देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | एज्रा ६-१०
कुरकुर न करता आनंदानं सेवा करणाऱ्यांवर यहोवा संतुष्ट असतो
एज्रा जेरूसलेमला परतण्याची तयारी करतो
एज्राला अर्तहशश्त राजाकडून जेरूसलेमला परत येऊन यहोवाची शुद्ध उपासना पुन्हा सुरू करण्याची परवानगी मिळते
एज्रानं राजाकडं यहोवाच्या मंदिरासाठी जे काही मागितलं होतं, म्हणजे सोनं, चांदी, गहू, द्राक्षारस, तेल आणि मीठ, ते सर्व राजानं त्याला दिलं. आजच्या दिवसांत या सर्वांची किंमत, ६०० कोटी रुपयांपेक्षा (₹ ६,००,००,००,०००) अधिक होती
• जेरूसलेमचा परतीचा प्रवास खडतर असणार होता
यहोवा त्याच्या सेवकांचं संरक्षण करेल, असा एज्राला भरवसा होता
बॅबिलोनहून जेरूसलेमचा पल्ला जवळजवळ १,६०० किलोमीटरचा असावा; शिवाय त्यांना अनेक धोकादायक क्षेत्रांतून प्रवास करावा लागणार होता
या प्रवासाला त्यांना सुमारे ४ महिने लागले
परत आलेल्या सर्वांना भक्कम विश्वास, खऱ्या उपासनेबद्दल आवेश आणि धैर्य असणं गरजेचं होतं
एज्रानं निघताना सोबत . . .
७५० किक्कार वजनाचं सोनं व चांदी घेतली किंवा पूर्ण वाढ झालेल्या ३ नर आफ्रिकन हत्तींच्या वजनाइतकं सोनं व चांदी घेतली!
परत आलेल्यांना तोंड द्याव्या लागलेल्या समस्या . . .
लुटारू, वाळवंट, जंगली जनावर