घोषणा
◼ साहित्य सादरता ऑक्टोबर: टेहळणी बुरूज नियतकालिक. पुनर्भेटी घेताना बायबल काय शिकवते हे पुस्तक किंवा व्यक्तीच्या क्षमता लक्षात घेऊन देवाचे ऐका किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा यांपैकी एक माहितीपत्रक देऊन बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. नोव्हेंबर आणि डिसेंबर: पुढील एखाद्या पत्रिकेचा उपयोग करा: सर्व दुःखांचा लवकरच अंत होणार!, खिन्न झालेल्यांना सांत्वन, कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटा, तुमचे नशीब आधीच ठरलेले आहे का?, यहोवा - कोण आहे?, शांतीदायक नवीन जगातील जीवन, यहोवाच्या साक्षीदारांचा काय विश्वास आहे?, मृत प्रिय जनांसाठी कोणती आशा?, जगावर खरोखर कोण अधिपत्य गाजवतो?, दुःखाचा कधी अंत होईल का? आणि या जगाचा बचाव होईल का? घरमालकाला आस्था असल्यास बायबल काय शिकवते किंवा देवाचे ऐका किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा या माहितीपत्रकांचा उपयोग करून बायबल अभ्यास कसा केला जातो हे दाखवा. जानेवारी आणि फेब्रुवारी: पुढील कोणतेही ३२ पानांचे माहितीपत्रक वापरा: समाधानी जीवन—कसे मिळवता येईल, तुम्ही त्रैक्य मानावे का? किंवा जीवनाचा काय उद्देश आहे —तो तुम्हाला कसा शोधता येईल? पुनर्भेट घेताना बायबल काय शिकवते किंवा व्यक्तीच्या गरजा लक्षात घेऊन देवाचे ऐका किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा ही माहितीपत्रके सादर करा आणि बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा.