वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w22 फेब्रुवारी पृ. ३१
  • तुम्हाला माहीत होतं का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्हाला माहीत होतं का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • त्याला मानवांच्या मर्यादांची जाणीव आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • तुम्हाला माहीत होतं का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • स्थलांतराच्या रहस्यांचा छडा लावणे
    सावध राहा!—१९९५
  • तुमचे देणे स्व-त्यागाचे आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
w22 फेब्रुवारी पृ. ३१

तुम्हाला माहीत होतं का?

पारव्यांचं किंवा कबुतरांचं अर्पण देणं इस्राएली लोकांना सोईस्कर का होतं?

मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे पारवे किंवा कबुतरं यहोवाला अर्पण केली जाऊ शकत होती. अर्पणं देण्याच्या नियमांमध्ये या दोन पक्ष्यांचा उल्लेख नेहमी सोबत करण्यात आला आहे. त्यामुळे अर्पणांसाठी पारव्यांऐवजी कबुतरं, आणि कबुतरांऐवजी पारवे वापरले जाऊ शकत होते. (लेवी. १:१४; १२:८; १४:३०) इस्राएली लोकांसाठी ही गोष्ट सोईस्कर का होती? कारण प्राचीन इस्राएलमध्ये पारवे नेहमीच मिळत नव्हते. का बरं?

पारवा

पारवे हे स्थलांतर करणाऱ्‍या पक्ष्यांमध्ये मोडतात. त्या काळात सहसा उन्हाळ्याच्या दिवसांत हे पक्षी इस्राएल देशात सगळीकडे पाहायला मिळायचे. पण दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात ते दक्षिणेकडच्या उबदार देशांमध्ये स्थलांतर करायचे आणि वसंत ऋतुत पुन्हा इस्राएलमध्ये यायचे. (गीत. २:११, १२; यिर्म. ८:७) त्यामुळे हिवाळ्यात इस्राएल देशात अर्पणासाठी पारवे मिळणं मुश्‍कील व्हायचं.

राखाडी कबुतर

याउलट, कबुतरं सहसा स्थलांतर करत नाहीत. त्यामुळे इस्राएलमध्ये ते वर्षभर मिळायचे. शिवाय ते पाळलेही जायचे. (योहान २:१४, १६ सोबत तुलना करा.) बायबल प्लान्ट्‌स ॲण्ड ॲनिमल्स  (बायबल काळातली झाडं आणि प्राणी) नावाच्या एका पुस्तकात असं म्हटलं आहे: “पॅलेस्टाईनमधल्या जवळजवळ प्रत्येक गावात कबुतरं पाळली जायची. प्रत्येक घरात या पक्ष्यांसाठी कबुतरखाने किंवा भिंतींना बिळांसारख्या खोबणी केलेल्या असायच्या.”—यशया ६०:८ सोबत तुलना करा.

भिंतीच्या खोबणीत बसलेलं कबुतर

इस्राएलमध्ये वर्षभर जे पक्षी सहज उपलब्ध व्हायचे त्यांचं अर्पण यहोवा आनंदाने स्वीकारायचा. यावरून यहोवा किती प्रेमळ आणि आपल्या सेवकांची परिस्थिती समजून घेणारा देव आहे हे दिसून येतं.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा