभा असलेला मला दिसला आणि त्याच्यासोबत १,४४,००० जण होते, ज्यांच्या कपाळांवर कोकऱ्याचे व त्याच्या पित्याचे नाव लिहिलेले होते.”—प्रकटी. १४:१.