वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 ऑक्टोबर पृ. ७
  • देवाचं वचन तुमच्यासाठी किती मौल्यवान आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाचं वचन तुमच्यासाठी किती मौल्यवान आहे?
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • विल्यम टिंड्‌ल दूरदर्शी मनुष्य
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • बायबल आपल्या हातात कसे आले—भाग दोन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • तुम्हाला मदत हवी आहे का?
    सावध राहा!—२०२०
  • आपली अधिकृत वेबसाईट —आपल्या व इतरांच्या फायद्यासाठी
    आमची राज्य सेवा—२०१२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 ऑक्टोबर पृ. ७

ख्रिस्ती जीवन

देवाचं वचन तुमच्यासाठी किती मौल्यवान आहे?

पवित्र पुस्तक असलेल्या बायबलमध्ये यहोवा देवाचे विचार आणि त्याचे शब्द आहेत. कारण तोच या पुस्तकाचा लेखक आहे. (२पेत्र १:२०, २१) यहोवा देवालाच संपूर्ण विश्‍वावर राज्य करण्याचा अधिकार आहे आणि तो हे त्याच्या राज्याद्वारे सिद्ध करेल, या गोष्टीवर बायबलमध्ये जोर देण्यात आला आहे. त्यामुळे मानवजातीला लवकरच येणाऱ्‍या एका चांगल्या जीवनाची आशा मिळते. यासोबतच स्वर्गीय पित्याच्या, यहोवाच्या प्रेमळ व्यक्‍तिमत्त्वाबद्दलही बायबल आपल्याला सांगतं.—स्तो ८६:१५.

देवाच्या वचनाला मौल्यवान समजण्याची आपल्या प्रत्येकाकडे वेगवेगळी कारणं आहेत. पण दररोज त्याचं वाचन करून आणि त्यातल्या गोष्टी आपल्या जीवनात लागू करून या मौल्यवान देणगीबद्दल आपल्याला कदर असल्याचं आपण दाखवतो का? तर मग, दररोज त्याचं वाचन करण्याद्वारे आपल्याही भावना स्तोत्रकर्त्यासारख्याच आहेत हे आपण दाखवून देऊ या. त्याने म्हटलं: “तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे!”—स्तो ११९:९७.

बायबल त्यांच्यासाठी मौल्यवान होतं—निवडक भाग (विल्यम टिंडेल) हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • विल्यम टिंडेल; विल्यम टिंडेल त्यांच्या प्रिंटिंग प्रेसजवळ; टिंडेल यांच्या नव्या कराराच्या पहिल्या आवृत्तीची एक प्रत

    विल्यम टिंडेल यांनी बायबलच्या काही भागांचं भाषांतर का केलं?

  • बायबलचं भाषांतर करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत इतकी विशेष का होती?

  • टिंडेल यांच्या बायबल प्रती इंग्लंडमध्ये कशा प्रकारे लपवून आणण्यात आल्या?

  • आपल्याला देवाच्या वचनाची खरंच कदर आहे हे आपल्यापैकी प्रत्येक जण कसं दाखवू शकतो?

मनन करण्यासाठी: देवाचं वचन कशा प्रकारे खालील गोष्टींसारखं आहे?

  • दिवा आणि प्रकाश—स्तो ११९:१०५

  • पाणी—इफि ५:२६

  • तलवार—इफि ६:१७

  • आरसा—याक १:२३-२५

देवाच्या वचनाचं दररोज वाचन करा

बायबल वाचनाचा आराखडा

तुम्ही कधी jw.org या वेबसाईटवर असणाऱ्‍या बायबल वाचनाच्या आराखड्याचा वापर केला आहे का? जर jw.org या वेबसाईटवर तुमच्या भाषेत बायबल उपलब्ध असेल तर आराखड्याच्या पी.डी.एफ फाईलमध्ये एखाद्या लिंकवर क्लिक केल्यानंतर, तो भाग वाचण्यासाठी आपोआप वेबसाईटवर उघडेल. सोबतच जर बायबल वाचनाचे रेकॉर्डिंग उपलब्ध असतील तर तेसुद्धा तुम्हाला ऐकता येतील.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा