ख्रिस्ती जीवन
तुमच्या परिस्थितीत बदल होतो, तेव्हाही आध्यात्मिक रीत्या जागृत आणि सक्रिय राहा
जीवनात होणाऱ्या बदलांना टाळणं अशक्य आहे; खासकरून या शेवटल्या दिवसांत. (१कर ७:३१) बदल अपेक्षित असो किंवा अनपेक्षित, चांगले असो किंवा वाईट, त्यांमुळे आपल्या उपासनेत व्यत्यय येऊ शकतो. तसंच, यहोवासोबतचा आपला नातेसंबंध कमजोर होऊ शकतो. तर मग जीवनात बदल होतात तेव्हा आध्यात्मिक रीत्या जागृत आणि सक्रिय राहण्यासाठी आपल्याला कशामुळे मदत होऊ शकते? नवीन ठिकाणी गेल्यावरही आध्यात्मिक रीत्या मजबूत राहा हा व्हिडिओ पाहा. त्यानंतर, पुढील प्रश्नांची उत्तरं द्या:
व्हिडिओमधल्या पित्याला एका बांधवाने कोणता सल्ला दिला?
मत्तय ७:२५ या वचनातलं तत्त्व या कुटुंबाच्या परिस्थितीला कसं लागू होतं?
नवीन ठिकाणी राहायला जाण्याआधी कुटुंबाने कशी तयारी केली आणि यामुळे त्यांना कशी मदत झाली?
मंडळीत आणि क्षेत्रात झालेल्या बदलांशी जुळवून घेण्यासाठी कुटुंबाला कशामुळे मदत झाली?
अलीकडे माझ्या जीवनात कोणते मोठे बदल झाले आहेत?
या व्हिडिओत दाखवण्यात आलेली तत्त्वं, मी माझ्या परिस्थितीत कशी लागू करू शकतो?