देवाच्य वचनातील अनमोल रत्नं | प्रेषितांची कार्ये २७-२८
पौल जहाजाने रोमला जातो
कैदेत असतानाही पौलने त्याच्या विश्वासाबद्दल बोलायचं थांबवलं नाही. जहाजावर असताना त्याने तिथल्या कामगारांना आणि सोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना साक्ष दिली. जहाज फुटल्यानंतर मिलिता बेटावर पोचल्यावर त्याने काही आजारी लोकांना बरं केलं. यासोबतच पौलने त्यांना आनंदाचा संदेश सांगण्याच्या संधीचा फायदा करून घेतला. रोममध्ये आल्याच्या तीन दिवसांनंतर त्याने साक्ष देण्यासाठी यहुद्यांच्या प्रमुख पुरुषांना बोलवलं. तसंच, कैदेत असताना, दोन वर्षांदरम्यान त्याने त्याला भेटायला येणाऱ्या सर्वांना प्रचार केला.
वेगवेगळे अडथळे असतानाही आनंदाच्या संदेशाचा प्रचार करण्यासाठी तुम्ही काय करू शकता?