वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w25 ऑक्टोबर पृ. २-५
  • १९२५—शंभर वर्षांआधी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १९२५—शंभर वर्षांआधी
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • अपेक्षा लांबणीवर पडली
  • रेडिओ स्टेशनचा विस्तार
  • एका महत्त्वाच्या सत्याचा उलगडा
  • यहोवाबद्दल साक्ष देण्यात आली
  • आवड असलेल्यांना पुन्हा भेटणं
  • पुढे पाहताना
  • १९२४​—⁠शंभर वर्षांआधी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • १९२२​—शंभर वर्षांआधी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • सर्वात अधिक प्रगतीशील संघटनेसोबत सेवा करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • यहोवा त्याच्या लोकांना कामासाठी एकत्रित व सुसज्ज करतो
    यहोवाचे साक्षीदार जगभरात देवाची इच्छा ऐक्याने आचरीत आहेत
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
w25 ऑक्टोबर पृ. २-५
इंडियानामधल्या इंडियानापोलीस इथे १९२५ मध्ये झालेल्या अधिवेशनात बरेच भाऊबहीण फोटोसाठी एकत्र आलेत.

१९२५ साली इंडियानामधल्या इंडियानापोलिस इथे झालेलं अधिवेशन

१९२५—शंभर वर्षांआधी

१ जानेवारी १९२५ च्या टेहळणी बुरूज अंकात असं सांगण्यात आलं होतं: “या वर्षी घडणाऱ्‍या खास घडामोडींची आपण उत्सुकतेने वाट पाहत आहोत.” त्याच अंकात पुढे असं म्हणण्यात आलं होतं: “पण या गोष्टीची आपण जास्त चिंता करू नये. कारण जर असं झालं, तर प्रभूच्या कामापासून आपलं लक्ष भरकटू शकतं आणि आपण यहोवाची सेवा करायचं सोडून देऊ शकतो.” पण मग १९२५ मध्ये बायबल विद्यार्थी नेमकी कशाची अपेक्षा करत होते? आणि त्यांच्या हाती निराशा आली तरी ते प्रभूच्या कामात कसे व्यस्त राहिले?

अपेक्षा लांबणीवर पडली

बरेच बायबल विद्यार्थी असं मानायचे, की १९२५ ला पृथ्वी नंदनवन बनेल. याबद्दल ब्रदर अल्बर्ट श्रोडर (हे भाऊ नंतर नियमन मंडळाचे सदस्य बनले) यांनी असं म्हटलं: “आम्ही असं मानायचो, की १९२५ ला उरलेले अभिषिक्‍त जन स्वर्गात जातील. त्यासोबतच अब्राहाम आणि दावीदसारख्या विश्‍वासू लोकांचं पुनरुत्थान होईल आणि ते पृथ्वीवरच्या कामांत पुढाकार घेतील.” १९२५ हे वर्ष सरत गेलं, पण त्यांच्या अपेक्षा काही पूर्ण झाल्या नाहीत. यामुळे साहजिकच काही लोक निराश झाले.—नीति. १३:१२.

असं असलं तरी, बरेचसे बायबल विद्यार्थी प्रचाराच्या कामात व्यस्त राहिले. त्यासोबतच त्यांना याची जाणीव झाली, की इतरांना यहोवाबद्दल सांगणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून जास्तीत जास्त लोकांना सत्य शिकवण्यासाठी त्यांनी रेडिओचा वापर केला. चला, त्याबद्दल पाहू या.

रेडिओ स्टेशनचा विस्तार

१९२४ ला बऱ्‍याच लोकांना डब्लू.बी.बी.आर. रेडिओ स्टेशनमधून प्रसारित केलेल्या कार्यक्रमांचा फायदा झाला. म्हणून १९२५ ला बायबल विद्यार्थ्यांनी अमेरिकेमधल्या शिकागो या शहराजवळ आणखी एक रेडिओ स्टेशन बांधलं. याला “वर्ड” (शब्द) असं नाव देण्यात आलं. याच्या बांधकामात काम केलेल्या ब्रदर राल्फ लेफलर यांनी म्हटलं: “कडाक्याच्या थंडीत, रात्रीच्या वेळी दूरदूर राहणाऱ्‍या बऱ्‍याच ठिकाणचे लोक या स्टेशनवर प्रसारित होणारा कार्यक्रम ऐकायचे.” उदाहरणार्थ, रेडिओ स्टेशनपासून ५,००० किलोमीटरपेक्षा जास्त दूर असलेल्या अलास्कामधल्या एका शहरात राहणाऱ्‍या कुटुंबाने, या स्टेशनवरचे सुरुवातीचे काही कार्यक्रम ऐकले. त्यानंतर लगेच त्यांनी स्टेशनवर काम करणाऱ्‍यांना एक पत्र लिहिलं. त्यात त्यांनी प्रोत्साहन देणाऱ्‍या या आध्यात्मिक कार्यक्रमांसाठी त्यांचे आभार मानले.

डावीकडे: इलीनॉय इथे असलेले “वर्ड” या रेडिओ स्टेशनचे ट्रान्समिशन टावर्स

उजवीकडे: राल्फ लेफलर रेडिओ स्टेशनवर काम करताना

इतक्या दूरदूरच्या ठिकाणी राहणारे लोकसुद्धा हे कार्यक्रम कसे ऐकू शकत होते, याचं कारण १ डिसेंबर १९२५ च्या टेहळणी बुरूज अंकात सांगण्यात आलं होतं. त्यात म्हटलं होतं: “वर्ड हे रेडिओ स्टेशन अमेरिकेमधल्या सगळ्यात जबरदस्त रेडिओ स्टेशनपैकी एक आहे. त्यामुळे अमेरिकेतल्या पूर्व आणि पश्‍चिम किनारपट्टीवरचे, तसंच क्युबा आणि अलास्काच्या अगदी उत्तरेकडचे लोकसुद्धा यावर प्रसारित होणारे कार्यक्रम ऐकू शकतात. ज्यांनी सत्य कधीच ऐकलं नव्हतं, अशा बऱ्‍याच जणांना हे कार्यक्रम ऐकल्यामुळे सत्याबद्दल आणखी जाणून घ्यावंसं वाटलं आहे.”

जॉर्ज नॅश

त्याच वेळी बायबल विद्यार्थी कॅनडामध्येही रेडिओच्या माध्यमातून आनंदाच्या संदेशाचा प्रचार करता यावा म्हणून प्रयत्न करत होते. १९२४ ला बायबल विद्यार्थ्यांनी सास्काचेवानमधल्या सास्काटून शहरामध्ये ‘चक’ (CHUC) नावाचं एक रेडिओ स्टेशन बांधलं होतं. हे स्टेशन कॅनडामध्ये धार्मिक कार्यक्रम प्रसारित करणाऱ्‍या सुरुवातीच्या रेडिओ स्टेशनांपैकी एक होतं. पण तिथे जागा कमी पडू लागल्यामुळे १९२५ मध्ये वॉच टावर सोसायटीने त्याचा मालकी हक्क घेतला आणि त्या स्टुडिओमधली सगळी साधनं रिजंट नावाच्या एका बिल्डींगमध्ये हलवली. ही बिल्डींग आधी सास्काटूनमधलं एक नाट्यगृह होतं. वॉच टावर सोसायटीने ते विकत घेतलं आणि त्याला रेडिओ स्टेशन बनवण्यासाठी त्यात थोडीफार सुधारणा केली.

या स्टेशनमुळे सास्काचेवानच्या खेड्यापाड्यांमधल्या बऱ्‍याच लोकांना पहिल्यांदा आनंदाचा संदेश ऐकायला मिळाला. रेडिओ स्टेशनपासून लांब एका दुर्गम भागात एक स्त्री राहायची. कार्यक्रम ऐकल्यावर तिने पत्र लिहून बायबल साहित्यं मागवली. हा अनुभव आठवून ब्रदर जॉर्ज नॅश यांनी असं म्हटलं: “त्या स्त्रीचं पत्र वाचून तिच्यापर्यंत ही साहित्यं पोहोचणं किती गरजेचंय हे आमच्या लक्षात आलं. म्हणून आम्ही तिला स्टडीज इन द स्क्रिप्चर्स याचा संग्रह दिला.” याचा परिणाम म्हणजे, ती स्त्री दूरदूरपर्यंत इतरांना आनंदाचा संदेश सांगू लागली.

एका महत्त्वाच्या सत्याचा उलगडा

१ मार्च १९२५ च्या टेहळणी बुरूज अंकात “एका राष्ट्राचा जन्म” नावाचा एक खास लेख होता. हा लेख खास होता असं का म्हणता येईल? बायबल विद्यार्थी अगोदर असं मानायचे की सैतानाची एक संघटना आहे. त्या संघटनेत स्वर्गातल्या दुष्ट स्वर्गदूतांसोबत पृथ्वीवरचे धर्म, सरकारं आणि व्यापार जगत आहे. पण “एका राष्ट्राचा जन्म” या लेखाचा वापर करून ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाने’ भाऊबहिणींना हे समजायला मदत केली, की यहोवाचीसुद्धा एक संघटना आहे. ती संघटना सैतानाच्या संघटनेपेक्षा खूप वेगळी आहे आणि त्याच्या विरोधात आहे. (मत्त. २४:४५) त्यासोबतच ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाने’ हेसुद्धा सांगितलं, की १९१४ ला देवाचं राज्य स्वर्गात सुरू झालं. तसंच, त्या वर्षी “स्वर्गात युद्ध” झाल्यामुळे सैतानाला आणि त्याच्या दुष्ट स्वर्गदूतांना स्वर्गातून हाकलून पृथ्वीवर फेकून देण्यात आलं.—प्रकटी. १२:७-९.

