वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 फेब्रुवारी पृ. ४
  • आपलं साहित्य विचारपूर्वक द्या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपलं साहित्य विचारपूर्वक द्या
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • आपल्या प्रकाशनांना तुम्ही मौल्यवान समजता का?
    आमची राज्य सेवा—१९९२
  • आपल्या बायबल आधारित साहित्याचा विचारपूर्वक उपयोग करा
    आमची राज्य सेवा—२००५
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—२०११
  • बहुभाषिक क्षेत्रात साहित्य सादर करणे
    आमची राज्य सेवा—२००३
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 फेब्रुवारी पृ. ४
एक यहोवाची साक्षीदार देवाकडून आनंदाची बातमी! हे माहितीपत्रक देत असताना एक स्त्री लक्ष देऊन तिचं बोलणं ऐकत आहे

ख्रिस्ती जीवन

आपलं साहित्य विचारपूर्वक द्या

येशूने शिकवलं: “तुम्हाला फुकट मिळाले, फुकट द्या.” (मत्त. १०:८) बायबल किंवा बायबल आधारित साहित्यासाठी लोकांकडून पैसे न घेण्याच्या स्पष्ट निर्देशनाचं आपण पालन करतो. (२ करिंथ. २:१७) पण या साहित्यात, देवाच्या वचनातली अनेक मौल्यवान सत्य आहेत. साहित्य छापण्यासाठी आणि ते जगभरातल्या मंडळ्यांमध्ये पोचवण्यासाठी भरपूर मेहनत आणि पैसा लागतो. त्यामुळे आपल्याला जितकं साहित्य लागतं तितकंच आपण घेतलं पाहिजे.

लोकांना साहित्य देताना समजूतदारपणे द्या आणि सार्वजनिक सेवाकार्य करतानासुद्धा हे लक्षात ठेवा. (मत्त. ७:६) रस्त्याने चालत असलेल्या लोकांना नुसतंच साहित्य देण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना संदेशाबद्दल आवड आहे की नाही हे जाणण्याचा प्रयत्न करा. पण जर कोणी एखादं विशिष्ट साहित्य मागितलं, तर त्यांना ते आनंदाने द्या.—नीति. ३:२७, २८.

ती व्यक्‍ती . . .

  • तुम्ही बोलत असताना लक्षपूर्वक ऐकते का?

  • चर्चेत सहभागी होते का?

  • साहित्य वाचण्यास तयार होते का?

  • दान देते का?

  • देवाच्या वचनातून जे ऐकते त्याला चांगला प्रतिसाद देते का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा