देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | एस्तेर ६-१०
यहोवासाठी आणि त्याच्या लोकांसाठी एस्तेरनं निःस्वार्थपणे कार्य केलं
यहोवा आणि त्याच्या लोकांच्या बाजूनं उभं राहण्यासाठी, एस्तेरनं धैर्य आणि निःस्वार्थीपणा दाखवला
एस्तेर आणि मर्दखय सुरक्षित होते, पण यहूद्यांची कत्तल करण्याविषयी हामानानं जाहीर केलेल्या हुकुमामुळं, साम्राज्याच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या यहुद्यांचा जीव मात्र धोक्यात होता
राजानं बोलवलं नव्हतं, तरी एस्तेर आपला जीव धोक्यात घालून त्याला भेटायला गेली. तिला आपल्या लोकांसाठी रडू आलं, आणि त्यानं जाहीर केलेला क्रूर हुकूम रद्द करण्याची तिनं विनंती केली
राजानं आपल्या नावानं जाहीर केलेला हुकूम कोणालाच रद्द करता येत नव्हता. म्हणून त्यानं एस्तेर आणि मर्दखयला दुसरा हुकूम जाहीर करण्याची परवानगी दिली
यहोवानं आपल्या लोकांना विजय मिळवून दिला
यहुद्यांना आपला बचाव करण्याचा हक्क देणारा एक दुसरा हुकूम जाहीर करण्यात आला
राजाच्या घोडेस्वारांनी लगेच सर्व साम्राज्यात हा हुकूम कळवला, आणि यहूदी युद्धाची तयारी करू लागले
देवाचा यहुद्यांवर आशीर्वाद आहे याचा पुरावा लोकांना मिळाला आणि तेदेखील यहूदी झाले