वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 फेब्रुवारी पृ. ५
  • यहोवाच्या प्रसन्‍नतेच्या वर्षाची घोषणा करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाच्या प्रसन्‍नतेच्या वर्षाची घोषणा करा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • ‘परमेश्‍वराचे वृक्ष रसभरित असतात’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • चिरायु वृक्ष
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • भाग ३ समयरेषा
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 फेब्रुवारी पृ. ५

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यशया ५८-६२

यहोवाच्या प्रसन्‍नतेच्या वर्षाची घोषणा करा

“यहोवाच्या प्रसन्‍नतेचे वर्ष” हे एक लाक्षणिक वर्ष आहे

६१:१, २, पं.र.भा.

  • हे एका अशा काळाला सूचित करतं, जेव्हा यहोवा नम्र लोकांना त्यांच्या सुटकेच्या घोषणेला प्रतिसाद द्यायची संधी देतो

  • पहिल्या शतकात सा.यु. २९ मध्ये येशूने आपलं सेवाकार्य सुरू केलं, तेव्हा प्रसन्‍नतेचं वर्ष सुरू झालं आणि ते सा.यु. ७० मध्ये देवाच्या सूड घेण्याच्या दिवशी संपलं, जेव्हा जेरूसलेमचा नाश करण्यात आला

  • आपल्या दिवसात प्रसन्‍नतेचं वर्ष, १९१४ मध्ये सुरू झालं जेव्हा येशूला स्वर्गात राजा बनवण्यात आलं आणि ते मोठ्या संकटाने संपेल

प्रसन्‍नतेचं वर्ष दाखवणारी सा.यु. २९ ते सा.यु. ७० आणि १९१४ ते मोठं संकटापर्यंतची कालरेषा

यहोवा आपल्या लोकांना उंच धार्मिकतेच्या वृक्षांनी आशीर्वादित करतो

६१:३, ४

  • जगातली उंच झाडं, सहसा जंगलात सोबत वाढतात आणि ती एकमेकांना आधार देतात

  • त्यांची लांब पसरलेली मुळं एकमेकांत गुंतलेली असतात. त्यामुळे झाडांचा पाया मजबूत होतो आणि ती वादळाचा सामना करू शकतात

  • उंच झाडं लहान रोपांना सावली देतात आणि झाडांच्या पडलेल्या पानांमुळे खालची माती सुपीक होते

धार्मिकतेचे वृक्ष म्हणजे या पृथ्वीवर उरलेले अभिषिक्‍त बांधव, जगभरातल्या ख्रिस्ती मंडळीतल्या बांधवांना मदत आणि संरक्षण देतात, ज्यामुळे त्यांना फायदा होतो

मजबूत मुळं असलेली मोठी झाडं लहान रोपांना सावली देतात
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा