देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | कलस्सैकर १-४
जुनं व्यक्तिमत्त्व काढून नवीन परिधान करा
सत्यात आल्यानंतर तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्त्वात मोठे बदल करावे लागले आहेत का? जर असतील, तर तुम्ही घेतलेल्या परिश्रमांबद्दल यहोवाला नक्कीच खूप आनंद झाला असेल, याची खात्री बाळगा. (यहे ३३:११) पण जुनं व्यक्तिमत्त्व पुन्हा डोकावू नये आणि नवीन व्यक्तिमत्त्व टिकून राहावं यासाठी सतत प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. तर मग कोणत्या गोष्टींमध्ये तुम्हाला आणखी सुधारणा करण्याची गरज आहे ते शोधण्यासाठी खालील प्रश्नांची उत्तरं द्या:
माझं मन दुखावणाऱ्या व्यक्तीबद्दल मी मनात राग बाळगून असतो का?
घाईत असताना किंवा थकलेल्या अवस्थेतही मी धीर दाखवण्याचा प्रयत्न करतो का?
मनात एखादा घाणेरडा विचार आला तर मी तो लगेच झटकून टाकतो का?
इतर देशाच्या किंवा वंशाच्या लोकांबद्दल माझ्या मनात नकारात्मक भावना असतात का?
मी अलीकडे कोणाशी कठोरतेनं बोललो आहे का, किंवा रागानं वागलो आहे का?