“तुम्ही आमचं प्रकाशन घेतलं तरच मी तुमचंही घेईन”
अशी काही घरमालकांची मागणी असते. पण आपण आपली बायबल प्रकाशने देऊन चुकीच्या शिकवणी पसरवणारी त्यांची धार्मिक पुस्तके घेत नाही, मग अशा घरमालकांचे मन न दुखावता आपण त्यांना उत्तर कसे देऊ शकतो? (रोम. १:२५) आपण असे म्हणू शकतो: “तुमच्या या प्रकाशनात मानवी समस्यांवर काही तोडगा सांगितलेला आहे का? [उत्तरासाठी थांबा. या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर आमचे प्रकाशन वाचून काढा असे जर त्यांनी म्हटले तर तुम्ही म्हणू शकता की आमच्या प्रकाशनांत कशाबद्दल माहिती आहे हे सांगितल्याशिवाय आम्ही तुम्हाला प्रकाशने दिले नाहीत. नंतर मत्तय ६:९, १० वाचा किंवा त्या वचनात काय सांगितले आहे ते बोला.] देवाचे राज्य या पृथ्वीवर यावे अशी प्रार्थना करायला येशू आपल्याला उत्तेजन देतो. फक्त हेच राज्य मानवाच्या सर्व समस्यांवर एकमेव तोडगा आहे. म्हणून देवाच्या राज्याविषयी सांगणारी प्रकाशनेच मी वाचतो. तुमची हरकत नसल्यास, देवाचे राज्य काय करणार आहे याविषयी काही ठराविक गोष्टी मी तुम्हाला पवित्र शास्त्रातून दाखवले तर चालेल का?”