ख्रिस्ती जीवन
तुम्ही JW लायब्ररीचा वापर करत आहात का?
JW लायब्ररी हे एक मोफत ॲप आहे (सॉफ्टवेर ॲपलीकेशन) ज्यामुळे तुम्ही बायबल आणि इतर प्रकाशनं, व्हिडिओ आणि ऑडिओ कार्यक्रम तुमच्या फोन, टॅबलेट किंवा कम्प्युटरवर डाऊनलोड करू शकता.
हे ॲप कसे मिळवाल?: ऑनलाईन जा आणि ॲपस्टोरमधून JW लायब्ररी इनस्टॉल करा. हे ॲप वेगवेगळ्या उपकरणांसाठी उपलब्ध आहे. ऑनलाईन गेल्यावर तुम्हाला तुमच्या फोन किंवा टॅबवर डाऊनलोड करायच्या गोष्टी निवडा. जर तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन नसेल तर तुम्ही कॉफी शॉप, मॉल किंवा जिथं इंटरनेट कनेक्शन मिळेल अशा सार्वजनिक ठिकाणी जाऊन प्रकाशनं डाऊनलोड करू शकता. एकदा डाऊनलोड झालेलं प्रकाशन परत बघण्यासाठी तुम्हाला इंटरनेटची गरज पडणार नाही. पण JW लायब्ररीवर नेहमी नवनवीन फिचर्स येत असल्यामुळे तुम्ही वेळोवेळी ऑनलाईन जाऊन अपडेट्स इनस्टॉल करणं गरजेचं आहे.
हे ॲप का गरजेचं आहे? JW लायब्ररी ॲपमुळे तुम्ही वैयक्तिक अभ्यास करू शकता आणि सभांमध्येदेखील त्याचा वापर करू शकता. आपल्या सेवाकार्यात खासकरून अनौपचारिक प्रचार करताना हे ॲप फार उपयोगी पडतं.