देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | नहूम १–हबक्कूक ३
आध्यात्मिक रीत्या जागृत आणि सक्रिय राहा
बाबेल यहूदाचा नाश करेल असं भाकीत करण्यात आलं होतं. पण ही भविष्यवाणी पूर्ण होणार नाही असं लोकांना कदाचित वाटलं असावं. कारण यहूदा राष्ट्राने मिसरला पैसे दिले होते. आणि मिसरचे लोक बाबेलच्या खासदी लोकांपेक्षा जास्त शक्तिशाली होते. तसंच, यहोवा यरुशलेमचा आणि त्याच्या मंदिराचा नाश होऊ देईल, ही गोष्ट अशक्य आहे असं अनेक यहुदी लोकांना वाटायचं. पण ही भविष्यवाणी नक्की पूर्ण होणार होती आणि हबक्कूकला याची वाट पाहत राहण्याची गरज होती. आणि यासाठी त्याला आध्यात्मिक रीत्या जागृत आणि सक्रिय राहावं लागणार होतं.
या व्यवस्थेचा नाश जवळ आहे याची खात्री मला कशामुळे मिळते?
मी आध्यात्मिक रीत्या जागृत आणि सक्रिय कसं राहू शकतो?