नमुना सादरीकरण
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास सुरू करण्याकरता
“निकट भविष्यात जगाची परिस्थिती सुधारेल अशी बरेच जण आशा बाळगतात. तुम्हीही अशी आशा बाळगता का? [उत्तरासाठी थांबा.] बायबलमधील एका वचनातून मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर वाचून दाखवू का?” घरमालकाने आस्था दाखवल्यास स्तोत्र ३७:१०, ११ वाचा. यानंतर घरमालकासोबत टेहळणी बुरूज जानेवारी-मार्च अंकातील पृष्ठ १३ वर दिलेल्या शेवटल्या उपशीर्षकाखालील माहितीची चर्चा करा. आणी प्रश्न ४ वर चर्चा करण्यासाठी पुनर्भेटीची व्यवस्था करा.
टेहळणी जानेवारी - मार्च
पृष्ठ २४ वरील लेखाचे शीर्षक दाखवा व म्हणा: “तुम्ही या प्रश्नाचं काय उत्तर द्याल? [उत्तरासाठी थांबा.] बायबलमधील एका शास्त्रवचनातून मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर वाचून दाखवू का? [घरमालकाने आस्था दाखवल्यास १ योहान ५:१९ वाचा.] यात सांगितल्यानुसार, जगावर तो दुष्ट म्हणजे दियाबल राज्य करत आहे. पण यामुळे काही प्रश्न उपस्थित होतात. दियाबल आला कुठून? तो एक वास्तविक व्यक्ती आहे का? देव त्याला किती काळापर्यंत राज्य करू देईल? या संदर्भात बायबल काय सांगते हे या नियतकालिकात स्पष्ट केले आहे.”