ख्रिस्ती जीवन
प्रचाराची सभा चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठी काही उपाय
मंडळीतल्या इतर सभांसारखीच प्रचारकार्याची सभा ही यहोवाकडून असलेली एक व्यवस्था आहे. यामुळे आपल्याला भाऊबहिणींवर प्रेम करण्याचं आणि चांगली कामं करण्याचं उत्तेजन मिळतं. (इब्री १०:२४, २५) ही सभा जास्तीत जास्त ५ ते ७ मिनिटांची असावी. (पण जर ही सभा मंडळीच्या सभेनंतर असेल, तर ती यापेक्षाही कमी वेळेची असावी.) या वेळेत कोण-कोणासोबत प्रचार करेल, कुठे प्रचार करेल हे सांगावं आणि शेवटची प्रार्थना करावी. ही सभा घेणाऱ्या भावाने भाऊबहिणींना प्रचारात उपयोगी पडतील अशा मुद्द्यांवर बोलावं. उदाहरणार्थ, काही भाऊबहीण आठवड्यातून एकदा, म्हणजे शनिवारी किंवा रविवारी प्रचार करतात. त्यामुळे, त्यांना लोकांशी कोणत्या विषयावर बोलता येईल यावर जर बांधवाने चर्चा केली तर ते चांगलं राहील. पण याशिवाय, बांधव आणखी कोणत्या विषयांवर चर्चा करू शकतो?
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका यात दिलेले चर्चेसाठी नमुने
अलिकडेच घडलेल्या एखाद्या घटनेचा किंवा बातमीचा वापर करून चर्चा कशी सुरू करावी
घरमालक आक्षेप घेतो त्यावेळी चर्चा कशी सुरू ठेवावी
देवाला न मानणाऱ्या, उत्क्रांतिवादावर विश्वास ठेवणाऱ्या, वेगळी भाषा बोलणाऱ्या किंवा तुमच्या क्षेत्रात सहसा पाळला जात नाही असा धर्म पाळणाऱ्या व्यक्तीशी कसं बोलावं
jw.org वेबसाईटचा, JW Library ॲपचा आणि बायबलचा चांगला वापर कसा करावा
शिकवण्याच्या साधनांपैकी एखाद्या साधनाचा चांगला वापर कसा करावा
फोनद्वारे, पत्राद्वारे किंवा सार्वजनिक साक्षकार्य कसं करावं; पुनर्भेट किंवा बायबल अभ्यास कसा घ्यावा
सुरक्षित राहणं, क्षेत्रात चांगली वागणूक ठेवणं, घरमालकाची आवड लक्षात घेऊन चर्चा करणं, या किंवा यांसारख्या विषयांवर सूचना
वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा या माहितीपत्रकातल्या एका धड्यावर किंवा व्हिडिओवर चर्चा
आपल्यासोबत काम करणाऱ्या भावाला किंवा बहिणीला प्रोत्साहन कसं द्यावं आणि मदत कशी करावी
प्रचारकार्याशी संबंधित असलेल्या एखाद्या वचनावर किंवा अनुभवावर चर्चा