घोषणा
◼ साहित्य सादरीकरण जानेवारी: बायबल नेमके काय शिकवते? पहिल्या भेटीतच बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. घरमालकांकडे हे पुस्तक आधीपासूनच असल्यास व ते बायबल अभ्यास करण्यास तयार नसल्यास, प्रचारक एखादे जुने नियतकालिक किंवा घरमालकाच्या आवडीचे विषय असलेले कोणतेही माहितीपत्रक देऊ शकतात. फेब्रुवारी: कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य, सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य. मार्च: बायबल नेमके काय शिकवते? पहिल्या भेटीतच बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. घरमालकांकडे हे पुस्तक आधीपासूनच असल्यास व ते बायबल अभ्यास करण्यास तयार नसल्यास, प्रचारक एखादे जुने नियतकालिक किंवा घरमालकाच्या आवडीचे विषय असलेले कोणतेही माहितीपत्रक देऊ शकतात. एप्रिल आणि मे: टेहळणी बुरूज. जेथे आवड दाखवली जाते तेथे जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? ही पत्रिका द्या आणि बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. स्मारकविधीला किंवा संमेलनांना अथवा अधिवेशनांना उपस्थित राहिलेल्या परंतु नियमितरीत्या सभांना येत नसलेल्या लोकांना आपण पुन्हा भेटायला जातो तेव्हा बायबल काय शिकवते या पुस्तकाचा उपयोग करून त्यांच्याबरोबर बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा.
◼ फेब्रुवारी महिन्यापासून विभागीय पर्यवेक्षक जे नवीन जाहीर भाषण देतील त्याचा विषय असेल “तुमचा भरवसा यहोवावर आहे का?”
◼ पंधरा किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींचा गट बेंगळूर येथील शाखा कार्यालयाला भेट देण्याची योजना करत असल्यास, येण्याआधी बेथेल कार्यालयाशी संपर्क साधावा. तुम्ही येणार आहात त्याच्या निदान दोन आठवड्यांआधी, किती जण येणार आहेत आणि कोणत्या तारखेला व किती वाजता येणार आहेत यासंबंधीची माहिती कृपया बेथेल कार्यालयाला पाठवावी. शाखा कार्यालयाला भेट देण्याअगोदर कृपया आमची राज्य सेवा मार्च २००८ अंकातील प्रश्नपेटीची उजळणी करावी. बेथेल पाहण्यासाठी टूर्सच्या वेळा सकाळी ८ व १० वाजता तसेच दुपारी १ व ३ वाजता याप्रमाणे आहेत. बेंगळूर येथील शाखा कार्यालय, वैयक्तिक खोल्यांच्या साफसफाईनिमित्त शुक्रवार २५ मे रोजी बंद राहील. या दिवशी तसेच २६ जानेवारी, १ मे, १५, ३० व ३१ ऑगस्ट तसेच २ ऑक्टोबर रोजी टूर्सची व्यवस्था केली जाणार नाही.
◼ उपलब्ध झालेली नवीन प्रकाशने:
बेनिफिट फ्रॉम थियोक्रॅटिक मिनिस्ट्री स्कूल एज्युकेशन —नेपाळी
देवाचे ऐका व देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा —नेवारी