वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp22 क्र. १ पृ. १२-१३
  • ४ | देवाच्या मदतीने द्वेषावर विजय मिळवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ४ | देवाच्या मदतीने द्वेषावर विजय मिळवा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बायबलची शिकवण:
  • याचा काय अर्थ होतो:
  • तुम्ही काय करू शकता:
  • बायबलने बदलले जीवन!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • आपण द्वेषाचं चक्र कसं थांबवू शकतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२२
  • आपण द्वेषावर विजय मिळवू शकतो!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२२
  • द्वेषाचं हे चक्र का सुरू आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२२
wp22 क्र. १ पृ. १२-१३
बरेच लोक बायबलच्या प्रकाशात चालत आहेत. त्यांच्या सावल्यांवरून ते आधी कशा प्रकारची व्यक्‍ती होते ते दिसत आहे.

आपण द्वेषाचं चक्र कसं थांबवू शकतो?

४ | देवाच्या मदतीने द्वेषावर विजय मिळवा

बायबलची शिकवण:

“पवित्र शक्‍तीचं फळ म्हणजे प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्‍वास, सौम्यता, आत्मसंयम.”​—गलतीकर ५:२२, २३.

याचा काय अर्थ होतो:

देवाच्या मदतीनेच आपल्याला द्वेषाचं चक्र मोडणं शक्य आहे. त्याच्या पवित्र शक्‍तीमुळे आपण स्वतःमध्ये चांगले गुण वाढवू शकतो. हे गुण आपल्याला स्वतःहून कधीच वाढवता येणार नाहीत. म्हणूनच द्वेषावर मात करण्यासाठी आपण स्वतःवर नाही, तर देव जी मदत पुरवतो त्यावर अवलंबून राहिलं पाहिजे. आपण असं केलं, तर येशूचा शिष्य पौल याच्यासारखा आपल्यालाही अनुभव येईल. तो म्हणाला: “जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे सगळ्या गोष्टी करण्याची मला शक्‍ती मिळते.” (फिलिप्पैकर ४:१३) त्यामुळे मग आपल्यालाही असं म्हणता येईल: ‘यहोवाकडून मला साहाय्य मिळतं.’​—स्तोत्र १२१:२.

तुम्ही काय करू शकता:

“यहोवाने मला हिंसा सोडून द्यायला आणि शांतीप्रिय व्यक्‍ती बनायला मदत केली.”​—वॉल्डो

तुम्ही मदतीसाठी यहोवा देवाकडे मनापासून प्रार्थना करू शकता आणि त्याच्याकडे त्याची पवित्र शक्‍ती मागू शकता. (लूक ११:१३) तुम्हाला चांगले गुण वाढवता यावेत म्हणून त्याला विनंती करा. मनातून द्वेष काढून टाकण्यासाठी ज्या चांगल्या गुणांमुळे मदत होते त्या गुणांबद्दल बायबलमधून शिका. ते गुण म्हणजे प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता आणि आत्मसंयम. यासोबतच ते गुण आपल्या वागण्या-बोलण्यातून दाखवण्याचा प्रयत्न करा. तसंच, जे लोक असे गुण वाढवायचा प्रयत्न करतात अशा लोकांसोबत मैत्री करा. ते तुम्हाला “प्रेम आणि चांगली कार्यं करण्यासाठी” उत्तेजन देतील.​—इब्री लोकांना १०:२४.

अनुभव​—वॉल्डो

यांनी द्वेष आणि हिंसेवर मात केली

वॉल्डो.

वॉल्डो हे लहानाचे मोठे होत असताना नकारात्मक गोष्टींबद्दल अतिशय हिंसक वृत्ती दाखवू लागले. ते म्हणतात: “ड्रग्ज विक्रेत्यांशी रस्त्यांवर माझी नेहमी भांडणं व्हायची. . . . एकदा, शत्रू टोळीनं माझा खून करण्यासाठी एका कुख्यात गुंडाला सुपारी दिली; त्या हल्ल्यात मी फक्‍त जखमी झालो आणि त्याच्या तावडीतून सुटलो.”

वॉल्डो यांच्या बायकोने यहोवाच्या साक्षीदारांबरोबर अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना ते आवडलं नाही. ते म्हणतात: “मला साक्षीदारांचा प्रचंड राग यायचा आणि मी त्यांना शिवीगाळ करायचो. पण आश्‍चर्य म्हणजे, ते नेहमी माझ्याशी शांतीने वागायचे.”

कालांतराने, वॉल्डो यांनी बायबल अभ्यास सुरू केला. ते म्हणतात: “मी जे काही शिकत होतो ते लागू करणं इतकं सोपं नव्हतं. मला वाटलं, मी माझ्या रागावर कधीच नियंत्रण ठेवू शकणार नाही.” पण बायबलमध्ये शिकलेल्या एका गोष्टीमुळे त्यांच्यात खूप मोठा बदल झाला.

वॉल्डो पुढे म्हणतात: “एकदा, माझा बायबल अभ्यास घेणाऱ्‍या ऑलेहॉन्ड्रो या भावाने मला गलतीकर ५:२२, २३ ही वचनं वाचायला सांगितली. . . . हे गुण मी स्वतःच्या बळावर नाही, तर देवाच्या पवित्र शक्‍तीच्या मदतीने विकसित करू शकतो, असं मला ऑलेहॉन्ड्रो यांनी सांगितलं. हे जाणून माझा दृष्टिकोनच बदलला!”

देवाकडून मिळणारी मदत स्वीकारल्यामुळे वॉल्डो यांना आपल्या मनातला द्वेष काढून टाकता आला. ते म्हणतात: “माझ्या नातेवाइकांना आणि पूर्वीच्या मित्रांना विश्‍वासच बसत नाही की माझ्यात इतका बदल झालाय.” ते पुढे म्हणतात: “यहोवाने मला हिंसा सोडून द्यायला आणि शांतीप्रिय व्यक्‍ती बनायला मदत केली.”

वॉल्डो यांची पूर्ण जीवन कथा १ जानेवारी २०१४ च्या टेहळणी बुरूजमध्ये पान १२-१३ वर दिली आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा