देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | लूक १
मरीयाच्या नम्रतेचं अनुकरण करा
मरीयाची मनोवृत्ती उल्लेखनीय होती. त्यामुळे यहोवाने तिला एक असा सुहक्क दिला, जो दुसऱ्या कोणालाच कधी मिळाला नव्हता आणि भविष्यातही मिळणार नव्हता.
मरीयाच्या शब्दांवरून खाली दिलेल्या गोष्टी कशा दिसून आल्या?
नम्रता
गाढ विश्वास
शास्त्रवचनाबद्दल ज्ञान
यहोवाबद्दल कदर