काही जणांना ही नवीन समज स्वीकारणं कठीण गेलं. ही गोष्ट लक्षात ठेवून ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाने’ त्या लेखात असं म्हटलं: “ज्या वाचकांना या लेखातल्या गोष्टी पटत नसतील, त्यांनी धीर धरून यहोवावर भरवसा ठेवावा आणि त्याची विश्‍वासूपणे सेवा करत राहावी.”

टॉम एर हा ब्रिटनमधला भाऊ त्या वेळी कॉलपोर्टर (पायनियर) म्हणून सेवा करत होता. बऱ्‍याचशा बायबल विद्यार्थ्यांना या लेखाबद्दल काय वाटलं याबद्दल त्याने असं सांगितलं: “प्रकटीकरण पुस्तकाच्या १२ व्या अध्यायाच्या स्पष्टीकरणामुळे भाऊबहिणींना खूप आनंद झाला. देवाचं राज्य स्वर्गात स्थापन झालंय हे जेव्हा आमच्या लक्षात आलं, तेव्हा ही आनंदाची बातमी इतरांना सांगण्याचा आमचा आवेश खूप वाढला. त्यामुळे आम्हाला आणखी जास्त प्रचार करावासा वाटला आणि मोठमोठ्या गोष्टी करण्यासाठी यहोवा त्याच्या लोकांचं नेतृत्व कसं करतोय हेसुद्धा आम्ही पाहू शकलो.”

यहोवाबद्दल साक्ष देण्यात आली

आज यहोवाचे साक्षीदार यशया ४३:१० हे वचन सर्रास वापरतात. त्यात म्हटलंय: “यहोवा म्हणतो, ‘तुम्ही माझे साक्षीदार आहात, हो, तू माझा सेवक आहेस.’” पण १९२५ च्या आधी आपल्या प्रकाशनांमध्ये हे वचन फार क्वचित वापरलं जायचं. पण विशेष म्हणजे, १९२५ दरम्यान यशया ४३:१० आणि १२ या वचनांवर टेहळणी बुरूजच्या ११ अंकांमध्ये चर्चा करण्यात आली!

ऑगस्ट १९२५ ला बायबल विद्यार्थी इंडियानामधल्या इंडियानापोलिस इथे एका अधिवेशनासाठी एकत्र आले होते. त्या अधिवेशनाच्या कार्यक्रम पत्रिकेत पाहुण्यांच्या स्वागतासाठी एक संदेश छापण्यात आला होता. त्यात ब्रदर रदरफर्ड यांनी असं म्हटलं: “आपण प्रभूकडून बळ मिळवण्यासाठी . . . या अधिवेशनाला आलो आहोत. यामुळे आपल्याला यहोवाबद्दल साक्ष देण्यासाठी पुन्हा नव्या जोमाने प्रचार करता येईल.” या आठ दिवसाच्या कार्यक्रमात भाऊबहिणींना प्रत्येक संधीचा फायदा घेऊन यहोवाबद्दल साक्ष देण्याचं प्रोत्साहन मिळालं.

अधिवेशनात शनिवारच्या दिवशी, म्हणजे २९ ऑगस्टला ब्रदर रदरफर्डने एक भाषण दिलं. त्याचा विषय होता, “ही वेग वाढवण्याची वेळ आहे.” या भाषणात त्यांनी प्रचार करायच्या महत्त्वावर जोर देत असं म्हटलं: “यहोवा त्याच्या लोकांना म्हणतो . . . : ‘तुम्ही माझे साक्षीदार आहात, आणि मीच देव आहे.’ असं म्हटल्यानंतर तो त्यांना स्पष्ट शब्दांत एक आज्ञासुद्धा देतो. तो म्हणतो: ‘लोकांसाठी निशाणी म्हणून झेंडा उभारा.’ यहोवा पवित्र शक्‍तीने ज्यांचं मार्गदर्शन करतो फक्‍त तेच झेंडा उभारू शकतात, म्हणजे त्याच्याबद्दल साक्ष देऊ शकतात. कारण ते त्याचे लोक आहेत.”—यश. ४३:१२; ६२:१०.

या पत्रिकेत “आशेचा संदेश” होता

आशेचा संदेश ही पत्रिका

या भाषणानंतर तिथे हजर असलेल्यांसमोर “आशेचा संदेश” या विषयाचा एक प्रस्ताव मांडण्यात आला. त्यात असं सांगितलं होतं की “शांती, समृद्धी, आरोग्य, जीवन, स्वातंत्र्य आणि कायमच्या आनंदाचा आशीर्वाद” आपल्याला फक्‍त देवाचं राज्यच देऊ शकतं. या प्रस्तावाला सगळ्यांनी एकमताने सहमती दिली. नंतर हा प्रस्ताव बऱ्‍याच भाषांमध्ये पत्रिकेच्या रूपात छापण्यात आला. आणि याच्या जवळपास चार कोटी प्रती वाटण्यात आल्या.

याच्या बऱ्‍याच वर्षांनंतरही यहोवाच्या साक्षीदारांना बायबल विद्यार्थी म्हणूनच ओळखलं जायचं. पण असं असलं तरी, त्यांना दिवसेंदिवस हे जाणवत होतं की साक्ष देण्याची त्यांची जबाबदारी किती महत्त्वाची आहे.

आवड असलेल्यांना पुन्हा भेटणं

आता जगभरात बायबल विद्यार्थ्यांची संख्या वाढत होती. त्यामुळे संघटनेने भाऊबहिणींना असं प्रोत्साहन दिलं, की त्यांनी फक्‍त साहित्यच वाटू नये तर आवड असलेल्यांना पुन्हा जाऊन भेटावं. आशेचा संदेश ही पत्रिका वाटण्याची मोहीम झाल्यानंतर बुलेटिनमध्येa असं सांगण्यात आलं: “ज्या लोकांना आशेचा संदेश या पत्रिकेशिवाय इतर कोणतंही साहित्य देण्यात आलं नाही त्या लोकांना जाऊन पुन्हा भेटा.”

जानेवारी १९२५ च्या बुलेटिनमध्ये टेक्सासच्या प्लानो इथल्या एका बायबल विद्यार्थ्याचा अनुभव देण्यात आला होता. त्याने म्हटलं: “नवीन ठिकाणी प्रचार केल्यावर जितका प्रतिसाद मिळत नाही, तितका चांगला प्रतिसाद बऱ्‍याच वेळा प्रचार केलेल्या ठिकाणी मिळतो, हे पाहून आम्हाला खूप आश्‍चर्य वाटतं. आमच्या जवळच्या एका छोट्या शहरात आम्ही गेल्या दहा वर्षांमध्ये पाच वेळा पुन्हा लोकांना भेटलो . . . नुकतंच सिस्टर हेन्ड्रिक्स आणि माझी आई पुन्हा त्या शहरात प्रचार करायला गेली आणि त्यांनी कधी नव्हे इतकी पुस्तकं तिथे दिली.”

तसंच पनामामधल्या कॉलपोर्टरने असं लिहिलं: “ज्यांनी पहिल्यांदा माझं ऐकून घेतलं नाही, त्यांच्याकडे मी दुसऱ्‍यांदा आणि तिसऱ्‍यांदा भेटायला गेलो तेव्हा त्यांनी माझं चांगल्या प्रकारे ऐकून घेतलं. मागच्या संपूर्ण वर्षात प्रचार केलेल्यांना पुन्हा भेटण्यासाठी मी माझा बराच वेळ दिला. आणि त्यांपैकी काहींच्या बाबतीत मला खूप चांगले अनुभव आले.”

पुढे पाहताना

१९२५ च्या शेवटी, ब्रदर रदरफर्ड यांनी सगळ्या कॉलपोर्टरना एक पत्र लिहिलं. भाऊबहिणींनी त्या वर्षी जे साध्य केलं आणि पुढे त्यांना काय करायचं होतं याबद्दल त्यांनी सांगितलं. त्यांनी म्हटलं: “मागच्या वर्षी दुःखी असलेल्या बऱ्‍याच लोकांना सांत्वन देण्याचा तुम्हाला बहुमान मिळाला. यामुळे तुम्हाला नक्कीच खूप आनंद झाला असेल . . . आणि पुढच्या वर्षी तुमच्याकडे देवाबद्दल साक्ष देण्याची आणि त्याचे खरे उपासक कोण आहेत हे दाखवून देण्याची संधी असेल. . . . तर चला, आपण सगळे मिळून आपल्या देवाचा आणि राजाचा गौरव करू या.”

१९२५ च्या शेवटी भावांनी ब्रुकलिनमधल्या बेथेलचा विस्तार करण्याची योजना केली. १९२६ मध्ये आपल्या संघटनेचा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा बांधकाम प्रकल्प सुरू होणार होता.

बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आपले भाऊ नवीन इमारतीच्या बांधकामाचं काम करत आहेत.

१९२६ साली न्यू यॉर्कमधल्या ब्रुकलिनच्या ॲडम्स स्ट्रीटवरचं बांधकाम

a आताचं आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा