ख्रिस्ती जीवन
तो दिवस येईपर्यंत . . .
आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा पुनरुत्थानाच्या आशेमुळे आपल्याला सांत्वन मिळतं. पण तरीसुद्धा आज आपण पाप आणि मृत्यूच्या ओझ्याखाली दबलेले आहोत. (यश २५:७, ८) हेसुद्धा एक कारण आहे, ज्यामुळे “सगळी सृष्टी आजपर्यंत कण्हत आणि दुःख सोसत आहे.” (रोम ८:२२) मग आपले प्रिय लोक पुन्हा जिवंत होतील तो दिवस येईपर्यंत आपण या दुःखाचा सामना कसा करू शकतो? देवाच्या वचनात दिलेल्या तत्त्वांमुळे आपल्याला खूप मदत होऊ शकते.
प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा . . . हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
डॅनिएला, मसाहिरो आणि योशिमी यांना कोणत्या दुःखाचा सामना करावा लागला?
पाच उपयोगी सल्ल्यांमुळे त्यांना कशी मदत झाली?
खरं सांत्वन आपल्याला कोण देऊ शकतं?—२कर १:३, ४